ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र देशाला दिशा देईल’; मुख्यमंत्री फडणवीसांचे मिशन मोडमध्ये काम करण्याचे निर्देश
- dhadakkamgarunion0
- Jun 17
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र देशाला दिशा देईल’; मुख्यमंत्री फडणवीसांचे मिशन मोडमध्ये काम करण्याचे निर्देश
● ‘जनतेला स्वस्त दरात वीज आणि राज्याला हरित ऊर्जेची क्रांती, यासाठी प्रत्येक ऊर्जा प्रकल्प वेळीच पूर्ण करा,’ असा स्पष्ट आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऊर्जा विभागाला दिला आहे. फडणवीस यांनी विशेषतः मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० ही डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी पीएम सूर्यघर योजनेतून शासकीय इमारतींचे सौर विद्युतीकरण, मॉडेल सोलर व्हिलेज योजना आणि हायड्रोजन परिसंस्थेच्या विकासासाठी संशोधन व कौशल्य विकास प्रकल्प राबवण्यावरही भर दिला. महावितरण, महापारेषण व महाउर्जा यांच्या सर्व प्रकल्पांची अंमलबजावणी गती शक्तीच्या धर्तीवर व्हावी, असे निर्देश देत ‘वीज गळती रोखा आणि जनजागृती वाढवा,’ असा संदेशही त्यांनी दिला. ‘ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र देशाला दिशा देईल, यासाठी प्रत्येक अधिकाऱ्याने मिशन मोडमध्ये काम करा,’असे आवाहन करत फडणवीस यांनी हरित ऊर्जा विकासालाच पुढील दशकातील ‘गेम चेंजर’ म्हणून घोषित केले.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)

Comments