दिल्लीत छत्रपती शिवरायांच्या सामर्थ्याचा गौरव; मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते अध्यासन केंद्राची पायाभरणी
- dhadakkamgarunion0
- Jul 25
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
दिल्लीत छत्रपती शिवरायांच्या सामर्थ्याचा गौरव; मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते अध्यासन केंद्राची पायाभरणी
● मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जेएनयू, नवी दिल्ली येथे ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज संरक्षण आणि सामरिक विशेष अध्यासन केंद्रा’ची पायाभरणी आणि ‘कुसुमाग्रज मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती विशेष केंद्रा’चे उदघाटन संपन्न झाले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ मराठी नव्हे, तर संपूर्ण भारताचे सार्वकालिक प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या अद्वितीय सामरिक योजनांचा आणि स्थापत्यशास्त्राचा युनेस्कोने ‘मराठा मिलिटरी लँडस्केप’ म्हणून गौरव करत १२ किल्ल्यांना जागतिक वारसा यादीत समाविष्ट केले, हे अत्यंत गौरवाचे आहे. मराठ्यांच्या जाज्वल्य लढ्यांपासून पानिपतच्या बलिदानापर्यंत, संपूर्ण भारतासाठी लढण्याची त्यांची विजिगीषू वृत्ती ही या अध्यासन केंद्रात अभ्यासली जाणार आहे. युद्धनीती, संरक्षणशास्त्र आणि स्वराज्यनिर्मितीचा हा वारसा जेएनयूमध्ये अभ्यासाचा विषय ठरणार, ही अभिमानाची गोष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)

Comments