निवडणुकीसाठी अमित साटम 'ॲक्शन मोड'वर
- dhadakkamgarunion0
- Dec 3
- 1 min read
🔏 [ ⏺️ साटम पॅटर्न ]
▪️==================▪️
निवडणुकीसाठी अमित साटम 'ॲक्शन मोड'वर
● मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार अमित साटम यांनी आपल्या कामाची गती वाढवली आहे. साटम यांच्या खांद्यावर मुंबई भाजपाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आल्यानंतर, त्यांनी तातडीने संघटनात्मक बांधणी आणि निवडणुकीच्या तयारीवर लक्ष केंद्रित केले आहे. नुकत्याच सुरू झालेल्या 'आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा' या महत्त्वाकांक्षी मोहिमेद्वारे ते मुंबईकरांच्या समस्या जाणून घेत आहेत. भाजपाला मुंबई महापालिकेत मोठे यश मिळवून देण्यासाठी साटम पूर्ण क्षमतेने कामाला लागले आहेत. अमित साटम यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मुंबईतील सर्व प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचे सत्र सुरू केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून आगामी निवडणुकीसाठीची अंतिम रणनीती ठरवली जात आहे. मुंबईतील प्रत्येक वॉर्डात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांना 'ॲक्शन मोड'वर आणले गेले आहे. विशेषतः ज्या जागांवर भाजपाला अधिक यश मिळू शकते, अशा जागांवर विशेष लक्ष दिले जात आहे. साटम यांच्या आक्रमक नेतृत्वामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्येही नवीन उत्साह संचारला आहे.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)








Comments