जरांगेना उपरती मुख्यमंत्री फडणवीसांवर उधळली स्तुतीसुमने
- dhadakkamgarunion0
- 3 days ago
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
जरांगेना उपरती मुख्यमंत्री फडणवीसांवर उधळली स्तुतीसुमने
● मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या काही काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आता त्यांचे कौतुक केले आहे. मराठा समाजासाठी फडणवीस यांनी घेतलेल्या सकारात्मक निर्णयांबद्दल समाधान व्यक्त केले. मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करण्यामागे मराठा समाजासाठी घेण्यात आलेले काही महत्त्वपूर्ण निर्णय कारणीभूत आहेत. विशेषतः, जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्यांनंतर सरकारने मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच 'सगेसोयरे' संदर्भातील अधिसूचनेवरही निर्णय घेण्यात आला आहे. मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळेच, 'जे समाजाचे चांगले करतील, त्यांच्यासोबत आम्ही आहोत' अशी भूमिका जरांगे पाटलांनी घेतली असून, या निर्णयांसाठी त्यांनी फडणवीस यांचे कौतुक केले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना 'राजा माणूस' असे म्हणत त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)








Comments