🖋️ अभिजीत राणे लिहितात
- dhadakkamgarunion0
- Sep 16
- 2 min read
🖋️ अभिजीत राणे लिहितात
“सबका साथ, सबका विकास, और सबका विश्वास” हा नरेंद्र मोदीजींचा सर्वात गाजलेला मंत्र आहे. २०१४ मध्ये पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी हा मंत्र उच्चारला आणि भारतीय राजकारणाला नवा मार्गदर्शक दिला. देशाच्या प्रत्येक घटकाला सोबत घेऊन सर्वांगीण विकास साधणे, जात-पंथ, धर्म यापलीकडे जाऊन प्रत्येकाला न्याय देणे आणि या प्रक्रियेत नागरिकांचा विश्वास जिंकणे हे या वाक्याच्या केंद्रस्थानी आहे. गेल्या दहा वर्षांत जनधन खाते, उज्ज्वला योजना, आयुष्मान भारत, डिजिटल इंडिया अशा उपक्रमांतून हा मंत्र प्रत्यक्ष कार्यवाहीत उतरला. सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून विकास करणे म्हणजेच खरी लोकशाही अशी त्यांची धारणा आहे. आज, त्यांच्या ७५व्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला हे वाक्य केवळ राजकीय घोषवाक्य नसून, भारताच्या नव्या युगाचा मूलमंत्र ठरले आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
“गरीबांचा सरकारवर हक्क” “ देशातील सरकारवर, संसाधनांवर पहिला अधिकार गरिबांचा आहे. देशातील शेवटच्या नागरिकापर्यंत विकासाची गंगा पोचवणे हे सरकारचे कर्तव्य आहे. यालाच दीनदयाळ उपाध्याय यांनी अंत्योदय हा शब्दात व्यक्त केले आहे. आम्ही सरकारी तिजोरीचे मालक नाही तर विश्वस्त आहोत.” हे शब्द मोदीजींनी २०१४ मध्ये पंतप्रधान शपथ घेतल्यानंतर पहिल्या भाषणात उच्चारले. त्यांच्या मते सत्ताधीश हा केवळ जनतेच्या अपेक्षांचा रक्षक आहे. उज्ज्वला योजना, पीएम आवास योजना, आयुष्मान भारत यांसारख्या निर्णयांतून हे वाक्य साकार झालं. गरीबांच्या हितासाठी सरकार झटावं हा संदेश त्यांनी सुरुवातीपासूनच दिला.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
“भारत सर्वप्रथम ही माझी धर्मनिरपेक्षता या शब्दाची व्याख्या आहे. सगळ्यांना न्याय मिळावा, कुणाचेही लांगूलचालन नको” हा प्रसिद्ध संदेश मोदीजींनी २०१२ मध्ये गुजरात दंगलींच्या संदर्भात दिला. तेव्हा त्यांच्यावर अनेक आरोप झाले, पण त्यांनी ठामपणे सांगितलं की खरी धर्मनिरपेक्षता म्हणजे सर्वांना न्याय आणि कोणत्याही एका पंथाची तुष्टीकरण नाही. पुढे केंद्रात सत्तेत आल्यानंतरही त्यांनी ‘सबका साथ, सबका विकास’ हा मंत्र दिला. हे वाक्य आजही भारतीय राजकारणातील धर्मनिरपेक्षतेची नवी व्याख्या ठरते.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
“सुशासनाची ओळख” “चांगल्या हेतूंनी प्रेरित सुशासन हे आमच्या सरकारचे वैशिष्ट्य आहे. प्रामाणिकपणे अंमल बजावणी करणे ही आमची मुख्य प्रेरणा आहे.” हे विधान मोदीजींनी २०१४ मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर संसदेत पहिल्यांदा मांडले. भ्रष्टाचारमुक्त कारभार आणि पारदर्शक धोरणे हीच खरी ओळख असेल असा त्यांचा ठाम विश्वास होता. जनधन योजना, थेट लाभ हस्तांतरण, डिजिटल इंडिया अशा उपक्रमांनी हे विधान प्रत्यक्षात उतरले. या शब्दांतून त्यांनी भारतीय लोकशाहीला जबाबदार सुशासनाची हमी दिली.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
“कष्टातून समाधान” “मला कठोर कष्ट केल्यावर थकवा येत नाही तर आपण कार्यक्षम असल्याचे समाधान वाटते.” हे मोदीजींचं सर्वात लोकप्रिय विधान आहे. २०१३ मध्ये पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी गुजरातमधील सभेत त्यांनी हे शब्द उच्चारले. त्यावेळी ते राज्यातील विकासकामांच्या आढाव्यात होते आणि कठोर परिश्रम करूनही थकवा न जाणवता समाधान लाभते हे त्यांनी लोकांना पटवून दिलं. हे वाक्य आज प्रत्येक तरुणासाठी प्रेरणा आहे. देशाला घडवताना मोदीजींनी किती तास काम केलं याचा दाखला म्हणजे हे विधानच होय.
🔽








Comments