top of page

🖋️ अभिजीत राणे लिहितात

  • dhadakkamgarunion0
  • 2 days ago
  • 3 min read

🖋️ अभिजीत राणे लिहितात

ढाका रहस्य : मोदींच्या हत्येचा कट ??? ढाक्यात 31 ऑगस्टला वेस्टिन हॉटेलमध्ये अमेरिकन स्पेशल फोर्सेसचे वरिष्ठ अधिकारी टेरेंस ऑरवेल जॅक्सन मृतावस्थेत आढळले आणि संपूर्ण जगाचे कान टवकारले गेले. पोस्टमार्टमशिवाय मृतदेह दूतावासाने ताब्यात घेणे, नकाशे व इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करणे, हा प्रकार सरळ “गुप्त मिशन”ची साक्ष देतो. याच काळात माजी राजदूत पीटर हासच्या संशयास्पद भेटी आणि दुसरीकडे शांघाई शिखर परिषदेत पुतिन–मोदी यांची दुभाषाशिवाय झालेली दीर्घ चर्चा, या घटनांचा संगम साधाच वाटत नाही. जॅक्सन भारताच्या पंतप्रधानांवर एखाद्या घातक ऑपरेशनसाठी ढाक्यात होता का? की त्यालाच कोणीतरी “साइलेंट” केले? भू-राजनीतीत अपघात नसतात, फक्त आखलेले डाव असतात. ढाका प्रकरण हे एका महाशक्तीच्या बुद्धिबळातील घातक प्यादे होते, आणि त्या चालीचा लक्ष्य भारताचा नेतृत्वही असू शकते.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

कर्नाटकात मतपत्रिकांचा खेळ — लोकशाहीला मागे नेणारा निर्णय! कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जाहीर केलेल्या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. आगामी पंचायत व नागरी निवडणुकांत ईव्हीएमचा वापर न करता पुन्हा मतपत्रिकांचा अवलंब केला जाणार आहे. आधुनिक भारताने पारदर्शकता व कार्यक्षमता यासाठी स्वीकारलेली निवडणूक यंत्रणा एका क्षणात नाकारली जाणे हे धक्कादायक आहे. हा निर्णय केवळ तांत्रिक मागासलेपणाचे द्योतक नाही, तर मतदारांच्या मनात अनावश्यक गोंधळ निर्माण करणारा आहे. ईव्हीएमवरील अविश्वास पसरवून काँग्रेस राजकीय लाभ मिळवू पाहते आहे, असा स्पष्ट आभास यातून होतो. मतपत्रिका म्हणजे गैरव्यवहार, गोंधळ व वादांचा महामार्ग. अशा प्रकारे लोकशाही प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उभे करणाऱ्या या भूमिकेचा तीव्र निषेध व्हायलाच हवा.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

कर्नाटकात मतपत्रिकांचा खेळ — लोकशाहीला मागे नेणारा निर्णय! कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जाहीर केलेल्या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. आगामी पंचायत व नागरी निवडणुकांत ईव्हीएमचा वापर न करता पुन्हा मतपत्रिकांचा अवलंब केला जाणार आहे. आधुनिक भारताने पारदर्शकता व कार्यक्षमता यासाठी स्वीकारलेली निवडणूक यंत्रणा एका क्षणात नाकारली जाणे हे धक्कादायक आहे. हा निर्णय केवळ तांत्रिक मागासलेपणाचे द्योतक नाही, तर मतदारांच्या मनात अनावश्यक गोंधळ निर्माण करणारा आहे. ईव्हीएमवरील अविश्वास पसरवून काँग्रेस राजकीय लाभ मिळवू पाहते आहे, असा स्पष्ट आभास यातून होतो. मतपत्रिका म्हणजे गैरव्यवहार, गोंधळ व वादांचा महामार्ग. अशा प्रकारे लोकशाही प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उभे करणाऱ्या या भूमिकेचा तीव्र निषेध व्हायलाच हवा.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा असंवेदनशील वक्तव्य करून जनतेच्या भावनांशी खेळ केला आहे. मुख्यमंत्र्यांविरोधातील त्यांची टीका फक्त राजकीय मर्यादा ओलांडत नाही, तर सामाजिक विद्वेष निर्माण करत आहे. जरांगे पाटील यांचे आंदोलन यशस्वी झाले आणि मुख्यमंत्र्यांनी समस्या सोडवली हेच त्यांना पटत नाही. प्रत्येक वेळी काहीतरी बोलून समाजाला पेटवायचे आणि नंतर बचावात्मक स्पष्टीकरण द्यायचे.पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दिलेली त्यांची अतिशय गैरजबाबदार टिप्पणी अजूनही जनतेच्या मनातून पुसली गेलेली नाही. शहीद जवानांबद्दल अपेक्षित संवेदनशीलता न दाखवता त्यांनी केलेले शब्दांचे अपमानकारक खेळ जनतेने विसरलेले नाहीत. आज पुन्हा त्याच पद्धतीने समाजाचे मनोबल खच्ची करणे आणि मतदारांमध्ये वैमनस्य पेरणे, ही त्यांच्या कारकीर्दीची नवी पायरी आहे. खरे तर विजय वडेट्टीवार हे राजकारणातील सिरीयल ऑफेंडर ठरत आहेत आणि महाराष्ट्रातील जनतेने त्यांच्या या प्रवृत्तीला जाब विचारायलाच हवा.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

अमोल मिटकरींचे अतिरेकी राजकारण! आपल्या नेत्याचे बचाव करण्याच्या नादात आमदार अमोल मिटकरी यांनी मर्यादांच्याही पलीकडे जाण्याचे धाडस केले आहे. लोकसेवा आयोगाला पत्र लिहून वरिष्ठ आयपीएस अधिकार्‍यांच्या कागदपत्रांची मागणी करणे ही लोकप्रतिनिधींच्या भूमिकेला न शोभणारी कृती आहे. राजकीय मतभेद असू शकतात, पण अधिकार्‍यांच्या वैयक्तिक नोंदींवर प्रश्नचिन्ह उभे करणे हा थेट प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न ठरतो. मिटकरी यांची ही कृती केवळ पोलिस दलाचा अपमान नाही तर लोकशाहीच्या सुसंस्कृत चौकटीवरही गदा आणणारी आहे. जनतेचा विश्वास राखणे आणि सत्तेचा वापर जबाबदारीने करणे ही आमदारांची खरी जबाबदारी आहे; वैयक्तिक वैरासाठी संस्था व अधिकारी यांना लक्ष्य करणे नाही.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

जीएसटी कपातीचे दूरगामी परिणाम! जीएसटी दर कमी करण्याचा लाभ केवळ ग्राहकांच्या खिशात मर्यादित राहत नाही, तर त्याचे पडसाद संपूर्ण अर्थव्यवस्थेत उमटतात. शेतकरी, व्यापारी, उद्योगपती या सगळ्यांनाच नवसंजीवनी मिळते. उत्पादन स्वस्त झाले की निर्यात वाढते, अंतर्गत मागणी बळकट होते आणि रोजगारनिर्मितीला चालना मिळते. याच संदर्भात भारतीय लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांची प्रतिक्रिया महत्त्वाची आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या जीएसटी सुधारणांमुळे डिफेन्स कॉरिडॉरना मोठा लाभ होणार आहे. संरक्षण क्षेत्रात होत असलेली गुंतवणूक, देशांतर्गत उत्पादन व “मेक इन इंडिया”चा आत्मविश्वास याला जीएसटी कपात अधिक गती देणार आहे. म्हणूनच ही सुधारणा केवळ कररचनेतील बदल नसून, भारताच्या आर्थिक व सामरिक सामर्थ्याला नवे बळ देणारी क्रांतिकारी पाऊल आहे.

🔽


ree
ree
ree
ree
ree

 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page