top of page

🖋️ अभिजीत राणे लिहितात

  • dhadakkamgarunion0
  • Aug 11
  • 2 min read

🖋️ अभिजीत राणे लिहितात

राजकारणात शब्दांचे शस्त्र कधी कधी तलवारीपेक्षा तीक्ष्ण सिद्ध होते, याचे नवे उदाहरण म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शरद पवारांवरील हल्ला म्हटला पाहिजे. पवारांच्या ‘१६० जागा’ विधानावर फडणवीसांनी ‘सलिम-जावेदच्या चित्रपटाची स्क्रिप्ट’ अशी उपमा देत टोला लगावला. या भाष्याने राजकारणात खळबळ माजली आहे. सामान्यतः फडणवीस सुसंस्कृत भाषेत संवाद साधतात परंतु आता त्यांनी सुद्धा ठोशाला ठोसा लगावणे सुरू केले आहे. महाराष्ट्रात दोन पिढ्यांपासून प्रभाव असलेल्या पवारांना अशा सिनेमाई भाषेत आव्हान देणे म्हणजे त्यांच्या राजकीय दाव्यांना थेट अविश्वसनीय ठरवणे आहे. विरोधकांच्या मर्यादाहीन टीकेला त्याच शब्दात उत्तर देणे कधी कधी आवश्यक असते. यातून जनसामान्यांना सत्य काय आहे हे आपोआप उमगते.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारच्या कार्यकाळात झालेल्या कथित भ्रष्टाचाराविरोधात राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. या मोहिमेतून उबाठा गट, आपला ‘निष्कलंक नेतृत्व’ हा ब्रँड पुन्हा जागृत करण्याचा प्रयत्न करत आहे. विशेष म्हणजे, शिंदे गटाला अडचणीत आणण्यासाठी त्यांनी थेट पायाभूत प्रकल्पांतील गैरव्यवहार, कंत्राटातील अनियमितता आणि प्रशासकीय हस्तक्षेप यांचा मुद्दा उचलला आहे. लोकांच्या मनात आधीच महागाई, बेरोजगारी आणि स्थानिक पातळीवरील भ्रष्टाचाराबद्दल नाराजी आहे. त्यामुळे ही मोहीम फक्त राजकीय स्टंट ठरेल की खरोखर सरकारला घाम फोडणारी ठरेल, हे पाहणे रंजक ठरेल.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले, तर मुंबई–ठाण्यासारख्या शहरी भागात मराठी मतांची एकजूट होऊ शकते, असा राजकीय अंदाज आहे. मनसे आणि शिवसेना उबाठा एकत्र लढली, तर भाजप–शिंदे गटासाठी शहरी मराठी मतदारांचा गड मिळवणे कठीण होईल. मात्र या एकजुटीचे राजकारण केवळ ‘मराठी’ या भावनेवर न थांबता विकास, रोजगार आणि स्थानिक प्रश्नांवरही आधारित असावे लागेल. कारण आजचा मतदार भावनिक मुद्द्यांइतकाच व्यवहारिक मुद्द्यांनाही महत्त्व देतो. ही जोडी खरंच जुळली, तर मुंबईच्या राजकारणात नवा अध्याय सुरू होऊ शकतो.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

राज्यातील शिंदे–फडणवीस सरकारमध्ये अपेक्षित मंत्रीमंडळ विस्ताराच्या चर्चेला वेग आला आहे. अनेक आमदारांना मंत्रीपदाची प्रतीक्षा आहे, तर काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. या विस्तारात प्रादेशिक संतुलन, जातीय समीकरण आणि आगामी निवडणुकीतील रणनीती—हे तिन्ही घटक महत्त्वाचे ठरणार आहेत. भाजप आपला राजकीय प्रभाव वाढवण्यावर भर देईल, तर शिंदे गट आपली सत्ता टिकवण्यासाठी विश्वासू लोकांना पदं देईल. विस्तार कधी होतो आणि त्यात कोणाला स्थान मिळते, हे पुढील राजकीय समीकरण ठरवणारे ठरेल. अकार्यक्षम , वादग्रस्त मंत्र्यांना डच्चू दिला जाणार का ही चर्चा रंगली आहे ? धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्री करणार का हा मुद्दा सुद्धा चर्चेत आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

दिल्लीतील राहुल गांधींच्या अध्यक्षतेखालील इंडिया आघाडीच्या बैठकीत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना सातव्या रांगेत बसवण्यात आले. कधी काळी भाजपा नेत्यांकडून सर्वोच्च सन्मान मिळालेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या वारसाला आज अशी वागणूक! ही केवळ आसनव्यवस्था नसून, बदललेल्या राजकीय समीकरणांचे स्पष्ट प्रतीक आहे. एकेकाळी महाराष्ट्रात ‘किंगमेकर’ असणाऱ्या पक्षाची राष्ट्रीय पातळीवरील पत आता केवळ एक ‘जागा भरणारा’ सहयोगी पक्ष अशी झाली आहे. उद्धव ठाकरे यांना मिळालेली ही आसनव्यवस्था त्यांच्या राजकीय प्रवासातील नवीन वास्तव दाखवते की, ज्या मित्रांवर विसंबून त्यांनी जुना गड सोडला, तेच आज त्यांना काठावर बसवतात. उद्धव ठाकरे यांचे अवमूल्यन ही कोंग्रेसची वापरा आणि फेकून द्या हे प्रवृत्ती दर्शवते आहे.

🔽


ree
ree
ree
ree
ree

 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page