top of page

दिल्लीच्या वावड्यांवर देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला

dhadakkamgarunion0
14 minutes ago
1 min read

*[ ⏺️ पंचनामा ]*

▪️==================▪️

*दिल्लीच्या वावड्यांवर देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला*

● मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीच्या राजकारणात जाण्याच्या सततच्या चर्चांवर अत्यंत रोखठोक भूमिका मांडली आहे. पक्ष आणि केंद्रीय नेतृत्व जो निर्णय घेईल तो शिरसावंद्य असेलच; मात्र २०२९ पर्यंत आपण महाराष्ट्रातच राहू, असा स्पष्ट विश्वास त्यांनी व्यक्त केला. राजकीय वर्तुळात काहींना यामागे आपले प्रमोशन दिसते, तर काहींना डोक्यावरची बला टळेल असे वाटते, असा टोला लगावताना फडणवीस म्हणाले की, बातम्यांचा तुटवडा झाला की दर दोन-तीन महिन्यांनी अशा वावड्या उठवल्या जातात. राजकीय अफवांपेक्षा राज्याच्या आर्थिक प्रगतीवर आपले पूर्ण लक्ष असल्याचे सांगत त्यांनी महाराष्ट्राच्या विकासाचा मजबूत रोडमॅप मांडला. महाराष्ट्र १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या स्वप्नाच्या उंबरठ्यावर उभा असून, ६६० बिलियन डॉलरचा टप्पा पार करून राज्य उद्दिष्टाच्या सर्वात जवळ पोहोचले आहे. सध्याचा ८.८ टक्के विकासदर चांगला असला, तरी तो १० टक्क्यांपेक्षा पुढे नेण्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखवला. शाश्वत विकास दर कायम राखल्यास महाराष्ट्र २०३० पर्यंत देशातील पहिली १ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था निश्चितपणे बनेल, असा दृढ विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

©️ *-अभिजीत राणे*

(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page