top of page

🖋️ अभिजीत राणे लिहितात

  • dhadakkamgarunion0
  • Sep 10
  • 3 min read

🖋️ अभिजीत राणे लिहितात

“बाप्पाने दणका दिलाय” हे वाक्य यंदा अक्षरशः खरं ठरलं. ग्रहणाच्या छायेत विसर्जन व्हावं लागतंय, ही योगायोगाची गोष्ट नाही. लालबागच्या राजाच्या चरणी गेल्या काही दिवसांत जे दृश्य दिसलं, ते भक्तिभावाला काळिमा फासणारं होतं. सेलिब्रिटी आणि व्हीआयपींसाठी रांगा थेट फोडल्या गेल्या, त्यांना बडदास्त मिळाली, तर सामान्य भक्तांना मात्र पोलिसांनी मानगुटीला धरून बाहेर हाकललं. भक्तीचा राजा ‘सर्वांचा’ असतो, निवडकांचा नव्हे. भक्तांमध्ये दूजाभाव झाला, तेव्हा त्याचीच छाया आता विसर्जनावर उमटली आहे. देवाकडे जाणारा मार्ग पैसे किंवा ओळखपत्रावर ठरत असेल, तर भक्तिरसाला लागणारा ग्रहण हा अपरिहार्यच. लालबागचा राजा यंदा जणू स्वतःच्या भक्तांना धडा शिकवतोय — भक्ती खरी असेल, तर सर्वांना समान मान मिळाला पाहिजे. नाहीतर शेवटी राजा दणका देऊनच जागं करतो! आता तरी संबंधितांचे डोळे उघडतील ही आशा आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

पीटर नवरो यांच्या कॉमेंटने एक गोष्ट अगदी ठळकपणे सिद्ध केली आहे—अमेरिकन सरकार, सोरोस आणि राहुल गांधी हे वेगळे घटक नाहीत, तर एका सूत्रात बांधलेले आहेत. वरकरणी वेगवेगळ्या रंगाचे मुखवटे लावून खेळणारे हे खेळाडू, प्रत्यक्षात एकाच नाटकाच्या पाठीमागे उभे आहेत. भारताची ताकद वाढू नये, मोदी सरकारच्या प्रत्येक पावलावर प्रश्नचिन्ह उभे राहावे, आणि देशात अस्थिरतेचं वातावरण तयार व्हावं—हीच त्यांची एकत्रित धडपड आहे. कधी पर्यावरणाच्या नावाखाली, कधी मानवाधिकाराच्या नावाखाली, तर कधी आंतरराष्ट्रीय दबावाच्या नावाखाली ही टोळी भारताच्या हिताला अडथळा आणते. पीटर नवरो यांनी उघड केलेला हा धागा खरंतर नवाच नाही; पण त्याने लपवलेलं ‘कॉंग्रेस–सोरोस–अमेरिका’चं नातं आता सरळसोट समोर आलं आहे. भारताला खरा शत्रू बाहेर नाही, तर ह्या घरगुती परकीय दलालांमध्येच दडलेला आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

सोनिया गांधी यांनी आज कॉम्रेड एन.राम यांच्या द हिंदू मधून ग्रेट निकोबार प्रकल्पाला विरोध केला. पर्यावरणाचा आडोसा घेऊन त्यांनी नेमकं चीनच्या हिताला पोसणारं धोरण मांडलं. हा विरोध काही नवीन नाही – जसं आदित्य ठाकरेनं मुंबई मेट्रोला, मेधा पाटकर यांनी नर्मदा डॅमला, तसाच विरोध सोनियांचा. परंतु ग्रेट निकोबार प्रकल्प हा केवळ पायाभूत विकास नाही; तो राष्ट्रीय सुरक्षेचा, सामरिक वर्चस्वाचा आणि इंडो-पॅसिफिकमध्ये भारताला निर्णायक भूमिका देणारा आहे. मलक्का सामुद्रधुनीपासून अवघ्या ९० मैलांवर असलेले हे बेट चीनसाठी धोक्याची घंटा आहे. आधुनिक पोर्ट, धावपट्ट्या, टाउनशिप व ट्राय-सर्व्हिसेस कमांडमुळे भारताचे सागरी बळ दुपटीने वाढणार आहे. सोनिया-राहुल-प्रियंका तिघांनी मिळून केलेला विरोध हेच पुरावे आहेत की हा प्रकल्प १००% भारतासाठी चांगला आणि चीनसाठी धोकादायक आहे. मोदी सरकार हा प्रकल्प उभा करून भारताला महासामर्थ्य देणार, आणि विरोधकांना इतिहासाच्या कचरापेटीत टाकणार!

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

आजच्या काळात युद्धाइतकंच महत्त्वाचं असतं ते श्रेयाचं युद्ध! हमासच्या दहशतवादी नेत्यांवर झालेल्या कारवाईचं श्रेय कोणी घेणार याची स्पर्धा सुरू होण्याआधीच इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू यांनी डाव साधला. “ही कारवाई पूर्णपणे इस्रायलचीच, आम्हीच सुरू केली, आम्हीच पार पाडली आणि पूर्ण जबाबदारीही आमचीच,” असं जाहीर करून त्यांनी जगाला स्पष्ट संदेश दिला. खरा उद्देश होता ट्रंपसारख्या श्रेयखाऊ नेत्यांना आधीच रोखणे. कारण कालपर्यंत अफगाणिस्तानपासून मध्यपूर्वेपर्यंत प्रत्येक बॉम्बहल्ल्याचं श्रेय स्वतःकडे वळवणारा ट्रंप, ह्या कारवाईचंही ‘मीच केले !’ असं ट्वीट करणार हे नक्कीच. पण नेत्यानाहूंनी ती संधीच दिली नाही. यातून एक गोष्ट अधोरेखित झाली—इस्रायल जेव्हा कारवाई करतो, तेव्हा ती एकटीने करतो आणि त्याची जबाबदारीही एकटीने घेतो. गोळीबार जितका अचूक, तितकाच हा निवेदनाचा वार अचूक होता!

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

लिपुलेखचा वाद हा काही आजचा नाही. २०१५ पासून भारत-नेपाळमध्ये या विषयावर खटके उडत आहेत. पण खरे वास्तव वेगळे आहे—नेपाळी लोकशाही गेल्या १७ वर्षांत पूर्णपणे अपयशी ठरली आहे. तब्बल १० वेगवेगळे पंतप्रधान, १४ शपथविधी, कोणताही कार्यकाळ पूर्ण न करणारे सरकार आणि प्रत्येक वेळची गद्दारी—हेच चित्र राहिले. भ्रष्टाचार सर्वत्र आणि पक्षनिष्ठा शून्य. ओलींचा राजीनामा ही केवळ परंपरेचीच पुनरावृत्ती होती. परिणामी, सैन्याने सत्ता हातात घेतली आणि राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात नेपाळचे संस्थापक पृथ्वीनारायण शाह यांचे चित्र पार्श्वभूमीला लावून एक स्पष्ट संदेश दिला—देशाच्या एकतेशी खेळ करणारांना कठोरपणे थांबवले जाईल.नेपाळ आता पुन्हा ‘राजेशाही + लोकशाही’ मॉडेलकडे वळत असल्याचे संकेत आहेत. लोकशाहीचे अपयश मान्य करून स्थैर्याकडे चाललेला हा प्रवास नेपाळी जनतेच्या जागृतीचे प्रतीक आहे.

🔽


ree
ree
ree
ree
ree

 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page