जनसेवेतून वाढदिवस साजरा करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आवाहन
- dhadakkamgarunion0
- Jul 23
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
जनसेवेतून वाढदिवस साजरा करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आवाहन
● महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा २२ जुलै रोजी वाढदिवस आहे. यानिमित्ताने भारतीय जनता पक्षाने राज्यभरात विविध सेवाभावी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना वाढदिवसाचे फलकबाजी टाळून, समाजोपयोगी उपक्रमांवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले आहे. मागील काही वर्षांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस 'सेवा दिन' म्हणून साजरा करण्याची परंपरा भाजपाने सुरू केली आहे. यावर्षीही तीच परंपरा कायम ठेवण्यात आली आहे. या दिवशी केवळ शुभेच्छा देऊन थांबण्याऐवजी, गरजू लोकांसाठी मदतकार्य, आरोग्य सेवा आणि पर्यावरणाचे रक्षण यांसारख्या कार्यांना प्राधान्य दिले जात आहे. या उपक्रमांतून समाजसेवेचा संदेश दिला जात आहे आणि जनतेच्या हितासाठी कार्य करण्याची बांधिलकी दर्शविली जात आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात काही नेते केवळ त्यांच्या पदामुळे नव्हे, तर त्यांच्या कर्तृत्वामुळे, दूरदृष्टीमुळे आणि धोरणात्मक निर्णयक्षमतेमुळे ओळखले जातात. अशाच नेत्यांपैकी एक म्हणजे भाजपाचे नेते, राजकारणातील एक प्रभावशाली व्यक्तिमत्त्व मुख्यमंत्री देवेंद्र गंगाधर फडणवीस. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)

Comments