🖋️ अभिजीत राणे लिहितात
- dhadakkamgarunion0
- Sep 16
- 3 min read
🖋️ अभिजीत राणे लिहितात
महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष मा. रविंद्र चव्हाण यांचे सचिव म्हणून अनिकेत पटवर्धन यांनी अत्यंत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. संघटनातील शिस्त, कार्यक्रमांचे काटेकोर नियोजन, कार्यकर्त्यांशी संवाद व अध्यक्षांच्या दृष्टीकोनाची अंमलबजावणी यात त्यांनी मोठी भूमिका बजावली. सचिव पदावर राहून त्यांनी अध्यक्षांच्या कार्यशैलीला पूरक अशी ऊर्जा दिली व पक्षकार्य अधिक गतिमान केले. काटेकोरपणा, प्रामाणिकता आणि संघटनप्रेम या गुणांमुळे अनिकेत पटवर्धन हे विश्वासार्ह सहकारी म्हणून नावारूपास आले आहेत. त्यांचे समर्पण आणि कार्यतत्परता हे निश्चितच महाराष्ट्र भाजपसाठी प्रेरणादायी ठरते.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
नियमांना वळसा, प्रतिष्ठेला धक्का महाराष्ट्र साहित्य परिषदेचा आजचा चेहरा अस्वस्थ करणारा आहे. निवडणुका वर्षानुवर्षे झालेल्या नाहीत, कार्यकारिणीची मुदत संपूनही कारभार सुरू आहे, आणि धर्मादाय आयुक्तांच्या कडे केस प्रलंबित असताना संमेलनाध्यक्षाची निवड नियमांना फाटा देत केली जाते—ही तर लोकशाहीची थेट अवहेलना आहे. साहित्यसंस्था म्हणजे समाजाच्या नैतिक मानकांची पहारेकरी; त्या स्वतःच प्रक्रियेची काच मोडू लागल्या तर विश्वास कोसळतो. सरकारी हस्तक्षेप हा इथे राजकीय नाही, तर संस्थात्मक आरोग्याचा उपाय आहे. तटस्थ प्रशासक नेमून संपूर्ण नोंदी डिजिटल करणे, अद्ययावत मतदारयादी प्रसिद्ध करून हरकतींसाठी खिडकी उघडणे, आणि नव्वद दिवसांत पारदर्शक निवडणुका—हा किमान उपचारक्रम आहे. संमेलनाचा उत्सव थांबू नये; पण तो नियमांच्या तेलावरच तेजाने तळपू शकतो.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
आशिया चषकातील भारत पाकिस्तान सामना खेळवला जाणे एकाही भारतीयाला आवडले नाही आणि जनमानसाची ही नकारात्मक भावना खेळाडूंना सुद्धा ज्ञात होती. त्यामुळेच सामना सुरू होताना नाणेफेक झाल्यावर, सामना संपल्यावर दोन्ही वेळेस भारतीय क्रिकेट खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करणे नाकारले. इतकेच नाही तर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने हा विजय पहलगाम हल्ल्यातील निरपराध आणि ऑपरेशन सिंदूर मधील वीर जवानांना समर्पित करून क्रिकेटपटूंनी भारतीयांची मने जिंकली आहेत. राष्ट्राचा सन्मान आणि पाकिस्तानच्या नीच वर्तनाला योग्य प्रत्युत्तर हे सगळ्याच पातळीवर देणे आवश्यक आहे. ऑपरेशन सिंदूर च्या माध्यमातून सैन्याने युद्धात दिले आणि आपल्या क्रिकेटसंघाने मैदानात दिले. दोघांचे अभिनंदन.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
ज्या सैन्याला गाई सांभाळता येत नाहीत ते देशाचे काय रक्षण करणार ??? पाकिस्तान मध्ये कराची च्या जवळपास कुठे तरी बन्नू कॅन्टोन्मेंट नावाचा आर्मी कॅन्टोन्मेंट आहे.त्याच्या अगदी समोरच आर्मीचे एक फार्म आहे.त्या फार्म मधून मुख्यतः बन्नू कॅन्टोन्मेंटला च दररोज दूध पुरवठा होतो. तीन दिवसांपूर्वी त्या फार्म वर काही आतंकवादी गेले आणि तिथून १३८ गायी व त्यांना सांभाळणारे दोन कामगार यांना चालत चालत बन्नू कॅन्टोन्मेंट समोरूनच घेऊन गेले.आता ३ दिवस झाले तरी त्या गायींचा आणि सोबत नेलेल्या त्या दोन कामगारांचा काहीही ठावठिकाणा लागलेला नाही.तपास करणाऱ्यांना फक्त इतकेच कळले की त्या फार्मवर आतंकी बराच वेळ होते.त्यांनी त्या गायींपैकी काही गायींचे दूध काढले,ते तिथेच आरामात बसून दूध प्याले आणि गायींना घेऊन निघून गेले. या बातमी ने पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. लोक म्हणत आहेत की या आमच्या आर्मीला त्यांच्याच साठी ठेवलेली गुरेढोरे सुद्धा सांभाळता येत नाहीत ती आर्मी पाकिस्तानी जनतेचे काय रक्षण करणार?
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
न्याय संस्थेला त्यांच्या तोडीची संस्था मिळाली आहे. ॲड.अश्विनी उपाध्याय यांनी एक याचिका दाखल केली होती की देशांतील सर्व राज्यांत निवडणूक आयोगाने एस आय आर करून नियमित कालांतराने मतदार याद्यांची सखोल तपासणी करावी असा आदेश सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगास द्यावा. काल त्या आदेशाला उत्तर म्हणून निवडणूक आयोगाने त्याचे शपथपत्र सुप्रीम कोर्टाला सादर केले. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाकडून शपथपत्र मागितले. निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टालाच स्पष्टपणे सुनावले की एस आय आर केव्हा आणि कुठे घ्यायचा हे ठरवण्याचा अधिकार फक्त आणि फक्त निवडणूक आयोगाचा च असून त्या संबंधात सुप्रीम कोर्टाने काही आदेश दिल्यास ते निवडणूक आयोगाच्या अधिकार क्षेत्रावर आक्रमण ठरेल. स्वतःच्या अधिकार क्षेत्राची अतिशय जागरूकपणे राखण करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाला एका घटनात्मक संस्थेने आरसा दाखवला हे उत्तम झाले.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
हिंदुत्ववादी संघटना सुद्धा आता आक्रमक होऊ लागल्या असून देशविरोधी तत्वांच्या उचापतींना वेळीच पायबंद घालण्याच्या दृष्टीने कार्यरत होत आहेत आणि हे खूप आवश्यक आहे. “महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयकाला” काही महाविकास आघाडी पक्ष, तथाकथित पुरोगामी आणि कम्युनिस्ट संघटना विरोध करत आहेत तसेच समाजाची दिशाभूल करण्याचे षडयंत्र सुरू आहेत. समाजातील विविध संघटनांनी एकत्र येत "नक्षल विरोधी जनसुरक्षा विधेयक समर्थन समितीच्या" वतीने या सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या व जनहिताच्या संविधानिक विधेयकाचे समर्थन करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर शहरात समर्थन सभा संपन्न झाली. नक्षल विरोधी जनसुरक्षा विधेयक समर्थन समिती अंतर्गत विविध राजकीय व सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी व सजग नागरिकांनी जनसुरक्षा कायद्याच्या समर्थनात उस्फुर्त उपस्थिती दर्शवली. अश्याच पद्धतीच्या सभा संपूर्ण महाराष्ट्रात होणार आहेत आणि ही लोकशाहीला बळकट करणारी गोष्ट आहे.
🔽
#Leadership #Accountability #NationalPride #Satire #Judiciary #Security #Unity #Democracy #IndiaFirst #ravindrachavan #Bjp













Comments