top of page

🖋️ अभिजीत राणे लिहितात

  • dhadakkamgarunion0
  • Aug 1
  • 3 min read

🖋️ अभिजीत राणे लिहितात

लोकसभेत माननीय पंतप्रधानांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की जगातील कोणत्याही नेत्याने मे २०२५ मध्ये झालेले भारत - पाकिस्तान युद्ध थांबवण्यास सांगितले नाही. आता जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही असे म्हटल्यावर त्यात अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प सुद्धा आलाच हे सर्वसामान्य बुद्धीच्या कोणालाही कळेलच.पण राहुल गांधीला ते कळले नाही आणि तो असे म्हणाला की भारत पाक युद्ध थांबवण्यास ट्रम्प ने सांगितले नाही असे मोदी म्हणाले नाहीत.याच्या सारख्या फडतूस माणसाची मर्जी सांभाळण्यासाठी याला हवेत तेच शब्द उच्चारून पंतप्रधान मोदींनी संसदेत भाषण करावे असे म्हणणारा हा इसम किती हुकूमशाही वृत्तीचा आहे,पहा.हा केवळ विरोधी पक्षांचा लोकसभेतील नेता असताना याची ही अशी दादागिरी.मग हा जर कधी पंतप्रधान झाला तर इंदिरा गांधीने आणीबाणी च्या काळात भारतीय जनतेवर जे अत्याचार केले होते त्यांच्या दसपट अत्याचार हा नालायक करेल हे नक्की.भारतीय मतदारांनी हा धोका कधीही नजरेआड करू नये आणि याला लवकरात लवकर राजकीय दृष्ट्या संपवून टाकावे हे च देश हिताचे आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

“अगा मुजावरा तुझ्यात मी कलाम पाहीला”. कालच्या खटल्याला संपुर्ण कलाटणी देऊन "भगवा आतंकवाद" शब्द मातीमोल करणारा एक सच्चा देशभक्त मुसलमान. महिबूब मुजावर! धर्माने मुस्लिम आणि त्यात तत्कालीन गृहमंत्र्यांच्या गावचा म्हणजे सोलापूरचा... म्हणून कदाचित नीच काँग्रेस सरकारच्या नीच गृहमंत्र्याने सुशिलकुमार शिंदेने मोठ्या अपेक्षेने जबाबदारी टाकली मालेगाव बाँबस्फोटाची यांच्यावर. सोबतच नीचतम पातळीचा एक आदेश... मोहन भागवतांना या केस मध्ये गोवण्याचा, आणि उचलून फरफटत आणण्याचा... किती क्रूर द्वेषाचे राजकारण काँग्रेस करते त्याचा हा अजून एक पुरावा...!मात्र हे आदेश झुगारून सत्याची साथ देण्याची किंमतही मुजावरांना चुकवावी लागली. त्यांच्यावर खोट्या केसेस टाकण्यात आल्या. त्यातूनही ते निर्दोष सुटले. कोर्टात त्यांनी हा सगळा जबाब नोंदवला आहे. सुशीलकुमार शिंदे कायम म्हणत असत मी साधा पट्टेवाला होतो सोनिया मॅडमने मला गृहमंत्री केले. परंतु या शिंद्यांनी मॅडमच्या उपकारांचे पांग फेडण्यासाठी देशहिताला तिलांजली दिली आणि त्यांच्या इशार्‍यावर भगवा आतंकवाद हा खोटा शब्द जन्माला घातला. शिंदे तुम्हाला याचे फळ नियती नक्कीच देईल !!!

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

अमेरिकेच्या अध्यक्षाने अमेरिकेचे हित पाहणे योग्य आहे अगदी तसेच भारताच्या पंतप्रधानांनी भारताचे हित पाहणे योग्य आहे.ट्रम्पला जर युक्रेन आणि रशियाचे युद्ध थांबवायचे असेल तर ते त्याने दोघांना वाटाघाटीसाठी एकत्र आणून थांबवावे.पण भारत आणि चीन रशियाकडून क्रूड ऑईल घेत असल्यामुळे रशियाला पैसे मिळत राहतात आणि त्यामुळे रशियाचे युक्रेनवर आक्रमण सुरू राहते म्हणून भारताने व चीन ने रशियाकडून क्रूड घेणे बंद करावे नाहीतर आज जाहीर केलेल्या 25% इम्पोर्ट ड्युटी खेरीज अमेरिका भारतावर 10% पेनल्टी लावणार हा अन्याय आहे. चीन ने तर आधीच जाहीर केले आहे की चीनच्या मालावर जेव्हढी इम्पोर्ट ड्युटी,पेनल्टी इत्यादी अमेरिका लावेल तेव्हढीच ड्युटी,पेनल्टी इत्यादी चीन सुद्धा अमेरिकन मालावर लावेल. आता भारताला सुद्धा या सारखीच काही कारवाई करावी लागेल असे दिसते. परंतु भारताची अर्थव्यवस्था अमेरिकेच्या केवळ एक अष्टमांश आकाराची आणि चीनच्या तुलनेत फक्त एक पंचमांश आकाराची असल्याने भारतापुढचे आव्हान बरेच कठीण आहे. परंतु भारत आणि अमेरिका यांचा व्यापार लक्षणीय पातळीवर नसल्याने आपल्याला फारसा फरक पडणार नाही.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

मोदींनी पिसाळून टाकलेला दूसरा माणूस म्हणजे राहुल गांधी. हे महाशय विरोधीपक्षनेते किंवा कोंग्रेसी नेते कमी आणि चीनचे एजंट जास्त आहेत. चीनला ऑपरेशन सिंदूर मधील भारताची व्यूहरचना आणि भारताने पाकिस्तानला कसे निष्प्रभ केले आणि भारताचे यात नुकसान झाले का ? हे जाणून घेण्यात प्रचंड रस आहे आणि त्यांचा बोलका शंख बनून राहुल गांधी ही माहिती मिळावी म्हणून जंगजंग पछाडत आहेत. त्यांच्या हाती काहीही लागत नाही. आपल्या चीन मधील पोशिंद्यांना काय उत्तर द्यावे या प्रश्नाने ते हैराण झाले असून मोदींना , ट्रंपला सापडेल त्याला शिवीगाळ करत बोलत आहेत. हे करताना त्यांना इतके सुद्धा भान नाही की आपण संसदेत उभे राहून बोलत आहोत आणि संपूर्ण देश हे ऐकतो आहे. हे अधिवेशन संपेल तोपर्यंत भारतातील प्रत्येक नागरिकाला कोंग्रेस विदेशी एजंट असल्याचे नक्की उमजले असेल. आणि राहुल गांधी पिसाळण्याचे हे मुख्य कारण आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

नरेंद्र मोदी यांनी दोन माणसांना सध्या पिसाळून टाकले आहे. त्या दोघांचेही मानसिक संतुलन ढळले असून ते अक्षरशः शिव्यांची लाखोली वहात फिरत आहेत. पहिली व्यक्ति अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप. ट्रंप यांची इच्छा भारताने अमेरिकेच्या अटींवर शस्त्र करार करावे , व्यापार करार करावे , रशियाचे तेल घेऊ नाही, ब्रिक्स राष्ट्रांनी परस्परांशी सुद्धा आपल्या चलनात व्यवहार न करता डॉलर वापरावे. मोदी यापैकी काहीच ऐकत नाहीत. इतकेच नाही तर मोदी अमेरिकेच्या सर्व संभाव्य दडपण , चाली आणि टेरिफ धमक्या यातून अत्यंत खुबीने मार्ग काढत आहेत. अमेरिका व्यापार करार आपल्याला हवा तसा व्हावा म्हणून दडपण आणत बसली. भारताने दोन्ही देशांचा लाभ होणारा करार ब्रिटन बरोबर करून ट्रंप यांनी कितीही टेरिफ लावला तर माल साठणार नाही, इंग्लंडला जाईल याची सोय केली. पाकिस्तानला भारत जितकी किंमत देतो तितकी किंमत सुद्धा आता ट्रंप यांना दिली जात नाही आणि त्यामुळे ते पिसळले आहेत. जगभरातील अमेरिकेला घाबरून रहाणारी राष्ट्रे मात्र भारताचे कौतुक करत आहेत.

🔽

ree
ree
ree
ree
ree

 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page