परदेशात देशाची बदनामी करणाऱ्या राहुल गांधींना मुख्यमंत्री फडणवीसांनी सुनावले
- dhadakkamgarunion0
- Apr 22
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
परदेशात देशाची बदनामी करणाऱ्या राहुल गांधींना मुख्यमंत्री फडणवीसांनी सुनावले
● महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर परदेशात जाऊन देशाची आणि लोकशाहीची बदनामी केल्याचा गंभीर आरोप केला आहे. फडणवीस म्हणाले की, ‘राहुल गांधी वारंवार परदेशात जाऊन भारताच्या संवैधानिक संस्थांबाबत खोटे बोलत आहेत. सततच्या निवडणूक पराभवामुळे त्यांच्यावर मानसिक परिणाम झाला आहे. खरा देशभक्त कधीही परदेशात जाऊन देशाची बदनामी करणार नाही.’ राहुल गांधी यांनी भारताची बदनामी टाळावी, असे आवाहन करत फडणवीस यांनी त्यांच्या वक्तव्यांचा तीव्र निषेध केला. ‘लोकशाही आणि संविधानाचा आदर करणाऱ्या प्रत्येकाने अशा वक्तव्यांपासून दूर राहावे,’ असे ते म्हणाले आहेत. राहुल गांधी यांनी परदेशात बदनामी करण्याऐवजी लोकांमध्ये जाऊन निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करावा, असा सल्लाही फडणवीस यांनी दिला आहे. त्याचवेळी राहुल गांधी कुणाचा अजेंडा राबवत आहेत, याबाबत संशय निर्माण होत असल्याचे म्हटले आहे.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)








Comments