दहीहंडी आधी मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली खुशखबर
- dhadakkamgarunion0
- Jul 18
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
दहीहंडी आधी मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली खुशखबर
● दहीहंडीच्या थरारक आणि साहसी खेळात सहभागी होणाऱ्या गोविंदांसाठी आनंदाची बातमी आहे. यंदा तब्बल दिड लाख गोविंदांना विमा कवच मिळावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्रिडा विभागाला स्पष्ट निर्देश दिले आहेत. सध्या राज्य सरकारकडून ७५ हजार गोविंदांना विमा कवच देण्यात येते. मात्र, या वर्षी ते १,५०,००० गोविंदांपर्यंत वाढवावे, अशी मागणी समितीने केली. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेत क्रिडा विभागाला तत्काळ प्रस्ताव सादर करून कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. राज्यातील गोविंदांसाठी हा निर्णय रक्षाकवच ठरणार असून दहीहंडी उत्सवाचा थरार अधिक निर्धास्तपणे अनुभवता येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)

Comments