'काचेच्या घरात राहत नाही'; मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना टोला
- dhadakkamgarunion0
- 1 day ago
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
'काचेच्या घरात राहत नाही'; मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना टोला
● मुंबईतील भाजपाच्या नव्या प्रदेश कार्यालयाच्या भूखंडावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि इतर विरोधी पक्षांनी केलेल्या आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘ज्या लोकांना जागा बळकावण्याची सवय आहे, त्यांनी आम्हाला प्रश्न विचारू नये,’ अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी संजय राऊत आणि विरोधकांवर निशाणा साधला आहे. विरोधक ज्या भूखंडावर आक्षेप घेत आहेत, ती खासगी जागा असून ती पूर्ण नियमानुसार आणि स्वतःच्या पैशातून खरेदी केली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. फडणवीस म्हणाले की, ‘आम्ही एक निर्णय घेतला होता की सरकारी जागेच्या मागे न जाता खासगी जागा घ्यावी. मनोज कोटक यांनी ही जागा शोधून काढली. त्यावर काही लोकांनी प्रश्न उपस्थित केले. त्यांना सांगतो, भाजपा काचेच्या घरात राहत नाही. सगळे नियम पाळून, आवश्यक परवानग्या घेऊन आणि स्वतःचे पैसे खर्च करून ही जागा खरेदी करण्यात आली आहे.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)






Comments