top of page

तपोवनातील वृक्ष तोडीच्या वादावर मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला मध्यम मार्ग

  • dhadakkamgarunion0
  • 8 hours ago
  • 1 min read

🔏 [ ⏺️ पंचनामा ]

▪️==================▪️

तपोवनातील वृक्ष तोडीच्या वादावर मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला मध्यम मार्ग

● नाशिकच्या तपोवन परिसरातील वृक्ष तोडीच्या वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोखठोक भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी नागरिकांच्या भावनांचा आदर करत कमीत कमी झाडे तोडण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आणि तोडल्या जाणाऱ्या झाडांचे पुनर्रोपण करण्याची ग्वाही दिली आहे. त्याचबरोबर, या धार्मिक आणि पर्यावरणीय प्रश्नावर राजकारण करणे चुकीचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नावर चर्चा करताना 'मध्यम मार्ग' काढण्याचे संकेत दिले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, झाडे तोडणे योग्य नाही आणि कमीत कमी झाडे कापली पाहिजेत. मात्र, त्याच वेळी प्रयागसारख्या ठिकाणी कुंभमेळा १५ हजार हेक्टरवर भरतो, तर नाशिकमध्ये केवळ ३५० एकर जागा उपलब्ध आहे. जर ही जागा वापरली नाही, तर साधुग्राम कुठे उभारणार, असा प्रशासनासमोर प्रश्न आहे. म्हणूनच, जागेचा उपयोगही करता यावा आणि जास्तीत जास्त झाडे वाचवता यावीत, यासाठी मोठी झाडे 'पुनर्रोपित' करण्याचा विचार आहे. राजकारण न करता, पर्यावरण आणि आपली सनातन परंपरा यांचा समतोल राखणे आवश्यक आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

© -अभिजीत राणे

(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)

ree

 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page