जरांगेंकडून दिशाभूल; मुख्यमंत्री फडणवीस मात्र ‘कुल’
- dhadakkamgarunion0
- 4 days ago
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
जरांगेंकडून दिशाभूल; मुख्यमंत्री फडणवीस मात्र ‘कुल’
● मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाबाबत वारंवार संयम आणि समन्वय साधण्याची भूमिका घेतली आहे. त्यांनी मराठा समाजाला न्याय देण्यासाठी अनेक सकारात्मक पावले उचलली आहेत. मात्र जरांगे यांच्याकडून सतत बेताल वक्तव्य होत राहणे हे त्यांच्या भूमिकेतील अस्थिरता दर्शवते आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सरकारमधील प्रमुख नेत्यांवरच टीका करणे कितपत योग्य आहे, असा सवाल आता उपस्थित होत आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारकडून अनेक सकारात्मक पाऊले उचलली गेली आहेत. मात्र जरांगे पाटील यांच्या सतत बदलणाऱ्या भूमिकेमागे काही राजकीय दबाव असू शकतो, अशी शंका आता येऊ लागली आहे. आरक्षणाच्या संवेदनशील विषयावर वारंवार आक्रमक होत आणि नंतर मवाळ भूमिका घेत असल्याने त्यांच्या हेतूवर संशय निर्माण झाला आहे. एकीकडे ते सरकारचे आभार मानतात, तर दुसरीकडे थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच टीका करतात. या दुहेरी भूमिकेमुळे त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. ‘एकनाथ शिंदे अजित पवार यांना मराठा आरक्षणाचे काम देवेंद्र फडणवीसांनी करू दिले नाही.’ जरांगे यांनी केलेल्या या बालिश टीकेमुळे त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)

Comments