अमित साटम यांनी काढले ठाकरेंच्या कारभाराचे वाभाडे
- dhadakkamgarunion0
- Jan 8
- 1 min read
🔏 [ ⏺️ साटम पॅटर्न ]
▪️==================▪️
अमित साटम यांनी काढले ठाकरेंच्या कारभाराचे वाभाडे
● भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी एक 'आरोपपत्र' प्रसिद्ध केले आहे. त्यात त्यांनी म्हटले की, मुंबई महापालिकेच्या विविध प्रकल्पांमध्ये पारदर्शकता नसून मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाले आहेत. रस्ते बांधणीपासून ते आरोग्य सुविधांपर्यंत प्रत्येक कामात 'कमिशन'खोरी चालत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. साटम यांच्या मते, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील काळात मुंबईचा विकास खुंटला असून केवळ विशिष्ट कंत्राटदारांचे खिसे भरले गेले आहेत. मुंबईच्या महत्वाकांक्षी 'कोस्टल रोड' प्रकल्पावरूनही साटम यांनी ठाकरेंना लक्ष्य केले. "या प्रकल्पाचे खरे नियोजन आणि गती देवेंद्र फडणवीस यांच्या काळात मिळाली, मात्र आता त्याचे श्रेय घेण्याचे काम ठाकरे गट करत आहे," असे साटम म्हणाले. पालिकेतील सत्ता गमावण्याच्या भीतीने ठाकरे गट आता खोटा प्रचार करत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. मुंबईतील पायाभूत सुविधांच्या दुरवस्थेला ठाकरे जबाबदार असल्याचेही त्यांनी नमूद केले. महापालिका निवडणुकीत मुंबईकर ठाकरेंच्या अहंकारी वृत्तीला नक्कीच उत्तर देतील, असा विश्वास साटम यांनी व्यक्त केला.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)








Comments