top of page

🖋️ अभिजीत राणे लिहितात

  • dhadakkamgarunion0
  • 22 hours ago
  • 3 min read

🖋️ अभिजीत राणे लिहितात

गुन्हेगारीविरोधी भाषण आणि उमेदवारीतील विरोधाभास

अजित पवार यांचे राजकारण पुन्हा एकदा प्रश्नचिन्हाखाली आले आहे. एका बाजूला ते कोयता गैंग संपवण्याची, गुन्हेगारी थांबवण्याची घोषणा करतात; तर दुसऱ्या बाजूला उमेदवारी अशा व्यक्तींना देतात ज्यांच्यावरच संशयाचे सावट आहे. ही दुहेरी भूमिका केवळ राजकीय ढोंग ठरते. पुण्यातील नागरिकांना गुन्हेगारीमुक्त वातावरण हवे आहे, पण नेतृत्वानेच जर विरोधाभासी निर्णय घेतले तर विश्वास कसा टिकणार? मुरलीधर मोहोळ यांनी केलेली टीका योग्य ठरते कारण राजकारण हे जबाबदारीचे व्यासपीठ आहे, केवळ घोषणांचे नाही. पुणेकर शेवटी मतदानातून उत्तर देतील आणि ढोंगी राजकारणाला धडा शिकवतील. अजित पवारांनी आत्मपरीक्षण करून उमेदवारीत पारदर्शकता दाखवली नाही तर त्यांची विश्वासार्हता अधिकच ढासळेल. महाराष्ट्राला घोषणांपेक्षा कृती हवी आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

महानगरपालिकेत पक्षनिष्ठा नव्हे, उमेदवार महत्त्वाचा

येत्या महानगरपालिका निवडणुकीत पक्षांनी निष्ठावंतांना डावलून बाहेरून आयात केलेल्या उमेदवारांना तिकिटे दिल्याने मतदारांमध्ये संताप उसळला आहे. सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करणे पुरेसे नाही; खरी ताकद मतदानपेटीत आहे. महानगरपालिका निवडणुका म्हणजे शहरी नागरिकांच्या रोजच्या जगण्याशी निगडित प्रश्न—रस्ते, कचरा व्यवस्थापन, पाणी, वीज, वाहतूक, हिरवाई, सार्वजनिक बागा, नदीचे संरक्षण. या निवडणुकीत पक्षनिष्ठेपेक्षा स्वच्छ चारित्र्याचा, प्रामाणिक आणि तळमळीने काम करणारा उमेदवार निवडणे गरजेचे आहे. जो नागरिकांच्या समस्यांवर तत्परतेने काम करेल, फोन उचलून उत्तर देईल, तोच खरा प्रतिनिधी ठरेल. अशा उमेदवारांना निवडून दिल्यास पक्षांनाही उमेदवारीत पारदर्शकता ठेवावी लागेल. मतदार म्हणून आपल्या हातात ही ताकद आहे. बाकी सगळे शब्दांचे बुडबुडेच!

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

सर्वसामान्य कार्यकर्त्याला मान देणारा पक्ष

ठाण्यातील उषा विशाल वाघ यांना भाजपाने दिलेली उमेदवारी ही पक्षाच्या कार्यकर्ताप्रेमाची जिवंत उदाहरण आहे. फुटक्या कौलारू घरात राहणाऱ्या, पावसाळ्यात ताडपत्री टाकून जगणाऱ्या या कुटुंबाने अनेक वर्षे निष्ठेने पक्षासाठी काम केले. राजकारण म्हणजे श्रीमंतांचे, बंगलेवाल्यांचे काम असा समज असताना भाजपाने मात्र सर्वसामान्य कार्यकर्त्याला पुढे करून तो समज खोटा ठरवला आहे. उषाताईंची उमेदवारी ही केवळ राजकीय निर्णय नाही, तर कार्यकर्त्यांच्या त्याग आणि निष्ठेचा सन्मान आहे. पक्षाने दाखवले की खरा आधार हा पैसा किंवा बंगल्यांचा नव्हे, तर जमिनीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आहे. अशा निर्णयांमुळे कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि जनतेला संदेश मिळतो की राजकारणात प्रामाणिकपणा आणि निष्ठेला अजूनही महत्त्व आहे.

🔽

🖋️ *अभिजीत राणे लिहितात

देवेंद्र फडणवीस – राजकारणातील खरा चाणक्य

महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करणारे देवेंद्रजी फडणवीस आज संपूर्ण देशात ओळखले जात आहेत. स्वच्छ व्यक्तिमत्व, चातुर्य आणि अथक श्रम यांच्या जोरावर त्यांनी भाजपला एकहाती सत्तेत आणले. त्यांच्या डावपेचांची सरसता महाराष्ट्राने अनुभवली आहे. पक्षासाठी दशकानुदशके काम करून स्वतःला निष्ठावंत म्हणवणाऱ्यांना तिकीट नाकारून त्यांनी स्पष्ट संदेश दिला की पक्षनिष्ठा ही केवळ घोषणांनी नव्हे तर परिणामकारक कामगिरीने सिद्ध होते. हा धाडसी निर्णय राजकारणातील खरी चाणक्यनीती ठरली. फडणवीस यांनी दाखवून दिले की नेतृत्व म्हणजे केवळ लोकप्रियता नव्हे, तर योग्य वेळी कठोर निर्णय घेण्याची क्षमता. त्यांच्या राजकीय बुद्धिमत्तेमुळे भाजप अधिक मजबूत झाला आहे. महाराष्ट्राच्या पलीकडे देशभरात त्यांची ओळख हीच – खऱ्या अर्थाने ओर्जिनल राजकीय चाणक्य.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

मनसेचा अस्त होत चाललेला प्रवास

“ही आपली शेवटची निवडणूक आहे” असे राज ठाकरे यांनी म्हटले आणि ते वास्तव ठरत चालले आहे. मनसेतून नेते व कार्यकर्त्यांचे सतत होणारे आउटगोइंग पक्षाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. गेल्या अनेक निवडणुकांप्रमाणेच या BMC निवडणुकीतही मनसेचा निकाल भोपळाच येईल किंवा आली तर एखादी-दुसरी जागा मिळेल, अशीच परिस्थिती दिसते. राजकारणात सातत्य, संघटनशक्ती आणि जनतेशी जोडलेली कामगिरी आवश्यक असते. पण मनसेने केवळ भाषणबाजी व आक्रमक भूमिकेवर भर दिला, प्रत्यक्ष कामगिरीत मात्र अपयश आले. त्यामुळेच कार्यकर्त्यांचा विश्वास ढासळला आणि पक्षाची ताकद कमी झाली. मुंबईसारख्या महानगरात मतदारांना ठोस पर्याय हवा असतो, केवळ घोषणांनी मत मिळत नाही. राज ठाकरे यांचे विधान हे मनसेच्या राजकीय अस्ताचा स्पष्ट इशारा आहे.

🔽



 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page