🖋️ अभिजीत राणे लिहितात
- dhadakkamgarunion0
- 5 days ago
- 3 min read
🖋️ अभिजीत राणे लिहितात
वेल डन देवाभाऊ! गेल्या आठवडाभर महाराष्ट्र अस्वस्थ होता. अफवा, निराशा, शंका-कुशंका यांचे सावट दाटले होते. विरोधकांचा आनंद उधळून टाकणारी परिस्थिती होती—"आता फडणवीस कसे निभावतात?" हा प्रश्न सर्वांच्या ओठांवर होता. पण ज्याने चक्रव्यूह फोडण्याची कला आत्मसात केली आहे, त्याला अडवू शकेल अशी परिस्थिती कुठे? तहान, भूक, झोप हरपलेली असताना देखील फडणवीस शांत चेहऱ्याने लालबागचा राजा, पुणे दौरा, नाना पाटेकरांचा गणपती दर्शन असे कार्यक्रम पार पाडत होते. आतून वादळ, बाहेर स्थैर्य—याचं नाव नेतृत्व! पडद्यामागे चाललेल्या हालचालींनी शेवटी महाराष्ट्राला दिलासा दिला. आंदोलनाची सांगता झाली, राज्य स्थिरावलं आणि एक प्रामाणिक, सुसंस्कृत मुख्यमंत्री हकनाक बळी गेला नाही याचा आनंद झाला. आज गणपती विसर्जनाबरोबरच राज्याच्या मोठ्या समस्येचंही विसर्जन झालं. खरंच—वेल डन देवाभाऊ!
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
फडणवीस : शब्दाला जागणारे नेतृत्व! दशकानुदशके महाराष्ट्रात लोंबकळत राहिलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याचे धाडस कुणी केले नाही. पण देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे दिलेला शब्द — “ओबीसी समाजाचे नुकसान न होता मराठ्यांना आरक्षण देऊ” आज पूर्ण झाला आहे. हेच त्यांचे आत्मविश्वासपूर्ण नेतृत्व! शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेस यांच्या काळात कोणीही स्पष्ट भूमिका घेतली नाही; फडणवीस मात्र ठाम उभे राहिले. आज मनोज जरांगे यांनीही मंत्रिमंडळाने आरक्षणाचा जीआर काढल्याचे सांगून फडणवीस यांचा शब्द खरा ठरल्याचे मान्य केले. पण श्रेय स्वतःकडे न खेचता उपसमिती, शिंदे-अजित पवार यांचे अभिनंदन करणारी फडणवीसांची नम्रता महाराष्ट्राला भावून गेली. एकीकडे काम न करता श्रेय घेणारे नेते, तर दुसरीकडे काम करूनही नम्र राहणारे फडणवीस! महाराष्ट्राचे खरे विकासपुरुष, शब्दाला जागणारे, कार्यक्षम आणि लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मांनापासून शुभेच्छा !
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
सावधानतेचं शस्त्र ! पटेल, गुज्जर, ओबीसी, लिंगायत यांच्या आंदोलनात मी त्यांच्या सोबत उभा होतो, आणि मराठा आरक्षणालाही माझा ठाम पाठिंबा आहे. आज मी ग्राउंड-झिरोवर आहे; फक्त सोशल मीडियावर दोन पोस्ट लिहिणं हा पाठिंब्याचा निकष ठरू शकत नाही. शिवशंभूप्रेमी राष्ट्रनिष्ठ मराठा समाज आणि आजवरचे सर्वांत संवेदनशील सरकार एकत्र येऊन कायद्याच्या चौकटीत बसणारा तोडगा काढतील, याची मला खात्री आहे. पण या लढ्यात भावनांमध्ये वाहून जाऊ नका. हजारो फेक अकाउंट्स, क्लिक-बेट हेडलाईन्स, डीप फेक व्हिडिओ आणि एआय इमेजेसच्या माध्यमातून लाल-हिरवा-पिवळा अजेंडा राबवला जात आहे. ब्राह्मण- मराठा नावाने फूट पाडण्याचा डाव सुरू आहे. समाजातील १% हलकट लोक या गोंधळावर जगतात. तुम्हीच सावध राहिलात, तर ९९% चांगल्या माणसांची ताकद कोणत्याही अजेंड्याला चिरडून टाकेल
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
एकदिलाची शपथ! भारताविरुद्ध रचला जाणारा आंतरराष्ट्रीय कट आता उघडपणे दिसू लागला आहे. दंगली, राडे, घातपात घडवून देशाचे आर्थिक नुकसान करायचे, नेतृत्व डळमळीत करायचे, ही नीच खेळी आहे. पण हा डाव तेव्हाच यशस्वी होईल जेव्हा आपणच एकमेकांत फूट पाडून घेऊ. म्हणूनच प्रत्येक भारतीयाने आज ठरवले पाहिजे—कोणत्याही कारणास्तव हिंदू समाजात दुफळी होऊ देणार नाही आणि कोणत्याही प्रक्षोभक गोष्टींना बळी पडणार नाही. मोदी सरकार आधीच अनेक फ्रंटवर लढत आहे; नवे फ्रंट उघडणे म्हणजे शत्रूला संधी देणे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यासाठी जसे सर्व जातीधर्मातील वीरांनी बलिदान दिले, तसेच आज देशासाठी एकदिलाने उभे राहणे हीच खरी देशभक्ती आहे. हाच निर्धार व्हाईट हाऊसच्या डावांना, टूलकिटजीवींना, अर्बन नक्षल्यांना आणि विरोधकांच्या पिद्दी अलायन्सला खरा झटका देईल.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
भारताची ठाम वाटचाल! ट्रंपच्या टॅरिफच्या धमक्या, भारतीय कॉर्पोरेट्सना धाक दाखवणे आणि देशात जातीय विष पेरून अस्थिरता निर्माण करण्याच्या रिकाम्या कृत्यांमध्ये अमेरिका गुंतली आहे. त्याचवेळी चीनमध्ये झालेल्या महत्वाच्या एससीओ बैठकीत मोदी, पुतीन आणि जिनपिंग यांची चर्चा जगाच्या लक्षवेधी ठरली आहे. कालच्या दोन घडामोडींनी स्पष्ट केले की भारताने अमेरिकेच्या दबावाला फाट्यावर मारले आहे. पण त्याच वेळी भारत इतर कोणत्याही महासत्तेला डोक्यावर बसू देत नाही. ही संतुलनाची कला, ही आत्मनिर्भरतेची झलक आणि ही राजनैतिक धैर्यशीलता भारताला वेगळे स्थान मिळवून देत आहे. आज भारत केवळ श्रोता नाही तर निर्णय घेणारा खेळाडू आहे.
🔽
#WellDoneDevendra #LeadershipMatters #MarathaReservation #OBCSecurity #StrongMaharashtra #UnityIsStrength #StayAlert #OneIndiaOnePeople #GlobalIndia #RisingIndia #Abhijeetrane





Comments