top of page

'जय हिंद! भारत माता की जय...' ; मुख्यमंत्री फडणवीसांनी मोजक्या शब्दांत व्यक्त केल्या भावना

  • dhadakkamgarunion0
  • May 7
  • 1 min read

🔏 [ ⏺️ पंचनामा ]

▪️==================▪️

'जय हिंद! भारत माता की जय...' ; मुख्यमंत्री फडणवीसांनी मोजक्या शब्दांत व्यक्त केल्या भावना

● 'जय हिंद! भारत माता की जय...' या मोजक्या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजमाध्यमावर आपली ऑपरेशन सिंदूरविषयी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. केंद्र सरकारने तीव्र शब्दांत पाकिस्तानला इशारा दिला आहे. 'छेडोगे तो छोडेंगे नहीं', अशी कठोर भूमिका भारताने घेतली आहे. भारतात दहशतवाद उखडून टाकण्याची पूर्ण क्षमता आहे आणि सरकारने ठरवलं आहे की दहशतवादाचा संपूर्णतः खात्मा करणार, अशी आपली भूमिका यातून अधोरेखित झाली आहे. भाजपने दहशतवादाविरोधात उचललेल्या पावलांवर राजकीय समर्थन मिळत आहे. विरोधी पक्षांनीही सरकारच्या या कारवाईला पाठिंबा दर्शवला असून, देशात सुरक्षा आणि एकजुटीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाकिस्तानच्या अराजकतेविरोधात निर्णायक कारवाई केल्याने भारताची जागतिक स्तरावरील प्रतिमा अधिक बळकट झाली आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, ही कारवाई केवळ सैनिकी विजय नसून भारताच्या परराष्ट्र धोरणातील आत्मविश्वासाचे प्रतिबिंब आहे.

© -अभिजीत राणे

(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)


ree

 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page