आरोग्य सेवेत क्रांती; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत रुग्णांसाठी ऐतिहासिक निर्णय!
- dhadakkamgarunion0
- 15 minutes ago
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
आरोग्य सेवेत क्रांती; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत रुग्णांसाठी ऐतिहासिक निर्णय!
● राज्यातील लाखो गरजू रुग्णांसाठी सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. नुकत्याच झालेल्या राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या नियामक परिषदेच्या बैठकीत, आरोग्य सेवा अधिक सुलभ आणि प्रभावी बनवण्यासाठी अनेक क्रांतिकारक बदल करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे उपचारांची संख्या वाढणार असून, ग्रामीण भागातील रुग्णांनाही याचा मोठा फायदा होणार आहे. विशेषतः महागड्या आणि दुर्मीळ उपचारांसाठी स्वतंत्र निधीची व्यवस्था करण्यात आली आहे, ज्यामुळे अनेक रुग्णांना जीवनदान मिळणार आहे. हृदय, फुफ्फुस, किडनी प्रत्यारोपणासह नऊ महागडे उपचार रुग्णांसाठी जवळजवळ अशक्य ठरत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या नियामक परिषदेच्या बैठकीत या समस्येवर तोडगा काढण्यात आला. आता अशा महागड्या उपचारांसाठी विशेष कॉर्पस फंड उभारण्यात येणार असून, त्यातून हे उपचार दिले जातील. यासोबतच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जनआरोग्य योजना अंतर्गत उपचारांची संख्या १३५६ वरून थेट २३९९ पर्यंत वाढविण्यात आली आहे. आरोग्य मित्रांची संख्या वाढवण्यापासून ते कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अॅप आणि चॅटबॉटद्वारे माहिती देण्यापर्यंत अनेक सुधारणा राबविण्याचा निर्णय झाला आहे.’
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)
Comments