अमित साटम यांचा मुंबईच्या विकासाचा नवा संकल्प
- dhadakkamgarunion0
- 7 minutes ago
- 1 min read
🔏 [ ⏺️ साटम पॅटर्न ]
▪️==================▪️
अमित साटम यांचा मुंबईच्या विकासाचा नवा संकल्प
● भाजपाचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार अमित साटम यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटावर जोरदार टीका केली आहे. महायुती आगामी निवडणुकीत ठाकरेंचा पराभव करण्यासाठी पूर्णपणे सज्ज असून, मुंबईकर आता त्यांना घरचा रस्ता दाखवतील, असा दावा साटम यांनी केला आहे. मुंबईच्या विकासासाठी आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी महायुतीचा महापौर बसवणे हेच आमचे मुख्य ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अमित साटम यांनी ठाकरेंच्या २५ वर्षांच्या कारभारावर बोट ठेवत, मुंबईची लूट झाल्याचा आरोप केला आहे. अमित साटम यांनी म्हटले की, गेल्या अडीच दशकांपासून मुंबई महानगरपालिकेत एकाच कुटुंबाची सत्ता होती, मात्र या काळात केवळ भ्रष्टाचार वाढला. जनतेच्या पैशांचा गैरवापर झाला असून विकासाची कामे रखडली आहेत. आता जनता या सर्व गोष्टींचा हिशोब मागणार असून आगामी निवडणुकीत महायुती या सर्व गैरप्रकारांचा पर्दाफाश करेल. ठाकरेंच्या पराभवासाठी महायुतीचे सर्व घटक पक्ष एकजुटीने मैदानात उतरले असून, यावेळेस मुंबईवर महायुतीचा भगवा फडकणार हे निश्चित आहे.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)








Comments