ठाकरे बंधूंनी समाजात द्वेष पेरला; अमित साटम यांची जोरदार टीका
- dhadakkamgarunion0
- 4 days ago
- 1 min read
🔏 [ ⏺️ साटम पॅटर्न ]
▪️==================▪️
ठाकरे बंधूंनी समाजात द्वेष पेरला; अमित साटम यांची जोरदार टीका
● भाषा आणि प्रादेशिक अस्मितेच्या नावाखाली समाजात तेढ निर्माण करणाऱ्या ठाकरे बंधूंविरोधात भाजपाने मुंबईत तीव्र आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान, मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटम यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. समाजात विष पेरणाऱ्या या दुटप्पी धोरणांना मराठी जनता योग्य वेळी धडा शिकवेल, असा इशारा त्यांनी दिला. अमित साटम यांनी आपल्या वक्तव्यात स्पष्ट केले की, काही राजकीय नेते आणि पक्ष केवळ स्वार्थासाठी समाजात भाषिक भेदभावाचे विष पेरून सामाजिक एकोपा बिघडवण्याचे काम करत आहेत. राजकारणासाठी अशा प्रकारचे दुटप्पी धोरण स्वीकारणे अत्यंत निंदनीय आहे. 'बाळासाहेबांनी नेहमीच मराठी माणसाला एकत्र ठेवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचे वारसदार मतभेदाचे राजकारण करत आहेत,' असा आरोप साटम यांनी केला. या भाषिक तणावामुळेच कल्याणच्या अर्णव खैरेंसारख्या मराठी तरुणाला आपले जीवन संपवावे लागले, असे साटम म्हणाले. पालिकेमध्ये २५ वर्षांहून अधिक काळ सत्ता उपभोगूनही मुंबईकरांना चांगले रस्ते, पाणी आणि आरोग्य सुविधा देण्यात ठाकरे गट अपयशी ठरला, अशी टीका साटम यांनी केली.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)








Comments