top of page

खोट्या नरेटिव्हचा पर्दाफाश; रवींद्र चव्हाण यांनी विरोधकांना ठणकावले

  • dhadakkamgarunion0
  • Dec 22, 2025
  • 1 min read

🔏 [ ⏺️ ध्येयपथ ]

▪️==================▪️

खोट्या नरेटिव्हचा पर्दाफाश; रवींद्र चव्हाण यांनी विरोधकांना ठणकावले

● स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जनतेने महायुतीच्या कामावर शिक्कामोर्तब केले आहे. नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निकालांनी हे स्पष्ट केले की, सर्वसामान्य मतदारांनी विरोधकांनी पसरवलेला संभ्रम पूर्णपणे फेटाळून लावला आहे. याच धर्तीवर आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतही मुंबईकर विरोधकांच्या कपटी राजकारणाला चोख प्रत्युत्तर देतील, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी म्हटले आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून येथील विकासकामे आणि पायाभूत सुविधांवर सर्वांचे लक्ष असते. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी पुन्हा एकदा जुन्याच पद्धतीचा अवलंब करत जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, मुंबईतील नागरिक सुज्ञ असून ते केवळ कामाच्या आधारावरच आपले मत देतील. मुंबईच्या प्रगतीसाठी महायुती सरकारने घेतलेले निर्णय आणि राबवलेल्या योजना मुंबईकरांना माहिती आहेत, त्यामुळे येथेही विरोधकांचा टिकाव लागणार नाही, असे चव्हाण म्हणाले. सत्य लोकांसमोर आले असून, विकासाची गती रोखण्याचे विरोधकांचे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही, असा विश्वास रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.

© -अभिजीत राणे

(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page