top of page

🔏 [ ⏺️ पंचनामा ] फडणवीसांनी महाविकास आघाडीलाच घेरले!

  • dhadakkamgarunion0
  • Oct 29, 2024
  • 1 min read

🔏 [ ⏺️ पंचनामा ]

▪️==================▪️

फडणवीसांनी महाविकास आघाडीलाच घेरले!

■ मुख्यमंत्री पदाबाबत भाष्य करताना आमच्यामध्ये याबाबत कोणताही संभ्रम अथवा चिंता नसल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. उलट त्यांनी या मुद्यावरून महाविकास आघाडीलाच घेरले आहे. ते म्हणाले आहेत की, 'महाविकास आघाडी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहिर करत नाही, कारण त्यांना निवडणूकीनंतर आपण सत्ता‌ स्थापण्याच्या स्थितीला पोहोचू का? याबाबतच शंका आहे.' अर्थात वस्तूस्थिती हीच आहे. ज्या महाविकास आघाडीला अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जागा वाटप जाहीर करता येत नाही, ती आघाडी कोणत्या मानसिकतेतून निवडणूकीला समोरे जाणार आहे, हे स्पष्टच दिसतेय. म्हणूनच मुख्यमंत्री पदा इतका दूरचा विचार 'मविआ'ने करण्याची आवश्यकता नाही. फडणवीसांनी याच स्थितीवर अचूक बोट ठेवत उगाच वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधकांना चपराक लगावली आहे.

© -अभिजीत राणे

(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)


ree

 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page