अभिजीत राणे लिहितात
- dhadakkamgarunion0
- Jun 25
- 3 min read
अभिजीत राणे लिहितात
वारी ही हिंदू धर्मियांची गेली 7-8 शतके अखंडित राहिलेली धार्मिक परंपरा आहे. वारी करतो तो वारकरी. हा वारकरी केवळ आळंदी ते पंढरपूर किंवा देहु पंढरपूर पायी प्रवास करतो आहे या भूमिकेतून याच्याकडे बघणे चूक आहे. वारकरी हा भावसागर अर्थात जन्ममरणाच्या ज्या फेर्यात तो अडकला आहे त्याच्या पार जाण्यासाठी वारी करतो आहे. अर्थात हा त्याचा आध्यात्मिक प्रवास आहे. आपण मंदिरात प्रदक्षिणा घालतो त्याप्रमाणे ही त्याची पृथ्वी प्रदक्षिणा आहे जी तो पांडुरंगाच्या चरणी लीन करून मोक्ष मागतो आहे. त्यामुळे वारी ही धार्मिक आहे , आध्यात्मिक आहे, हा आत्मउन्नतीचा प्रवास आहे. वारी मध्ये कोणकोणत्या दिंडी असाव्यात त्यासंदर्भात सुस्पष्ट नियम आहेत. जिथे गर्दी जमा होते तिथे आपले घाणेरडे आणि हिंदू द्वेषी विचार जाऊन पेरणे ही नीच , हलकट, हिंदूद्वेष्ट्या आणि समाजकंटक मानसिकतेच्या लोकांची प्रवृत्ती आहे. गेली काही वर्षे समता , दिंडी संविधान दिंडी या नावाने हे तमाशे सुरू झाले आहेत. यावर्षी तर अर्बननक्षल म्हणून कुप्रसिद्ध असणारी मंडळी आणि त्यांच्या जोडीला मुसलमान लोक समता दिंडी घेऊन उतरत आहेत. महाराष्ट्र शासनाला विनंती आहे हिंदू धार्मिक परंपरेत हा हस्तक्षेप आहे. शासनाने या लोकांना वारीमध्ये प्रवेश नाकारावा. अन्यथा या मुद्द्यावरून कायद्या सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
अभिजीत राणे लिहितात
एम आय एम चे नेते इम्तियाज जलिल यांनी शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांच्या पुष्ट्यर्थ त्यांनी पुरावे सुद्धा दिल्याने संजय शिरसाट अडचणीत आल्याचे चित्र आहे. संजय शिर्साट,पत्नी आणि मुलांनी हायकोर्टाजवळील १२,००० चौरस फुट भूखंड अवघ्या ₹४,८००/चौरस फुट दराने खरेदी केला. या जमिनीची किंमत कोट्यावधी रुपये आहे. दलित राखीव जमीन व सरकारी जमिनी देखील शिर्साट यांच्या कुटुंबाने अत्यल्प दरात खरेदी केल्या जसे की १० एकर ₹१.१ कोटींना आणि २ एकर ₹६० लाखांमध्ये. हॉटेल व इमारतीच्या बांधकामासाठी बेकायदेशीररित्या मुरूम उत्खनन करण्यात आले आणि शासनाला रॉयल्टी न भरता काम केले गेले सिद्धांत शिर्साट यांना शेंद्रामधील ट्रक टर्मिनससाठी राखीव असलेली एमआयडीसीची २१,२७५ चौरस मीटर जमीन डिस्टिलरी प्रकल्पासाठी राजकीय दबावाखाली देण्यात आली. या सगळ्या आरोपामुळे व्यथित संजय शिरसाट यांनी जलिल यांच्याविरुद्ध अॅट्रोसिटीची तक्रार दाखल केली आणि त्यांच्या चिथावणीने त्यांच्या समर्थकांनी जलिल यांच्या निषेधार्थ मोर्चा काढला. परंतु या चोराच्या उलट्या बोंबा असून या प्रकरणात शिरसाट आणि महायुती सरकार चांगलेच अडचणीत आल्याचे वृत्त आहे.
अभिजीत राणे लिहितात
शरद पवारांना निवडणुकीतील पराभव पचवता येत नाही हे कटू सत्य आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत पवारांना ज्ञानेश्वर आगाशे यांनी पराभूत केले होते आणि त्याचा सूड पवारांनी आगाशेंना अक्षरशः भिकेला लावून घेतला होता. काल पुतण्याने मालेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत काकांना पराभूत करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केल्याचे दिसून येते आहे. सुरूवातीचे निकाल बघून पवारांनी सुद्धा सत्ताधारी असणार्या लोकांनी सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुका लढवू नये अशी भूमिका मांडून अप्रत्यक्षरित्या आपला पराभव मान्य केला आहे. परंतु हे वक्तव्य म्हणजे तेंव्हा कोठे गेला होता राधासुता तुझा धर्म ? असा प्रश्न विचारावे असेच आहे. कारण संपूर्ण आयुष्यभर शरद पवार हे सहकारातील सत्तेच्या बळावर राजकीय सत्ता मिळवत असत आणि राजकीय सत्तेच्या बळावर सहकारातील सारिपाट खेळत असत. आज स्वतःच्याच पुतण्याने आपल्याला आपल्याच चालीने पराभूत केल्यावर तो पराजय पचवण्याचा दिलदारपणा पवारांकडे नाही हे उघड झाले आहे.
अभिजीत राणे लिहितात
मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून हे अंतर फक्त 8 तासावर आणण्यात शासनाला यश प्राप्त झाले आहे आता त्याच धर्तीवर नागपूर ते गोवा या शक्तीपीठ मार्गाला सुद्धा काल महाराष्ट्र शासनाने मंजूरी दिली असून त्यासाठी तब्बल 21000 कोटी रुपये खर्च येणार आहे. या मार्गामुळे रेणुका देवी माहुर, तुळजाभवानी देवी तुळजापूर, अंबाबाई कोल्हापूर अशी अडीच शक्तीपिठे जोडली जाणार आहेत. केवळ सप्तशृंगी देवी वणी हे मंदिर या मार्गात येत नाही. या मार्गामुळे नागपूर ते गोवा हे दळणवळण सुलभ होईल आणि हा प्रवास सुद्धा केवळ 8 तासात पूर्ण होऊ शकेल. या मार्गामुळे विदर्भ , मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र परस्परांना जोडले जटिल परंतु पुणे पुर्णपणे बायपास होईल. यामुळे पुण्यावरील वाहातूकीचे ओझे सुद्धा थोडे कमी होईल. या मार्गाला पश्चिम महाराष्ट्रातील शेतकर्यांचा कडाडून विरोध असताना सुद्धा सरकारने या मार्गाची घोषणा केली आहे. शेतकर्यांना भूसंपादनात उत्तम मोबदला देऊन आणि जिथे खूप विरोध आहे तिथे एलिव्हेटेड पद्धतीचा महामार्ग बनवून सरकार या समस्येवर मात करू शकेल. एक विकासाभिमुख निर्णय घेतल्याबद्दल महायुती सरकारचे आणि देवेन्द्रजींचे अभिनंदन
अभिजीत राणे लिहितात
महाविकास आघाडी सरकार असताना ज्या मुद्द्यावरून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकार्यांनी बंड केले होते त्याच मुद्द्यावरून यावेळी महायुती सरकारमध्ये धुसफूस सुरू झाली आहे. महाविकास आघाडीच्या विरोधात बंड करताना एकनाथ शिंदे यांनी दिलेले मुख्य कारण म्हणजे अजित पवार अर्थमंत्री म्हणून शिवसेनेच्या आमदारांना निधीवाटपात सापत्न वागणूक देत होते. नंतर शिंदे आणि भाजपा यांनी सरकार स्थापन केले. शिंदे मुख्यमंत्री झाले. काही काळाने परत एकदा अजित पवार अर्थमंत्री झाले. पण शिंदे मुख्यमंत्री असल्याने त्यांनी आपल्या आमदार आणि मंत्र्यांवर अन्याय होऊ दिला नाही. आता महायुती सरकार मध्ये परत तीच समस्या उद्भवली आहे आणि शिवसेनेचे आमदार आणि मंत्री अजित पवारांवर प्रचंड नाराज आहेत. ही नाराजी त्यांनी अजित पवारांना कळवली आहे आणि परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर महायुतीत सुद्धा संघर्ष पेटू शकतो. पण या परस्पर वादावादीत भाजपा आणि देवेंद्रजी फडणवीस यांची भूमिका काय ? आणि भाजपा आमदार आणि मंत्रीपण अजित पवारांवर नाराज आहेत का नाहीत हे अजून तरी कळू शकले नाही.
#WariTradition #ReligiousIntegrity #SanjayShirsat #CorruptionAllegations #SharadPawarDefeat #NagpurGoaExpressway #PoliticalTensions #ShindeVsAjit #MaharashtraPolitics #AbhijeetRaneWrites








Comments