🖋️ अभिजीत राणे लिहितात
- dhadakkamgarunion0
- Sep 12
- 3 min read
🖋️ अभिजीत राणे लिहितात
महाराष्ट्रात गुंतवणुकीचा नवा अध्याय! महाराष्ट्राने पुन्हा एकदा भारतातील सर्वात मोठे गुंतवणूक गंतव्यस्थान म्हणून आपली ओळख दृढ केली आहे. नुकत्याच झालेल्या सामंजस्य करारांमधून उद्योग, माहिती तंत्रज्ञान, फूड प्रोसेसिंग, वेअरहाऊसिंग, डेटा सेंटर्स आणि लॉजिस्टिक हब अशा महत्त्वाच्या क्षेत्रात तब्बल ₹1,08,599 कोटींची गुंतवणूक होणार आहे. यामुळे 47,100 रोजगारनिर्मिती होणार असून राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल. अडाणी एंटरप्रायझेसचा नागपूरमधील ₹70,000 कोटींचा प्रकल्प, लोढा डेव्हलपर्सचा ठाण्यातील डेटा सेंटर पार्क, रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्सचे नागपूरमधील खाद्य व पेय प्रकल्प, पॉलीप्लेक्सचे नंदुरबारमधील पॉलिमरिक उत्पादन केंद्र आणि एम जी एस ए चे वेअरहाऊस व लॉजिस्टिक हब हे महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीचे नवे टप्पे ठरणार आहेत. ही केवळ आकडेवारी नाही, तर राज्याच्या रोजगार व विकासाचा विश्वासार्ह पाया आहे. गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्र म्हणजे संधींची सुवर्णभूमी आहे!
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
नेपाळचे भूत दाखवणाऱ्यांना उत्तर ! विरोधक गेल्या दोन दिवसांपासून भारताला नेपाळसारखी परिस्थिती येऊ शकते असे भाकीत करत आहेत. पण त्यांच्या बोलण्यातून देशाची चिंता नाही, तर मोदींचे सरकार उलथवण्याची स्वार्थी इच्छा ठळकपणे डोकावते. हा राष्ट्रहिताचा प्रश्न नसून राजकीय सूडबुद्धीचा पुरावा आहे. खरे तर अशा नेत्यांना निवडून देणाऱ्या मतदारांची मानसिकता अधिक चिंताजनक वाटते. कारण ज्यांना भारताच्या स्थैर्याबद्दल उदासीनता आहे, अशा लोकांना संधी मिळाली नसती तर ते संसदेत गेलेच नसते. तरीही या देशाला मोदींसारखे नेतृत्व लाभले आहे, जे नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी अथक झटत आहे. हा विरोधकांसाठी केवळ मत्सराचा मुद्दा आहे, पण जनतेसाठी तो अभिमानाचा क्षण आहे. वाईट प्रतिनिधी निवडून देणाऱ्या मतदारांना चांगले नेतृत्व लाभते आहे, हेच भारताचे खरे नशीब आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
राहुल गांधीचा फुसका हायड्रोजन बॉम्ब! राहुल गांधी पुन्हा एकदा चर्चेत आहेत. यावेळी दावा केला आहे की ते "हायड्रोजन बॉम्ब" फोडणार! आणि म्हणे पुरावेही दाखवणार. खरं तर त्यांच्या मागे उभ्या असलेल्या लोकांच्या चेहऱ्याकडे पाहिलं तरच या बॉम्बची वात कळते—सगळे कंटाळलेले, नीरस चेहेरे. एकतर त्यांना काही माहित नाही, किंवा हा बॉम्बही आधीसारखाच फुसका ठरणार हे त्यांना ठाऊक आहे. भूकंप, बॉम्ब, फुसक्या घोषणांच्या यादीत हा "हायड्रोजन बॉम्ब" नव्या नावाने सामील होईल, यात शंका नाही. पुराव्यांची नवी घोषणा केली आहे म्हणजे या आधीचे सगळे "बॉम्ब" बिनपुराव्याचे होते हे राहुल गांधींनी मान्य केले आहे, हा मुख्य मुद्दा आहे. त्यांच्यासोबत संजय राऊतांचे बिनपुराव्याचे बॉम्ब आठवतात. कधी तरी एखादं कात्रण दाखवून "हा पुरावा" म्हणणारे नेते संसदेत वर्षानुवर्षे बसले आहेत, हीच भारतीय लोकशाहीची करामत आहे!
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
हिंदुत्वाची थट्टा करणाऱ्यांना धडा शिकवा! राहुल गांधी आज म्हणतो की तो हिंदू आहे, पण भाजपचे हिंदुत्व त्याला मान्य नाही. उद्धव ठाकरे अनेकदा सांगतात की त्यांचे हिंदुत्व शेंडी-जानव्याचे नाही. राज ठाकरे तर गणेशोत्सवात दगडूशेठच्या दर्शनाला जाऊन परत मटण खाल्ल्याची थट्टा करतात. हीच त्यांची खरी ओळख आहे—धर्माचा वापर फक्त राजकीय सोयीसाठी! हिंदू धर्म आणि परंपरांवर सतत प्रश्नचिन्ह उपस्थित करूनही हेच नेते स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेतात. पण खरे हिंदुत्व हे आचार, विचार आणि श्रद्धेतून येते; ते थट्टेच्या भाषेतून व्यक्त होत नाही. महाराष्ट्रातील मनपा-नपाच्या निवडणुकांमध्ये अशा लोकांना उमेदवार म्हणून उभे केले जाईल. प्रश्न आहे—हेच तुमचे प्रतिनिधी असावेत का? आजपासून विचार ठाम करा. मतदानाच्या वेळी हिंदुत्वाची थट्टा करणाऱ्यांना घरचा रस्ता दाखवा आणि खऱ्या संस्कारांची बाजू उचलून धरा.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
“मनोज जरांगे पाटील चौक”या मागणीला कडाडून विरोध होतो आहे. शिवाजी महाराज टर्मिनससमोरील चौकाचे नामंतर करण्याची मागणी जरांगे समर्थक करत आहेत. मात्र भूमिपुत्रांनी या मागणीवर तीव्र आक्षेप घेतला आहे. त्यांचे म्हणणे असे की, हा चौक ऐतिहासिक आहे. 1737 पूर्वीपासून इथे महाकाली मंदिर असून, हा भाग ‘मुंबई चौक’ म्हणून प्रसिद्ध आहे. इथल्या गल्ल्या, मंदिरे आणि व्यापार यांना शतकानुशतकांचा वारसा आहे. अशा ठिकाणांवर नेत्यांची नावे देऊन राजकीय लाभ मिळवण्याचा प्रयत्न होतो, पण त्यामुळे स्थानिकांची ओळख आणि इतिहास पुसला जातो. वारशाचे जतन आणि ऐतिहासिक सत्याचे जतन करणे हेच भविष्यातील पिढ्यांसाठी आवश्यक आहे. त्यामुळे चौकाला नवे नाव न देता, त्याच्या परंपरेचे आणि भूषणांचे स्मरण जपणेच योग्य ठरेल. राजकीय पाट्या बदलतात, पण वारशाची पाटी कायम टिकली पाहिजे.
🔽












Comments