🖋️ अभिजीत राणे लिहितात
- dhadakkamgarunion0
- Mar 3
- 3 min read
Updated: Mar 4
🖋️ अभिजीत राणे लिहितात
इराण वरील हल्ल्यामागे सौदी प्रिन्स मुहम्मद बिन सलमान असल्याचे सिद्ध होत आहे. सौदी प्रिन्स मुहम्मद बिन सलमान, इराण समस्येवर राजनैतिक तोडगा काढण्याचे उघडपणे आवाहन करतहोता. त्यांने इराणी राष्ट्राध्यक्षांना फोन करून आश्वासन दिले की जर अमेरिकेने हल्ला केला तर तो अमेरिकेला त्यांची जमीन आणि हवाई क्षेत्र वापरू देणार नाही.दुसरीकडे, अनेक महिन्यांपासून तो ट्रम्प यांना फोन करत होता आणि इराणवर हल्ला करण्यास चिथावत होता. MBs ने ट्रम्प यांना सांगितले की जर इराणवर आता हल्ला केला नाही तर तो अधिक शक्तिशाली होईल आणि म्हणूनच त्वरित हल्ला करणे आवश्यक आहे. इस्रायल देखील अमेरिकेवर दबाव आणत होता. शेवटी, सौदी अरेबिया आणि इस्रायलचे प्रयत्न यशस्वी झाले आणि त्यांनी इराणवर हल्ला केला, ज्यामुळे संपूर्ण मध्य पूर्व युद्धात बुडाले.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
ईराणमध्ये संविधानिक मार्गाने निषेध नोंदवायला संविधान नसल्याने त्यांच्यासाठी त्यांचे भारतीय बांधव निषेध नोंदवत आहेत याची नोंद भारतीयांनी घ्यावी.असाच निषेध नोंदवण्यासाठी पाकिस्तानी लोक कराचीतील अमेरिकन कॉन्सुलेटजवळ गेले तर तिथं अमेरिकन नेव्ही सील कमांडोनी ठोकल्याने ८ शांतीप्रिय लोकांचा जीव गेला.भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांत संविधान आहे पण एखाद्या देशाच्या कॉन्सुलेटमध्ये UN Vienna करारानुसार त्याच देशाच्या कायदे लागू होतात ज्या देशाचा तो कॉन्सुलेट असतो.त्यानुसार अमेरिकन कमांडोनी स्वरक्षणार्थ ट्रेसपासर लोकांना गोळ्या घातल्या.बाकी अमेरिकेने जेव्हा सद्दाम हुसेनला फाशी सुनावली होती तेव्हा मराठवाड्यात आंदोलने झाली होती.ज्या लोकांनी आंदोलने केली होती त्या लोकांनी मराठवाड्याला पाणी, निधी किंवा पायाभूत सुविधा मिळाव्या यासाठी कधीही आंदोलन केलेलं मी बघितलं नव्हतं.
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात
आमदारकी लढवण्यावरून अनिल देशमुख आणि त्यांचा मुलगा सलील या दोघात इतके टोकाचे वाद झाले होते की पोराने अपक्ष लढण्याची धमकी दिली म्हणून अनिल देशमुखांनी माघार घेतली.माघार घेतल्यानंतर बाप पोराच्या प्रचारात इतका दंग झाला की शेवटी स्वतःवर खोटा हल्ला करवून घेत विरोधी उमेदवाराकडे अंगुलीनिर्देश केला; पण त्याचाही उपयोग झाला नाही लोकांनी अनिल देशमुखांचा पोरगा उताणा पाडला. बबनराव लोणीकर यांच्या बाबतीत त्यांच्या पोराने त्यांना हीच धमकी दिलेली दिसतेय.आता ही धमकी देणारे चिरंजीव त्यांच्या कितव्या बायकोच्या किती क्रमांकाचे पुत्र आहेत हे भाजपचे २०२९ चे विधानसभा तिकीट लोणीकर घराण्यातील मुलाला जाहिर झाल्यावरच आपल्याला समजेल.कारण लोणीकर जेव्हा पाणीपुरवठा मंत्री होते तेव्हा त्यांच्यावर त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांना दोन बायका असल्याचे लपवले होते. आता जनतेला हा अधिकार आहे की लोणीकरांचा मुलगा २०२९ निवडणूकीत घरी बसवण्याचा...बाकी असे लोक पराभूत झाल्यावर यांच्या इलेक्टिव्ह मेरीटवर कुणीच चर्चा करत नाही.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
दुबईत फिरायला गेलेल्या आणि आपला देश घाण म्हणून दुबईची पुंगी वाजवणाऱ्या अर्थात तिकडचे नागरिकत्व घेणार्या भारतीयांना यावेळी फुकटमध्ये सरकारने आणू नये. दुबईचे नागरिकत्व बरीच भारतीय उद्योजक मंडळी आणि सेवा निवृत्त सरकारी अधिकारी बाळगून आहेत कारण करमुक्त जीवन आणि भारतातील भानगडी उघड झाल्या तर कायद्याचे संरक्षण मिळते. त्याचप्रमाणे इराण मध्ये डॉक्टर व्हायला गेलेल्या पोरा पोरींना तिथेच राहून तिथल्या नागरिकांची सेवा करण्याची संधी द्यायला हवी. दरवेळी भारत सरकार येऊन फुकट नेण्याची सोय करत असल्याने आपल्या या शूर लोकांना युद्धाची भिती वाटत नाहीये. एखादेवेळी पाच दहा लाखांचा दणका बसल्यास पुन्हा तिकडे जाणार नाहीत. भारत सरकारला फारच प्रेम वाटले तर कॅनडाचा नागरिक असलेल्या अक्षय कुमारला खिशात हात घालून विमान भाडे भरायला सांगावे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
बदलापूर भाजप पूर्व मंडळ अध्यक्ष प्रतिभा जाधव यांची मुलगी मृणाल जाधव हिने प्रभू श्रीरामांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा व्हिडिओ इंस्टाग्रामवर टाकला. त्या मुलीचा बाप नगरपालिकेत शिक्षण मंडळावर भाजपच्या कृपेने पदावर बसलेला आहे त्या मुलीने एखादा मुस्लीमही इतक्या खालच्या पातळीवर भारतातील तमाम हिंदूंचे आराध्यदैवत प्रभू श्रीराम यांच्यावर इतक्या खालच्या पातळीवर टिपण्णी करून व्हिडिओ टाकायची हिंमत करणार नाही ते केलं.त्यामुळे त्या परिसरातील हिंदू संघटनांची लोकं त्या भाजप पदाधिकाऱ्याच्या घरासमोर जमले.आपल्या मुलीच्या जीवाची भिती वाटली म्हणून त्या नेत्याने तिला पोलीसांसमोर सरेंडर करायला लावलं. प्रकरण हाताबाहेर जात आहे हे बघून भाजपने तिच्या आईचा राजीनामा घेतला.पण बदलापूर नगरपालिकेतील मलईदार पदाचा राजीनामा त्या मुलीच्या बापाने अजून दिलेला नाही.हि दोन्ही मंडळी कॅमेरासमोर येऊन रडत आम्ही हिंदू परंपरा आणि पद्धती कशा पाळतो याचा पाढा वाचू लागली.पण मग यांच्या मुलीला अशा गोष्टी कुणी शिकवल्या? भाजपाने अस्तनीत साप पाळणे सोडून देणे आवश्यक आहे.
🔽
#MiddleEastCrisis #IranConflict #SaudiPolitics #IsraelUSAlliance #DiplomaticDoubleGame #IndianPolitics #PoliticalDynasty #Accountability #EvacuationDebate #FreedomOfSpeech








Comments