top of page

आमदार जनसंपर्क कार्यालय, वसई पश्चिम ते पंचवटी नाका, वसई पश्चिम...

dhadakkamgarunion0
Aug 16
9 min read

DAILY MUMBAI MITRA

आमदार जनसंपर्क कार्यालय, वसई पश्चिम ते पंचवटी नाका, वसई पश्चिम

दिनांक : 13 ऑगस्ट 2026


"वसईच्या मातीत घुमला 'भारत माता की जय'चा जयघोष; भव्य तिरंगा यात्रेत देशभक्तीचा महासागर!"


भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात 10 ते 17 ऑगस्ट 2026 या कालावधीत 'हर घर तिरंगा' अभियान उत्साहात राबविण्यात येत आहे. या अभियानाला जनसहभागाची आणि राष्ट्रप्रेमाची अबद्ध जोड देण्यासाठी भारतीय जनता पार्टी वसई विधानसभा यांच्या माध्यमातून आज गुरुवार, दिनांक 13 ऑगस्ट 2026 रोजी आमदार जनसंपर्क कार्यालय, वसई पश्चिम ते पंचवटी नाका, वसई पश्चिम अशी भव्य 'तिरंगा यात्रा' आयोजित करण्यात आली.


हात अभिमानाने डौलाने फडकणारा राष्ट्रध्वज तिरंगा, ओठांवर 'भारत माता की जय' आणि 'वंदे मातरम' चा जयघोष, तसेच नाशिक ढोल-ताशांच्या गजराने संपूर्ण वसई पश्चिम परिसर देशभक्तीच्या उत्साहाने भारावून गेला. प्रत्येकाच्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना जागवणारा आणि स्वातंत्र्याच्या अमूल्य मूल्यांची जाणीव करून देणारा हा क्षण अत्यंत भावस्पर्शी ठरला.


या तिरंगा यात्रेत माजी गोल्ड मेडलिस्ट सैनिक, पोलिस बांधव, स्थानिक नागरिक, शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी, महिला भगिनी, नगरसेवक-नगरसेविका तसेच प्रदेश, जिल्हा व मंडळ पातळीवरील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.


तिरंगा हा केवळ आपल्या देशाचा ध्वज नाही, तर तो आपल्या शौर्याचा, बलिदानाचा, स्वाभिमानाचा आणि अखंड राष्ट्रभक्तीचा गौरव आहे. स्वातंत्र्यवीरांच्या त्यागातून मिळालेल्या या स्वातंत्र्याचा अभिमान प्रत्येक भारतीयाच्या मनात सदैव जागता राहावा आणि 'हर घर तिरंगा'च्या माध्यमातून प्रत्येक घराघरात राष्ट्रप्रेमाची ज्योत प्रज्वलित व्हावी, हाच या तिरंगा यात्रेचा संदेश आहे.


राष्ट्रध्वजाचा सन्मान, देशाचा अभिमान आणि राष्ट्रप्रेमाचा संकल्प घेऊन वसई विधानसभेने आज पुन्हा एकदा 'राष्ट्र प्रथम'चा संदेश दिला!


- Sneha Dube Pandit

MLA Vasai Constituency, Maharashtra

Read Full Article 🌐 http://mumbaimitra.com


DAILY MUMBAI MITRA

Partition remains a dreadful chapter in our history, one that caused immense suffering, impacted countless lives & left deep scars on generations.


On #PartitionHorrorsRemembranceDay, we honour those who endured the hardships of Partition, rebuilt their lives with courage & upheld the spirit of humanity even in the face of unimaginable adversity.


Let us remember this day as a testament to the strength & resilience of our people, and reaffirm our resolve to uphold harmony, brotherhood & unity as we work towards building a Viksit Bharat.


- पीयूष गोयल

वाणिज्य आणि उद्योग मंत्री भारत शासन

Read Full Article 🌐 http://mumbaimitra.com


DAILY MUMBAI MITRA

वसई-विरारच्या तरुणांच्या रोजगारासाठी आर्थिक विकास केंद्राची दिशा!


वसई-विरार परिसरातील वाढती लोकसंख्या आणि रोजगाराच्या मर्यादित संधी लक्षात घेता, स्थानिक तरुणांना आपल्या शहरातच मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या प्रमुख उद्देशाने सातत्याने पाठपुरावा होत आहे


याच अनुषंगाने दि. 30 डिसेंबर 2024 रोजी मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी यांना पत्राद्वारे नालासोपारा (प.) येथील सुमारे 1,300 एकर शासकीय जागेवर आर्थिक विकास केंद्र उभारण्याची मागणी केली होती.


या पत्राद्वारे सदर जमीन MMRDA कडे हस्तांतरित करून त्या ठिकाणी सेंट्रल बिजनेस डिस्ट्रिक्ट आणि आर्थिक विकास केंद्र विकसित करण्याची मागणी करण्यात आली होती. या प्रकल्पामुळे वसई-विरारच्या तरुणांना रोजगारासाठी मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे येथे जाण्याची आवश्यकता कमी होऊन आपल्याच शहरात रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होतील, हा या मागणीमागील प्रमुख उद्देश आहे.


माझ्या या मागणीची सकारात्मक दखल घेत मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मा. पालकमंत्री श्री. गणेश नाईक जी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या आर्थिक विकास केंद्राच्या उभारणीच्या दृष्टीने सकारात्मक कार्यवाहीला गती मिळाली आहे.


या आर्थिक विकास केंद्रामुळे सुमारे 3 लाख तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची क्षमता असून, लॉजिस्टिक्स, डेटा सेंटर, आयटी पार्क, कन्वेन्शन सेंटर, उद्योग, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रांला मोठी चालना मिळणार आहे.


वसई-विरारच्या तरुणांना रोजगारासाठी बाहेर जावे लागू नये, तर रोजगार देणारे वसई-विरार निर्माण व्हावे, हीच माझी भूमिका आणि प्रयत्न आहे.


या मागणीची सकारात्मक दखल घेतल्याबद्दल मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी आणि मा. पालकमंत्री श्री. गणेश नाईक जी यांचे मन:पूर्वक आभार!


वसई-विरारच्या विकासासाठी आणि तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा पाठपुरावा यापुढेही सातत्याने सुरू राहील.


- राजन नाईक

आमदार नालासोपारा विधानसभा

Read Full Article 🌐 http://mumbaimitra.com


DAILY MUMBAI MITRA

कधी कधी कार्याच्या धावपळीत, आपल्या पाठीशी उभ्या असलेल्या माणसांची आणि त्यांच्या आशीर्वादांची व्याप्ती आपण नकळत विसरून जातो.


पण आज डोळ्यांसमोर उभा राहिलेला हा विराट जनसागर पाहताना, त्या प्रत्येक लाटेसोबत माझ्यापर्यंत पोहोचणारा स्नेह, विश्वास आणि आशीर्वाद मनाला अक्षरश: स्पर्शून गेला.


वाढदिवसानिमित्त उमटलेली ही प्रेमाची लाट... तिची व्याप्ती, तिची उंची आणि तिची खोली ~ शब्दांच्या पलीकडची आहे.


आपल्या या स्नेहापुढे व्यक्त होण्यासाठी शब्द कमी पडतात..


एवढीच जाणीव मनात घेऊन पुढे जात आहे की, प्रत्येक पावलामागे असंख्य अंधेरीकरांचा विश्वास उभा आहे.


आज मिळालेला हा स्नेह आणि आशीर्वाद मनात साठवून पुन्हा कामाला लागलो आहे ~ अधिक नम्रतेने, अधिक जबाबदारीने.


या अखंड पाठबळासाठी... सदैव कृतज्ञ.


- मुर्जी पटेल

आमदार अंधेरी पूर्व विधानसभा

Read Full Article 🌐 http://mumbaimitra.com


DAILY MUMBAI MITRA

8व्या वेतन आयोगाने कंत्राटी पद्धतीने सल्लागारांची नियुक्ती करण्याच्या नियमांमध्ये 'यंग प्रोफेशनल' अर्थात तरुण व्यावसायिकांच्या श्रेणीसाठी किमान 4 वर्षांचा अनुभव ही अट कमी करून 2 वर्षांवर आणण्यात आली आहे. त्याचबरोबर या श्रेणीतील पदांची कमाल संख्या 10 वरून थेट 16 करण्यात आली आहे.

8व्या वेतन आयोगाच्या या निर्णयाचे आम्ही मनापासून स्वागत करतो


- अतुल भातखळकर

आमदार कांदिवली पूर्व विधानसभा

Read Full Article 🌐 http://mumbaimitra.com


DAILY MUMBAI MITRA

विविधतेत एकता, हीच आपल्या भारताची महानता!


हिमालयापासून हिंद महासागरापर्यंत पसरलेल्या या देशात हजारो संस्कृती आहेत, पण सर्वांची धडधड एकच आहे- आपला तिरंगा! 2022 मध्ये सुरू झालेली #HarGharTiranga मोहीम आज प्रत्येक भारतीयाचा स्वाभिमान बनली आहे.


चला, या ऐतिहासिक प्रसंगी आपल्या घरी अभिमानाने तिरंगा फडकवूया आणि देशासाठी प्राण पणाला लावणाऱ्या अमर शहीदांचे स्मरण करूया!


- अमित साटम

आमदार अंधेरी पश्चिम विधानसभा

Read Full Article 🌐 http://mumbaimitra.com


DAILY MUMBAI MITRA

मुंबई ही सर्व जाती-धर्मातील लोकांची आहे. कोणी काय खावे आणि काय खाऊ नये, हा त्यांच्या वैयक्तिक प्रश्न आहे. शाकाहार आणि मांसाहार यावरून पेटलेला मुद्दा हा जाणीवपूर्वक केला आहे का? याचा तपास करून संबंधितांवर कारवाई करावी. मी घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करतो.


- मंगल प्रभात लोढा

आमदार मलबार हिल विधानसभा

Read Full Article 🌐 http://mumbaimitra.com


DAILY MUMBAI MITRA

संसदेचे पावसाळी अधिवेशन आज पूर्ण झाले. लोकशाही चर्चा, अर्थपूर्ण संवाद आणि जनसेवेच्या दृष्टीने हा काळ अत्यंत महत्वाचा ठरला.

लोकसभेत सहकारी खासदारांसोबत देशाच्या प्रगतीसाठी, जनतेच्या आकांक्षांना आवाज देण्यासाठी आणि लोककल्याणकारी धोरणांवर काम करण्याचा निरंतर प्रयत्न राहिला आहे.

सहकाऱ्यांचे सहकार्य आणि राष्ट्रसेवेची ही बांधिलकी अशीच पुढे चालू राहील.


- रवींद्र वायकर

लोकसभा सदस्य

Read Full Article 🌐 http://mumbaimitra.com


DAILY MUMBAI MITRA

नगरसेवक हर्ष पटेल यांच्या कार्यालयाला भेट दिली आणि उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. यावेळी माजी नगरसेवक दिपक ठाकूर, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


- अॅड. आशिष शेलार

विद्यमान कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र शासन

Read Full Article 🌐 http://mumbaimitra.com


DAILY MUMBAI MITRA

'निर्व्यसनी युवा, सक्षम सिंधुदुर्ग' या संकल्पनेवर आधारित सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या 'नशामुक्त सिंधुदुर्ग अभियानाचा' शुभारंभ आज सन्मा.खासदार श्री.नारायणराव राणे साहेबांच्या हस्ते इच्छापूर्ती मंगल कार्यालय, ओरोस येथे पार पडला.


सिंधुदुर्गच्या तरुण पिढीला व्यसनांपासून दूर ठेवणे आणि त्यांना सक्षम, निरोगी व उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जाणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. जिल्ह्याच्या विकासाचे स्वप्न पाहताना राणे साहेबांनी सिंधुदुर्गला नशामुक्त आणि अवैध प्रकारांपासून मुक्त ठेवण्यासाठीही सातत्याने प्रयत्न केले आहेत.


जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याची जबाबदारी जशी आपली आहे, तशीच जिल्ह्याला नशामुक्त ठेवण्याचीही आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस दलाच्या या अभियानाला सर्वांनी सहकार्य करून ते प्रभावीपणे आणि काटेकोरपणे राबविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी केले.


कार्यक्रमास सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक डॉ.मोहन दहिकर, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.रवींद्र खेबडकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक नयोमी साटम, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्यासह विद्यार्थी व पोलीस बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


- नितेश राणे

महाराष्ट्र शासन मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री

Read Full Article 🌐 http://mumbaimitra.com


DAILY MUMBAI MITRA

14 ऑगस्ट - 'विभाजन विभीषिका स्मृतिदिन'.

एका निर्णयाने केवळ नकाशावर सीमारेषा उमटली नाही; असंख्य कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. मातृभूमी सोडताना ज्यांनी सर्वस्व गमावले, त्या लाखो निष्पाप बंधू-भगिनींचे दु:ख आणि त्याग विसरता येणार नाही. त्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली.


- योगेश सागर

आमदार कांदिवली पश्चिम विधानसभा

Read Full Article 🌐 http://mumbaimitra.com


DAILY MUMBAI MITRA

शाश्वत विकास आणि पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने मुंबईने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे! आज नीलकंठ बिझनेस पार्क येथे 450 KWP क्षमतेच्या रूफटॉप सोलर पॉवर प्लँटचे लोकार्पण उत्साहात पार पडले.


नगरसेवक श्री. प्रविन छेडा जी यांच्या विशेष पुढाकाराने उभारण्यात आलेला हा प्रकल्प केवळ विजेची बचत करणार नाही, तर कार्बन उत्सर्जित होण्याचे प्रमाण कमी करून आपल्या शहराला अधिक हरित बनवण्यात मोठी भूमिका बजावेल.


या स्तुत्य उपक्रमाबद्दल श्री. प्रविन छेडा जी आणि नीलकंठ बिझनेस पार्कच्या सर्व व्यवस्थापकांचे मन:पूर्वक कौतुक व अभिनंदन!


- रितू तावडे

मुंबई महापौर

Read Full Article 🌐 http://mumbaimitra.com


DAILY MUMBAI MITRA

विभाजन विभीषिका स्मृति दिवस पर विस्थापन के दौरान त्रासदी झेलने वाले, अपनी जड़ों से बिछड़ने वाले और जान गंवाने वाले सभी मासूम नागरिकों एवं उनके परिवारों के असीम त्याग और संघर्ष को सादर नमन।


- विद्या ठाकूर

आमदार गोरेगाव विधानसभा

Read Full Article 🌐 http://mumbaimitra.com


DAILY MUMBAI MITRA

वंदे मातरम् – केवळ एक गीत नाही, तर आपल्या राष्ट्राच्या हृदयाची धडधड आहे.


हर घर तिरंगा अभियानाच्या निमित्ताने स्वातंत्र्य, एकता आणि मातृभूमीवरील प्रेमाचा उत्सव साजरा करूया.


वंदे मातरम चे अमर स्वर प्रत्येक मनात देशप्रेम आणि अभिमान जागवोत. ✨


जय हिंद! वंदे मातरम्!


- पराग अळवणी

आमदार विले पार्ले विधानसभा

Read Full Article 🌐 http://mumbaimitra.com


DAILY MUMBAI MITRA

एकीात्मिक जलव्यवस्थापन आणि आधुनिक पायाभूत सुविधांची भक्कम पायाभरणी करत सक्षम, समृद्ध महाराष्ट्राचा संकल्प साकार करणाऱ्या दिवसातील काही खास क्षण...


- देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य

Read Full Article 🌐 http://mumbaimitra.com


DAILY MUMBAI MITRA

नांदेड येथील गुरुद्वारा परिसरात पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर झालेला हल्ला अत्यंत निंदनीय आणि धक्कादायक आहे.


मी आज खासदार हरसिमरत कौर बादल यांच्याशी फोनवरून संवाद साधून सुखबीर सिंग बादल यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली व ते लवकरात लवकर पूर्णपणे स्वस्थ व्हावेत अशी प्रार्थना केली. या घटनेची गंभीर दखल घेऊन मी तात्काळ नांदेडच्या पोलीस अधीक्षकांशी चर्चा केली असून तपासाचे कडक निर्देश दिले आहेत. या हल्ल्यातील दोषींवर अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल आणि त्यांना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाणार नाही.


-एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य

Read Full Article 🌐 http://mumbaimitra.com


DAILY MUMBAI MITRA

चाकण एमआयडीसीतील समस्या प्राधान्यांनं सोडवणार!


चाकण एमआयडीसीतील रस्ते, वाहतूक तसंच अन्य पायाभूत सुविधांशी संबंधित अडचणी प्राधान्यांनं सोडवण्यात येतील. या समस्यांवर तातडीनं मार्ग काढण्यासाठी चाकण येथील उद्योजक, एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी, स्थानिक प्रशासन तसंच जिल्हा प्रशासनासोबत लवकरच बैठक घेण्यात येईल.


या संदर्भात आज चाकण नागरी कृती समिती व औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी धनंजय शेडबाळे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. उद्योजकांच्या समस्या जाणून घेतल्या तसंच त्या सोडवण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत त्यांना आश्वस्त केलं.


या प्रश्नांच्या अनुषंगानं एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेदसिंह कुशवाह, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी,पीएमआरडीएचे आयुक्त अभिजीत चौधरी, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, खेडचे प्रांत अधिकारी अनिल दौंडे आणि चाकण नगर परिषदेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.


चाकणच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी पायाभूत सुविधा सक्षम करणं ही प्राथमिकता आहे. सर्व संबंधितांना विश्वासात घेऊन समन्वयांनं या समस्यांवर लवकरच ठोस मार्ग काढण्यात येईल.


- सुनेत्रा पवार

उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य

Read Full Article 🌐 http://mumbaimitra.com


DAILY MUMBAI MITRA

ED, Mangalore Sub Zonal Office, has arrested Shivanand Siddappa Neelannavar on 13/8/2026 under PMLA, 2002, in the case relating to multi state & multi crore unsustainable Ponzi-style scheme, matter related to defrauding investors by promising high and assured returns. He was produced before the Hon'ble Special Court (PMLA), Mangalore, who has remanded him to the custody of the ED for a period of 12 days, up to 24.08.2026. He is the "whole and sole" person managing the fund flow of M/s. Shivam Associates.


- Enforcement Directorate (ED)

Read Full Article 🌐 http://mumbaimitra.com


DAILY MUMBAI MITRA

A historic chapter in Mumbai's underground connectivity.


TBM-2 'Arjuna' has launched from the Thane side to begin excavation of the second tunnel of the Thane-Borivali Twin Tunnel Project, taking India's longest and deepest urban road tunnel project another major step forward.


Arjuna, the country's largest single-shield hard-rock TBM for an urban tunnel, will work alongside TBM-1 'Nayak', which is already progressing with excavation of the first tunnel.


Together, the two machines will create 10.25 km of twin tunnels as part of the 11.84-km Thane-Borivali corridor, passing deep beneath the Sanjay Gandhi National Park with minimal surface disturbance.


Once completed, the project is expected to transform the Thane-Borivali journey, bringing travel time down from around 60-90 minutes to approximately 15 minutes, while easing congestion, reducing fuel consumption and emissions, and creating a faster, safer and more efficient connection across the MMR.


Nayak started the journey. Arjuna carries it forward.


Two TBMs. Two tunnels. One transformative connection.


- MMRDA

Read Full Article 🌐 http://mumbaimitra.com


DAILY MUMBAI MITRA

India's Urban Planning Goes Digital as GIS Reshapes City Master Plans


Under AMRUT, 461 cities across 35 States/UTs are onboarded, with geospatial databases completed for 437 and GIS-based Master Plans finalised for 292

Read Full Article 🌐 http://mumbaimitra.com


DAILY MUMBAI MITRA

REITs May Get More Tax Flexibility, Better Cash Flow Visibility Under New


Tax amendments could give REITs greater flexibility in managing taxes, unlocking MAT credits and improving cash-flow visibility, while supporting capital allocation and investor distributions

Read Full Article 🌐 http://mumbaimitra.com


DAILY MUMBAI MITRA

21 CBI Officers / Officials Honoured with President's Medal for Distinguished Service and Medal for Meritorious Service on the occasion of Independence Day-2026


- Central Bureau of Investigation (CBI)

Read Full Article 🌐 http://mumbaimitra.com

---

DAILY MUMBAI MITRA

महाराष्ट्राच्या मातीतून ऑलिम्पिकमध्ये भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवणारे भारतीय वैयक्तिक पदकविजेते पहिले ऑलिम्पिक वीर खाशाबा जाधव यांना पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण आदरांजली!


- प्रविण दरेकर

महाराष्ट्र विधान परिषद सदस्य

Read Full Article 🌐 http://mumbaimitra.com


DAILY MUMBAI MITRA

Maharashtra Makes Structural Safety, Rainwater Harvesting Mandatory for Old Buildings


Maharashtra has made structural safety and environmental compliance mandatory for old buildings seeking new water, drainage and other utility connections from civic authorities

Read Full Article 🌐 http://mumbaimitra.com


DAILY MUMBAI MITRA

Dwarka Expressway Emerges as Gurugram's Top Luxury Housing Corridor in H1 2026


Dwarka Expressway posted Gurugram's strongest luxury housing growth in H1 2026, with rising property values and rents, backed by HNI, NRI demand

Read Full Article 🌐 http://mumbaimitra.com


DAILY MUMBAI MITRA

Pune Office Leasing Hits Record H1 High as Housing Launches Rise 17%


Pune's office leasing reached a record 6.6 million sq. ft in H1 2026, up 29% YoY, while residential sales held steady at 24,890 units

Read Full Article 🌐 http://mumbaimitra.com


DAILY MUMBAI MITRA

Why India's Emerging Cities Could Power the Next GCC Wave


India's emerging cities are attracting GCCs with lower costs, expanding talent pools, better infrastructure and government support, reshaping the country's global capability landscape

Read Full Article 🌐 http://mumbaimitra.com


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page