खरात प्रकरणात कोणाची गय केली जाणार नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी ठणकावले
- dhadakkamgarunion0
- 20 hours ago
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
खरात प्रकरणात कोणाची गय केली जाणार नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी ठणकावले
● नाशिकमधील स्वयंघोषित भोंदू मांत्रिक अशोक खरात याच्या अटकेने महाराष्ट्रभर खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत कडक शब्दांत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘अशोक खरातचा भांडाफोड आम्हीच केला आहे,’ असे सांगत त्यांनी या प्रकरणातील तपासाची व्याप्ती वाढवल्याचे जाहीर केले. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री फडणवीस यांनी पोलिसांना कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी एक विशेष तपास पथक नियुक्त करण्यात आले आहे. नाशिक पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली हे पथक काम करत असून, मुख्यमंत्री स्वतः राज्याच्या पोलीस महासंचालकांशी संपर्कात आहेत. ‘महिलांची प्रतिष्ठा आमच्यासाठी सर्वोच्च आहे आणि पीडितांना न्याय मिळेपर्यंत आम्ही थांबणार नाही,’ असे मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितले आहे. मंत्रिमंडळाची विशेष बैठक घेऊन खरातच्या संस्थेला ४० किलोमीटरची पाण्याची लाईन कोणी मंजूर केली, असा सवाल करत त्यांनी विरोधकांना आरसा दाखवला आहे. सरकार आता राज्यातील अशा सर्व भोंदू बाबांविरुद्ध मोहीम उघडण्याच्या तयारीत असून, कोणाचेही राजकीय संरक्षण अशा गुन्हेगारांना वाचवू शकणार नाही, असे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)



Comments