top of page

🖋️ अभिजीत राणे लिहितात

  • dhadakkamgarunion0
  • Oct 6
  • 3 min read

🖋️ अभिजीत राणे लिहितात

शांततेच्या आडून सुरू असलेली अ‍ॅक्शन ! मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांना वाढदिवसाच्या शुभेच्छांना फक्त “धन्यवाद” दिलं—कसलाही राजकीय रिप्लाय नाही. टेरिफ, संरक्षण, व्यापार यावरही मोदी शांत आहेत. पण ही शांतता म्हणजे निष्क्रियता नाही. अजित डोभाल सध्या ग्रीसमध्ये आहेत, तुर्कीविरोधातील नौदल ऑपरेशनचं नेतृत्व करत आहेत. जनरल व्ही.के. सिंग म्यानमार-बांग्लादेश सीमेवर आराकान आर्मीच्या हालचालींवर नजर ठेवून आहेत. राजनाथ सिंह पश्चिम सीमेला अ‍ॅक्टिव्ह मोडवर आहेत—पीओकेमध्ये प्रवेशाची तयारी सुरू आहे. योगी आदित्यनाथ देशात बुलडोझर डेमोचे नेतृत्व करत आहेत. तर परराष्ट्र मंत्री अमेरिकेत टेरिफ धोरणातील चूक अमेरिकन जनतेला समजावून सांगत आहेत. मोदी जेव्हा शांत असतात, तेव्हा यंत्रणा युद्धपातळीवर काम करत असते. इतिहास सांगतो—मोदींची शांतता म्हणजे अ‍ॅक्शनची सुरुवात. आणि ती अ‍ॅक्शन कधीही फक्त भाषणात नसते, ती जमिनीवर दिसते.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

युतीतून संपतो की स्वतःच्या चुका गिळतो? "भाजपाशी युती केली की पक्ष संपतो" हा निष्कर्ष राजकीय आळसातून आलेला आहे. वास्तव वेगळं आहे. शिवसेना फुटली कारण उद्धव ठाकरे यांनी आमदारांना किंमत दिली नाही आणि हिंदुत्व सोडून खुर्चीसाठी लांगूलचालन केली. AIADMK ला भ्रष्टाचार आणि स्थानिक समीकरणं झेपली नाहीत. अकाली दल गृहकलहात बुडाला. नितीश कुमार यांची धरसोड वृत्ती जनता दल युनायटेडला कमजोर करत गेली. समाजवादी आणि बहुजन पक्ष कुटुंब आणि जातधर्माच्या मर्यादांत अडकले. तृणमूल काँग्रेस आणि पीडीपी यांची हुकूमशाही आणि मुस्लिमानुनय भाजपाला झेपला नाही. युती तुटली, पण भाजपाने कोणताही पक्ष गिळला नाही. उलट, अनेक पक्ष स्वतःच्या चुकीच्या धोरणांनी, अंतर्गत संघर्षांनी आणि जनतेपासून तुटल्यामुळे संपले. भाजपाशी युती म्हणजे संप, हा राजकीय प्रचार आहे—वास्तव नाही.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

माणुसकीचं आरक्षण: माला पापळकरची कहाणी ! जळगाव रेल्वे स्टेशनवर सापडलेली एक अनाथ मुलगी—नाव नाही, घर नाही, भविष्य नाही. पण आज तीच माला शंकर पापळपकर नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहाय्यक म्हणून रुजू होत आहे. हे यश केवळ तिचं नाही, तर देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशील निर्णयाचं फलित आहे. २०१८ मध्ये त्यांनी अनाथ मुलांसाठी १% स्वतंत्र आरक्षण जाहीर केलं. कोणत्याही जाती-धर्माशी न जोडलेली ही मुलं आता राज्याच्या संरक्षणाखाली आहेत. माला म्हणते, “माझ्याकडे कोणीच नव्हतं, पण सरकारच माझे पालक बनलं.” या एका वाक्यात माणुसकीचं सार आहे. आज तिच्यासारख्या १३३ अनाथ युवकांना महसूल विभागात नियुक्ती मिळाली आहे. हे आरक्षण केवळ नोकरीचं नव्हे, तर स्वाभिमानाचं आहे. शासन म्हणजे धोरण नव्हे, तर भावनांचा सन्मान—हे देवेंद्रजींनी सिद्ध केलं आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

शटडाऊनमागचं ट्रम्पचं राजकारण! अमेरिकेतील शटडाऊन म्हणजे केवळ निधीअभावी थांबलेली सरकारी सेवा नसून हे ट्रंप यांचे षडयंत्र आहे. रिपब्लिकन-डेमोक्रॅट वादामुळे ७.५ लाख कर्मचारी बिनपगारी रजेवर जाणार, हेच पुरेसं धक्कादायक आहे. पण ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळा आहे: शटडाऊनचा वापर करून त्यांना सरकारी मनुष्यबळात कपात करायची आहे. राष्ट्राध्यक्ष म्हणून जबाबदारीने वर्तन करण्याऐवजी ते सरकारी यंत्रणेला शत्रूसारखं वागवत आहेत. अमेरिकेच्या लोकशाहीत अर्थसंकल्पावर मतभेद नवे नाहीत, पण ट्रम्प यांचा दृष्टिकोन—“कर्मचारी कमी करा, काम थांबवा”असा असून हा लोकसेवकांचा अपमान आहे. शटडाऊन हे आर्थिक संकट नसून नेतृत्वाचा अभाव आहे आणि जेव्हा राष्ट्राध्यक्षच सरकारी कर्मचाऱ्यांना हाकलण्याची संधी शोधतात, तेव्हा हा प्रश्न केवळ निधीचा राहत नाही, तर तो शाश्वत अश्या जीवन मूल्यांचा होतो.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात  

पाकिस्तानातील सिंध प्रांतात अल्पवयीन हिंदू मुलींच्या अपहरण, जबरदस्तीच्या विवाह आणि धर्मांतराच्या घटना सातत्याने वाढत आहेत. बीबीसी मराठीच्या अहवालानुसार, २०२४ मध्ये अशा ७० हून अधिक प्रकरणांची नोंद झाली. पीडित मुलींच्या कुटुंबांना न्याय मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे, कारण स्थानिक पोलिस आणि न्यायालये अनेकदा आरोपींच्या बाजूने झुकतात. काही मुलींचे वय १३–१४ वर्षे असूनही, त्यांना ‘स्वेच्छेने धर्मांतर’ केल्याचे दाखवले जाते. हे केवळ धार्मिक अत्याचार नाही, तर मानवी हक्कांचा उघड उल्लंघन आहे. पाकिस्तानातील हिंदू समाज भयभीत आहे, आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही या घटनांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या या जबरदस्तीच्या घटना थांबवण्यासाठी कठोर कायदे आणि जागतिक दबाव आवश्यक आहे. अन्यथा, अल्पसंख्याक मुलींचं आयुष्य हे कायमचं भय आणि अन्यायाच्या छायेत अडकून राहील

🔽

ree
ree
ree
ree
ree

 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page