top of page

🖋️ अभिजीत राणे लिहितात

  • dhadakkamgarunion0
  • Oct 10
  • 3 min read

🖋️ अभिजीत राणे लिहितात

मुंबईच्या वाहतूक इतिहासात १० ऑक्टोबर २०२५ हा दिवस मैलाचा दगड ठरला—कफ परेड ते आरे या संपूर्ण मार्गावर मेट्रो-३ सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी तब्बल १,५६,४५६ मुंबईकरांनी प्रवास केला. हा आकडा केवळ प्रवाशांचा नाही, तर नव्या शहरी गतिशीलतेच्या युगात मुंबईने टाकलेल्या आत्मविश्वासपूर्ण पावलांचा दस्तऐवज आहे. वातानुकूलित, वेगवान, पर्यावरणपूरक आणि जागतिक दर्जाच्या सार्वजनिक वाहतुकीकडे मुंबईने निर्णायक वळण घेतले आहे. ही प्रगती केवळ तांत्रिक नव्हे, तर दूरदृष्टी, नियोजन आणि लोकशाही नेतृत्वाच्या समन्वयाची फलश्रुती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली साकारलेले हे स्वप्न आता मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनत आहे. अ‍ॅक्वालाइन ही केवळ मेट्रो नव्हे—ती मुंबईच्या स्वप्नांना मिळालेली गती आहे. आणि हो, ही गती महापालिका निवडणुकीच्या जनतेच्या मनोवृत्तीचीही सूचक ठरते.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

दक्षिण आशियातील राजकीय अस्थिरता, धार्मिक तणाव आणि दहशतवादी कारवायांचे पडसाद भारतावर सातत्याने उमटत असतात. श्रीलंका, पाकिस्तान, म्यानमार, अफगाणिस्तान आणि नेपाळमध्ये उसळलेली आंदोलने केवळ जनतेच्या असंतोषाचे प्रकटीकरण नसून, त्यामागे ‘डीप स्टेट’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या छुप्या सत्ताकेंद्रांचा हस्तक्षेप कार्यरत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. भारत या परिसरातील सर्वात स्थिर लोकशाही असल्यामुळे अशा आंदोलनांचे परिणाम थेट भारतावर होण्याची शक्यता असते. लडाखमधील मागण्या कलम ३७० अस्तित्वात असताना दुर्लक्षित राहिल्या; मात्र २०१९ नंतर केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाल्यानंतर अपेक्षा उंचावल्या. केंद्र सरकारने उच्चस्तरीय समिती नेमून सहावी अनुसूची, विधानसभा, आणि स्थानिक हक्कांसंदर्भात गंभीर विचार सुरू केला. तथापि, सोशल मीडियावरून आंदोलनांना आंतरराष्ट्रीय हवा देण्याचा प्रयत्न, बाह्य हितसंबंधांचा हस्तक्षेप आणि भावनिक अस्मितांचा राजकीय वापर ही ‘डीप स्टेट’ची परिचित रणनीती ठरते. भारताने या आव्हानांना मुत्सद्देगिरीने तोंड देत संयम आणि सजगतेचा आदर्श प्रस्थापित केला आहे

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

पाकिस्तान सध्या आर्थिक, सामाजिक आणि राजकीय संकटांच्या भोवऱ्यात अडकलेला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी कडून कर्जाची हफ्ता थांबवला गेला असून, देशाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पाकिस्तानमध्ये सध्या अस्थिरतेचे वातावरण आहे. आर्थिक व्यवहार ठप्प आहेत. संरक्षण खर्चात २०% वाढ आणि अस्पष्ट खर्चाच्या नोंदी यामुळे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने करार स्थगित केला. त्यातच पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठे जनआंदोलन उसळले आहे. आवामी अ‍ॅक्शन कमिटीने ३८ मागण्यांचा चार्टर सादर करत शटर डाऊन आणि व्हील-जॅम आंदोलन छेडले. मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून, देशांतर्गत असंतोष आणि आंतरराष्ट्रीय दबाव यामुळे पाकिस्तान सरकार गोंधळले आहे. भारताशी तणाव, अर्थसंकट, आणि लोकशाहीविरोधी धोरणे यामुळे पाकिस्तानची स्थिती अधिकच बिकट झाली आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

न्यायालयीन निर्णयानंतर ले. कर्नल श्रीकांत पुरोहित यांची निष्कलंक मुक्तता हा केवळ एक वैयक्तिक विजय नसून, एका राष्ट्रसेवकाच्या प्रतिष्ठेचे पुनर्वसन आहे. मालेगाव प्रकरणात एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्या वादग्रस्त भूमिकेमुळे लोक संतप्त होते, त्यांचा 26/11 हल्ल्यात मृत्यू झाल्यावर त्यांच्या पत्नी कविता करकरे यांची भावनिक बाजू माध्यमांनी प्रायोजितपणे पुढे आणली, पण सौ. पुरोहितांच्या संयमित, विधिसंगत संघर्षाकडे दुर्लक्ष केले गेले. लष्कराची भूमिका मात्र विलक्षण ठरली; सैन्याने कोणताही मुलकी हस्तक्षेप न करता पुरोहितांना ‘आपला माणूस’ म्हणून सातत्याने साथ दिली. त्यांच्या गुप्त प्रकल्पांबाबत लष्कराला कधीही शंका वाटली नाही, हेच त्यांच्या तुरुंगातून सुटल्यावर चार वरिष्ठ सेनाधिकारी सन्मानपूर्वक त्यांना घेऊन गेले, या दृश्यातून स्पष्ट झाले. न्यायालयीन मुक्ततेनंतर काही आठवड्यांतच त्यांना कर्नल पदावर बढती मिळणे हे ‘हिंदू दहशतवाद’ या फसव्या न्यारेटिव्हच्या मुस्कटात मारलेली सणसणीत चपराक होती.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात  

मुंबईच्या मेट्रो-३ प्रकल्पाला महाविकास आघाडी सरकारच्या राजकीय हट्टामुळे तीन वर्षांचा विलंब झाला. जानेवारी २०२० मध्ये आय ए एस अश्विनी भिडे यांना पदावरून हटवून कारशेडला खोडा घालण्यात आला. परिणामी, करदात्यांचा पैसा वाया गेला आणि मुंबईकरांना हाल सहन करावे लागले. महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर भिडे यांची पुन्हा नियुक्ती झाली आणि प्रकल्पाला गती मिळाली. काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपूर्ण भूमिगत मेट्रो-३ चे उद्घाटन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीमुळे हा ड्रीम प्रोजेक्ट पूर्णत्वास गेला. आजपासून मुंबईकरांनी या मेट्रोला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर.

🔽

ree

ree

ree

ree

ree


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page