‘ऑपरेशन मुस्कान’ने दिला महिलांना नवा श्वास; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
- dhadakkamgarunion0
- Jul 17
- 1 min read
Updated: Jul 18
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
‘ऑपरेशन मुस्कान’ने दिला महिलांना नवा श्वास; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
● मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘ऑपरेशन मुस्कान’ आणि ‘ऑपरेशन शोध’मुळे हजारो महिलांना आणि बालकांना शोधण्यात यश आल्याचे सांगितले आहे. फडणवीस म्हणाले की, ‘महिला आणि मुलींच्या बेपत्ता प्रकरणांना सरकारने अत्यंत गंभीरपणे घेतले असून ऑपरेशन मुस्कानमुळे आतापर्यंत ४१९३ बालकांचा शोध लागला आहे, तर ऑपरेशन शोधमुळे एका महिन्यात तब्बल ४९६० हरवलेल्या महिलांना शोधण्यात यश आले. त्यांनी सांगितले की, नागपूरमध्येच ५८९७ प्रकरणांपैकी ५२१० व्यक्ती सापडल्या असून हे प्रमाण ९० टक्क्यांहून अधिक आहे.’ मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोणतीही व्यक्ती बेपत्ता झाल्यास तातडीने गुन्हा दाखल करणे बंधनकारक आहे. लहान मुलांच्या प्रकरणांत अपहरणाचा गुन्हा नोंदवला जातो. याशिवाय, प्रत्येक पोलीस ठाण्यात मिसिंग सेल स्थापन करण्यात येणार असून त्याची जबाबदारी महिला पोलीस अधिकाऱ्यांकडे असेल. काही महिला-मुली मानवी तस्करीच्या विळख्यात सापडत आहेत, त्यामुळे ‘भरोसा’ वन स्टॉप सेंटरद्वारे समुपदेशन, कायदेशीर मदत दिली जात आहे. शाळांमध्ये पोलीस काका-दीदी उपक्रमांतर्गत चांगला/वाईट स्पर्श तसेच आता मिसिंग पर्सनबाबतही जनजागृती केली जाईल,’ असे मुख्यमंत्री म्हणाले.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)








Comments