top of page

🖋️ अभिजीत राणे लिहितात

  • dhadakkamgarunion0
  • Mar 30
  • 3 min read

🖋️ अभिजीत राणे लिहितात

केंद्रसरकारने वक्फ बोर्ड कायद्यात प्रस्तावित केलेले बदल कर्नाटक आणि तामीळनाडू सरकारने नाकारले असून त्यांच्या राज्यात वक्फ बोर्ड कायदा पूर्वलक्षी प्रभावानेच लागू राहील अशी चिन्हे आहेत. तामिळनाडू मधील स्टॅलिन सरकार हे हिंदूधर्मविरोधी , हिन्दी भाषा विरोधी , देशाच्या एकात्मतेला आव्हान देण्याची मानसिकता असणारे सरकार आहे आणि त्यामुळे त्यांनी असा मोहम्मद तुघलकी निर्णय घेतला त्यात आश्चर्य नाही परंतु कर्नाटकमधील कोंग्रेस सरकार सुद्धा त्याच पावलावर पाऊल टाकून निर्णय घेत आहे हे लज्जास्पद आहे. जनभावनेला पायदळी तुडवून आणि एकाच समाज घटकाचे तुष्टीकरण करून तुम्ही फार काल राज्य करू शकत नाहीत ही साधी सोपी सरळ गोष्ट कोंग्रेस वाल्यांच्या डोक्यात शिरत नाही आहे आणि त्यामुळे त्यांच्या पक्षाचे प्रचंड नुकसान होते आहे. एकेका राज्यातून कोंग्रेस साफ होते आहे आणि त्या त्या ठिकाणी भाजपा सत्तारूढ होते आहे. कर्नाटक मध्ये सुद्धा पुढील निवडणुकीत हे घडण्याची चिन्हे दिसत आहेत.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

दिशा सलियन प्रकरणात प्रेताच्या टाळूचे लोणी खाणारी व्यक्ति कोण ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्यावेळी हे प्रकरण घडले त्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार होते आणि हे प्रकरण आणि सुशांत सिंग प्रकरण जोडून दाखवले गेले व या दोन्ही प्रकरणात खून घडला असून ही प्रकरणे परस्पर संलग्न आहेत असे मत मांडले गेले. यात आदित्य ठाकरे यांचे नाव आल्याने त्यावेळी पण बराच गदारोळ झाला होता. आता पाच वर्षांनी दिशाच्या वडिलांनी न्यायालयात परत याचिका दाखल केल्याने वातावरण तापले आहे. आदित्यला दोषी ठरवणारे मत त्यांचे वकील आणि राणे परिवार मांडतो आहे. दुसरीकडे वडिलांचे अफेयर आणि व्यवसायातील तणाव या गोष्टी तिच्या आत्महत्येचे कारण आहे असा दावा आदित्यच्या बाजूची मंडळी करत आहेत. एक गोष्ट नक्की आहे जर तिची आत्महत्या असेल तर जे दोषी असतील ते किंवा तिचा खून करणारे दोघांपैकी एक जण प्रेताच्या टाळूचे लोणी चाटण्याचे उद्योग करत आहेत.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

“बकरे की अम्मा अखिर कब तक खैर मनायेगी ?”एकनाथ शिंदेंवर अभिरुचीहीन टीका करून कुणाल कामराने महाराष्ट्रातून पळ काढला. कारण त्याला महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी अटक होऊ शकली असती. स्टॅलिन नावाच्या हिंदूद्वेष्ट्या , भारतद्वेष्ट्या मुख्यमंत्र्याची भूमी गाठणे त्याने इष्ट समजले आणि त्याने तिथूनच अटकपूर्व जामीन मिळवला आहे यातून हे षडयंत्रच असून हे विचारपूर्वक आणि सर्व शक्यता लक्षात घेऊन मग कृतीत आणले आहे हे स्पष्ट होते. आता 31 मार्चला मुंबई हाय कोर्टात त्याची सुनावणी आहे त्यावेळी तो अवतरेल परंतु त्याला अटक करता येणार नाही. परंतु ज्याप्रमाणे प्रशांत कोरटकर याला न्यल्यलयाने दिलेले संरक्षण नंतर काढले गेले आणि अटक झाली या प्रकरणात सुद्धा तेच होणार आहे. महाराष्ट्र शासन कुणाल कामराचे आसेच मोदींचा आणि शहांचा अवमान करणारे व्हिडिओ ज्यावेळी दाखवेल त्यावेळी हा खोडसाळ व्यक्ति असून हा मुद्दमून पीतप्रसिद्धी साठी किंवा सुपारी घेऊन या ऊचापती करतो आहे हे न्यायालयाच्या निदर्शनाला आणून देणे कठीण नाही. त्यामुळे कुणाल कामराने अटकपूर्व जामीन मिळाला तरी हुरळून जाऊ नये त्याला तुरुंगात जावे लागणारच आहे. ते टळत नाही.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

अजित पवारांच्या दृष्टीने छगन भूजबळ यांची उपयुक्तता संपली आहे का ? असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जातो आहे. महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सूप वाजले. त्यानंतर राज्य सरकारकडून विधिमंडळाच्या विविध समित्या घोषित करण्यात आल्या. या समित्यांमध्ये राष्ट्रवादीच्या दोन बड्या नेत्यांना पक्षाचे अजित पवार यांनी स्थान दिले नाही. वाल्मिक कराडमुळे वादग्रस्त ठरलेले माजी मंत्री धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना विधिमंडळाच्या कोणत्याही समितीत राष्ट्रवादीने स्थान दिले नाही. इतकेच नाही तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतल्यावर रिक्त झालेल्या मंत्रीपदावर सुद्धा भूजबळ यांची वर्णी लागेल अशी सगळ्यांचीच अपेक्षा होती परंतु अजित दादांनी हे पद स्वतःकडेच ठेवून घेतले आहे. मंत्रिपद न दिल्याने छगन भूजबळ नाराज झाले होते आणि त्यांनी अजित दादांना अप्रत्यक्ष रित्या नाराजी बोलूनही दाखवली होती परंतु त्यावेळी सुद्धा अजित दादांनी मौन साधणेच इष्ट समजले आता सुद्धा त्यांना मंत्री होऊ दिले जात नाही. सरस्वती देवीचा अपमान करणारे वक्तव्य भूजबळ यांनी केले होते त्यांच्या या हिंदूविरोधी भूमिकेमुळे त्यांना डावलले जात आहे का ? हा सुद्धा मुद्दा चर्चेत आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

दिल्ली हायकोर्टाच्या न्यायाधीशांच्या घरात आग लागली आणि मग अग्निशामक दल आले आणि त्यांना जळालेल्या नोटा सापडल्या जी रक्कम 15 कोटी रुपये असल्याची पण वार्ता आली. पण या सगळ्या प्रकरणातील अनेक लपलेले पैलू बाहेर येऊ लागले आहेत. हे न्यायाधीश महोदय आपल्या अनेक निर्णयांमुळे गुप्तचर यंत्रणांच्या रडार वर होतेच. ई डी अर्थात सक्तीवसूली संचालनालयाचे पंख छाटण्याचे निर्णय याच महोदयांनी घेतले होते. फ्लिपकार्ट कंपनीचे पन्नास टक्के शेअर्स टायगर ग्लोबल ग्रुप कडे होते. त्यांनी ते शेअर्स वॉलमार्ट या कंपनीला विकले. या व्यवहारावर 30 कोटी कर देय होता. हा कर भरायला टायगर ग्लोबल ग्रुप ने नकार दिला. हे प्रकरण कोर्टात पोचले त्यातील न्यायाधीश महोदय नोटा जळण्यामुळे प्रसिद्ध झालेले होते. न्यायाधीश महोदयांनी या खटल्यात स्टे दिला. जळीत कांडातील नोटा याच असल्याची वंदता आहे. याच न्यायाधीश महोदयांच्या कारनाम्यांची कुंडलीच आता पत्रकार मंडळी काढू लागली आहेत. डॉक्टर कफील खान जो गोरखपुर मेडिकल कॉलेजचा डॉक्टर होता , ज्याच्या बेकायदेशीर खाजगी दवाखान्यात सरकारी ऑक्सीजन सिलेंडर मिळाले होते. त्याच्यावर निष्काळजीपणाने लहान मुलांचा जीव घेतल्याचं आरोप होता. त्या महाराजांना सुद्धा तत्काळ जामीन देण्याचे पुण्यकर्म या न्यायाधीश महोदयांच्या नावावर आहे. एक जुनी म्हण आहे. अंडे आतून फुटणे आवश्यक असते. न्याययंत्रणेतील भ्रष्टाचाराचे अंडे आता आतून फुटू लागले आहे.

🔽


ree

ree

ree

ree

ree

 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page