top of page

ऊर्जा क्षेत्राचा हायटेक कायापालट; मुख्यमंत्री फडणवीसांचा एआय मंत्र!

  • dhadakkamgarunion0
  • Apr 20
  • 1 min read

🔏 [ ⏺️ पंचनामा ]

▪️==================▪️

ऊर्जा क्षेत्राचा हायटेक कायापालट; मुख्यमंत्री फडणवीसांचा एआय मंत्र!

● उन्हाळ्याच्या तीव्र झळा आणि आगामी पावसाळ्याचे संकट लक्षात घेता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऊर्जा क्षेत्राच्या सज्जतेसाठी पुढाकार घेत अत्यंत धोरणी भूमिका घेतली आहे. राज्याचा वीजपुरवठा विनाखंडित राहावा, यासाठी त्यांनी घेतलेली आढावा बैठक ही त्यांच्या नियोजित कार्यपद्धतीची प्रचिती देते. फडणवीस यांनी तंत्रज्ञानाचा कल्पक वापर करण्यावर भर दिला आहे. देखभाल आणि दुरुस्तीच्या कामात ‘एआय’ (कृत्रिम बुद्धिमत्ता) वापरण्याच्या त्यांच्या सूचनेमुळे राज्याच्या ऊर्जा व्यवस्थापनात आधुनिकीकरणाची नवी दिशा मिळाली आहे. रूफटॉप सौर ऊर्जेला प्रोत्साहन देऊन त्यांनी भविष्यातील ऊर्जेचे महत्त्व अधोरेखित केले आहे. कोळसा आणि पाणी उपलब्धतेचे उत्तम नियोजन आणि मान्सूनपूर्व कामांमधील सतर्कता ही त्यांच्या कार्यक्षम नेतृत्वाची लक्षणे आहेत. आपत्कालीन परिस्थितीत जनतेला कोणताही त्रास होऊ नये, याकडे फडणवीसांचे असलेले बारकाईने लक्ष, त्यांच्या जबाबदार आणि दूरदर्शी नेतृत्वाची साक्ष देते.

© -अभिजीत राणे

(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page