🖋️ अभिजीत राणे लिहितात
- dhadakkamgarunion0
- Oct 9
- 3 min read
🖋️ अभिजीत राणे लिहितात
विकासाच्या आकाशात नवी उड्डाण. नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट हा देशातील 2014 नंतरचा 13 वा ग्रीनफिल्ड प्रकल्प ठरतो. 2014 पूर्वी भारतात केवळ 74 एअरपोर्ट होते, तर 2025 मध्ये ही संख्या 148 वर पोहोचली आहे—पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात तब्बल 74 नवीन विमानतळांची उभारणी झाली. नवी मुंबईतील हा अत्याधुनिक एअरपोर्ट दाट धुक्यातही टेक ऑफ आणि लँडिंगची क्षमता ठेवतो, हे तंत्रज्ञानातील प्रगतीचे प्रतीक आहे. काँग्रेसच्या काळात जिथे योजनाच कागदावर अडकून राहायच्या, तिथे आज प्रत्यक्ष प्रकल्प उभे राहत आहेत. हा बदल केवळ आकड्यांचा नाही, तर दृष्टीकोनाचा आहे—जिथे विकास म्हणजे घोषणांचा खेळ नसून, जमिनीवर उतरलेली कृती आहे. मतदारांनीही या उड्डाणाची दिशा ओळखूनच पुढचा निर्णय घ्यावा.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
शांत वाटाघाटी आणि संभाव्य करार. अमेरिकेचे व्यापारी प्रतिनिधी जेमी ग्रीयर आणि भारताचे वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्यात नुकतीच महत्त्वाची बैठक पार पडली. दोन्ही देशांमध्ये व्यापार कराराच्या दिशेने हालचाली सुरू असून, नोव्हेंबरमध्ये हा करार अस्तित्वात येण्याची शक्यता आहे. टेरिफ लावणे ही वाटाघाटीतील एक रणनीतिक चाल होती, जी भारतीय गटाने अचूक ओळखली. त्यामुळे चर्चेच्या वातावरणात कोणताही तणाव न राहता शांतता आणि संयम दिसून आला. ही बैठक केवळ व्यापारविषयक नव्हे, तर जागतिक आर्थिक समतोलाच्या दृष्टीनेही महत्त्वाची ठरू शकते. भारताच्या बाजूने खेळलेली शांत पण सूज्ञ भूमिका भविष्यातील करारासाठी सकारात्मक पायाभूत ठरेल.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
लातूरमधील तीन आत्महत्यांचे कथित कारण आरक्षण मागणी सांगितले गेले, पण पोलिस तपासात सत्य वेगळेच निघाले—नातेवाईकांनी चिठ्ठ्या ठेवून स्पष्टता दिली. हे पाहून जुन्या आठवणी जाग्या झाल्या. राष्ट्रवादी-काँग्रेस आय सरकारच्या काळात नैसर्गिक मृत्यूंना ‘शेतकरी आत्महत्या’ ठरवून गाव कामगार, पुढाऱ्यांच्या मदतीने सरकारी निधी उचलण्याचे प्रकार सर्रास घडत होते. चारा छावण्या, शेण लूट, सिलेंडर लाईन, रेशन लाईन, बँक लाईन—या सगळ्या ओळी केवळ गरिबीच्या नव्हत्या, तर राजकीय संधींच्या होत्या. आजही मतदारांनी या आठवणी जपून ठेवाव्यात. कारण जेव्हा मृत्यूच राजकारणात वापरला जातो, तेव्हा जनतेने स्मृती जागवून विवेकाने मतदान करणे हेच खरे उत्तर ठरते.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
अहंकाराच्या छायेतून मेट्रोच्या भूमिगत प्रवासाकडे. मुंबईतील मेट्रो ३—ॲक्वा लाईनचा तिसरा टप्पा काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पित झाला. भूमिगत प्रवास आजपासून नियमित सुरू होत असून, मोदींनी भाषणात आरे कारशेडविरोधी निर्णयावरून उद्धव ठाकरे यांच्यावर थेट टीका केली. "भाजपाशी विश्वासघात करून सत्ता मिळवली, पण देशाचे हजारो कोटींचे नुकसान केले" असे म्हणत त्यांनी मेट्रो प्रकल्पाला अडथळा आणणाऱ्या उद्धव ठाकरे सरकारचे वाभाडे काढले. आरेतील कारशेड रद्द करणे हा निर्णय त्यांनी "अहंकाराचे हिडीस प्रदर्शन" होते. मेट्रोचा प्रवास सुरू होणे ही केवळ वाहतुक व्यवस्था नसून हा राजकीय विसंवादावर जनतेच्या अपेक्षांचा विजय ठरतो. भूमिगत मेट्रोने आता उद्धव ठाकरे यांच्या अहंकाराला चिरडून प्रवास सुरू केला आहे. आणि याचा शेवट बी एम सी निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला जमीनदोस्त करून सामान्य जनता करणात आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
सरकारच्या प्रत्येक निर्णयाला आणि कायद्याला स्टे देणार्या सर्वोच्च न्यायालयाला जुताफेक प्रकरणानंतर आत्मभान आल्याने ते आता आपल्या मर्यादांमध्ये काम करायला बाध्य झाले आहे. मतदार यादीच्या विशेष गहन पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेली ताजी टिप्पणी ही भारतीय लोकशाहीतील संस्थात्मक स्वायत्ततेचा एक सुस्पष्ट आणि संतुलित नमुना ठरतो. न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने स्पष्टपणे अधोरेखित केले की SIR ही प्रक्रिया पूर्णतः केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकारक्षेत्रात येते आणि त्यात न्यायालयाचा हस्तक्षेप करणार नाही. हेच न्यायालय मोदी सरकारच्या प्रत्येक निर्णयाला आडवे जात होते. "प्रत्येक गोष्ट आमच्याच हातात का?" या हा प्रश्न विचारणारे न्यायालय आता प्रेषित असल्याच्या भूमिकेतून बाहेर पडल्याचे निदर्शक आहे. काही नागरिक अनधिकृतरीत्या राहत असतील आणि ओळख उघड होण्याच्या भीतीने पुढे येण्यास टाळाटाळ करत असतील, हे वास्तवही न्यायालयाने समजून घेतले. थोडक्यात जुता फेक प्रकरणात न्यायालयाला आपल्याविरुद्ध अत्यंत संतप्त झालेल्या जनमानसाचा अंदाज आला आणि त्यांनी संविधानाने आखून दिलेल्या मर्यादेत काम करण्याचे ठरवले आहे. याचे स्वागतच केले पाहिजे.
🔽
#NewIndiaRising #DevelopmentFlight #TradeTalks #CalmDiplomacy #TruthMatters #MetroMilestone #JudicialBalance #AbhijeetRaneWrites












Comments