परीक्षेत पारदर्शकता आणण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांचा मास्टरस्ट्रोक
*[ ⏺️ पंचनामा ]*
▪️==================▪️
*परीक्षेत पारदर्शकता आणण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांचा मास्टरस्ट्रोक*
● राज्यातील शासकीय भरती परीक्षांमध्ये पारदर्शकता आणि विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. एमपीएससीच्या औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर, अशा गैरप्रकारांना कायमचा चाप लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार शासनाने एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली ही पाच सदस्यीय समिती कार्यरत राहणार असून, पशुसंवर्धन विभागाचे सचिव एन. रामास्वामी हे सदस्य सचिव असतील. भरती प्रक्रियेतील त्रुटी मुळापासून दूर व्हाव्यात या उद्देशाने मुख्यमंत्र्यांनी परीक्षा पद्धतीचे संपूर्ण पुनर्विलोकन करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार ही समिती प्रश्नपत्रिका निर्मिती, डिजिटल सुरक्षा, गोपनीयता, वितरण, मूल्यमापन ते अंतिम निकालापर्यंतच्या संपूर्ण कार्यपद्धतीचा सखोल अभ्यास करेल. तोतया उमेदवार, प्रश्नपत्रिका फुटी आणि इलेक्ट्रॉनिक साधनांचा गैरवापर रोखण्यासाठी ही समिती ठोस उपाययोजना सुचवणार आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आणि भरती प्रक्रियेत निर्दोष कार्यप्रणाली प्रस्थापित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उचललेले हे पाऊल अत्यंत निर्णायक ठरणार आहे.
©️ *-अभिजीत राणे*
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)




Comments