कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या रवींद्र चव्हाणांचे सर्वच स्तरांतून कौतूक
- dhadakkamgarunion0
- Jan 22
- 1 min read
🔏 [ ⏺️ ध्येयपथ ]
▪️==================▪️
कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या रवींद्र चव्हाणांचे सर्वच स्तरांतून कौतूक
● भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणूकीच्यावेळी आपल्या जिद्दीचे दर्शन घडवले, त्याची आता चर्चा होत आहे. त्यांच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली होती, ज्यासाठी डॉक्टरांनी त्यांना पूर्णतः विश्रांती घेण्याचे निर्देश दिले होते. मात्र, पक्षकार्य आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून त्यांनी वेदना बाजूला सारून थेट प्रचाराच्या मैदानात उडी घेतली. निवडणुकीच्या धामधुमीत घरात बसणे त्यांना मान्य नव्हते. पाय दुमडणे कठीण झाल्यामुळे त्यांनी जीन्सऐवजी लुंगी परिधान करून आपला पेहराव बदलला, जेणेकरून गुडघ्यावर दबाव येणार नाही. या अनोख्या अवतारात ते मतदारांच्या भेटीला गेले. रविंद्र चव्हाण यांनी एक आदर्श प्रस्थापित केला आहे. जेव्हा एखादा मोठा नेता स्वतःच्या शारीरिक व्याधींकडे दुर्लक्ष करून जनतेमध्ये जातो, तेव्हा त्याचा सकारात्मक परिणाम मतदानावर होतो. त्यांच्या या भूमिकेचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. रविंद्र चव्हाण यांचे लुंगी घातलेले फोटो सध्या समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहेत. नेटकऱ्यांनी त्यांच्या या साधेपणाचे आणि कामाप्रती असलेल्या समर्पणाचे स्वागत केले आहे.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)








Comments