गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र सर्वोत्तम राज्य; मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
- dhadakkamgarunion0
- Sep 15
- 1 min read

🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र सर्वोत्तम राज्य; मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
● मुंबईच्या जिओ वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये आयोजित इंडिया-ऑस्ट्रेलिया बिझनेस फोरममध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला उद्योगांसाठी देशातील सर्वोत्तम राज्य बनवण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. 'ईज ऑफ डुईंग बिझनेस' अंतर्गत राज्यात गुंतवणूक आणि उद्योगांसाठी सकारात्मक वातावरण तयार केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी शासन नवनवीन धोरणे राबवत असून, भविष्यात महाराष्ट्रात गुंतवणुकीची भरभराट होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. राज्य सरकार विविध क्षेत्रांसाठी नवीन आणि परिपूर्ण धोरणे तयार करत आहे. येत्या काळात सेवा क्षेत्रासह १४ नवीन क्षेत्रांसाठी धोरणे जाहीर केली जातील. सौर ऊर्जा, अपशिष्ट व्यवस्थापन आणि पायाभूत सुविधा यांसारख्या क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीची प्रचंड क्षमता आहे. या संधींचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी ऑस्ट्रेलियन कंपन्यांना केले.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)







Comments