'छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन ट्रेन'ला मुख्यमंत्री फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा
- dhadakkamgarunion0
- Jun 10
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
'छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन ट्रेन'ला मुख्यमंत्री फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा
● मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे 'छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन ट्रेन'चा हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. यावेळी ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेकाला आज ३५१ वर्ष पूर्ण होत आहेत, या शुभदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या पुढाकाराने 'छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन ट्रेन' सुरू करण्यात आलेली आहे. ही ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अनेक स्थळांना घेऊन जाणार आहे आणि पुन्हा एकदा महाराजांचा इतिहास जागृत करण्याचे काम करणार आहे. छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला होता, त्या शुभदिनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून, छत्रपती शिवाजी महाराज सर्किटची भारत गौरव यात्रा ट्रेन सुरू होत आहे याचा आनंद आहे. यातून ७०० पेक्षा अधिक यात्री प्रवास करत आहेत, ज्यामध्ये चांदा ते बांदा, गडचिरोली ते गडहिंग्लज सगळ्या भागातील लोकांचा समावेश आहे, जे आपल्या शिवरायांचा इतिहास अनुभवण्यासाठी जात आहेत.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)

Commentaires