🖋️ अभिजीत राणे लिहितात
- dhadakkamgarunion0
- Jul 25
- 3 min read
🖋️ अभिजीत राणे लिहितात
लोकसांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण ! ही म्हण आपल्या न्यायव्यवस्थेला चपखल लागू होते. माहिती अधिकार कायदा आल्यावर सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींनी आपली संपत्ती जाहीर करावी म्हणून अर्ज केला. त्याची दखल घेतली न गेल्यामुळे त्याने थेट केंद्रीय मुख्य माहिती अधिकारी अर्थात सी आय सी यांच्याकडे अर्ज केला. केंद्रीय माहिती अधिकारी यांनी सुप्रीम कोर्टाला आदेश दिला की त्यांनी आपल्या सर्व न्यायमूर्तींची मालमत्ता माहिती जाहीर करावी. सुप्रीम कोर्टाने सी आय सी च्याच आदेशाविरुद्ध दिल्ली हायकोर्टात अपील केले की सर्वोच्च न्यायालय आपल्या न्यायमूर्तींची संपत्ती जाहीर करणार नाही. दिल्ली उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी सी आय सी चा आदेश योग्य ठरविला. सन २००९ मध्ये दिल्ली हायकोर्टाने हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाकडे पाठवून दिले. सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींनी हा खटला तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे दाखल केला. त्यांनी आठ वर्ष सुनावणी करून हा खटला पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे दाखल केला. अखेर सन २०१९ मध्ये निकाल दिला गेला की सुप्रीम कोर्टाने आपल्या न्यायमूर्तींची संपत्ती जाहीर करायला हवी. पण यात एक मेख आहे न्यायमूर्तीनी स्वतःच्या संपत्तीचे विवरण दिले तरच ते जाहीर होणार. मात्र असे विवरण देण्यास कोणतीही सक्ती करण्यात आलेली नाही!! थोडक्यात नेत्यांच्या भ्रष्टाचारावर शिक्षा ठोठावणारे कोर्ट स्वतःच्या बाबतीत मात्र गप्प आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस साजरा केला गेला आणि त्यानिमित्त खूप काही लिहिले गेले परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन रुग्णसेवेतील अंत्योदय साधण्याची तळमळ राखली आहे आणि त्यादृष्टीने होणारे प्रामाणिक प्रयत्न मात्र कुणी रेखाटले नाहीत. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री झाल्यावर सुरू केलेला हा सहाय्यता निधी आहे. मुख्यमंत्र्यांनी या ट्रस्टच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला कागदी घोडे न नाचवता तत्काळ आर्थिक मदत देणायसाठी हा निधी निर्माण केला आहे. या ट्रस्टद्वारे मुख्यतः तातडीने वैद्यकीय उपचार आवश्यक असलेल्या रुग्णांना तितक्याच तातडीने मदत पोहोचवली जाते. हा ट्रस्ट राज्यातील रुग्णालये, उपचारकेंद्र यांच्याशी जोडला गेला आहे. केवळ रुग्णाचे नातेवाईकच नव्हे तर रुग्णाच्या वतीने रुग्णावर उपचार करणारे डॉक्टर देखील या ट्रस्टला मदतीसाठी अर्ज करू शकतात. कोणत्याही परिस्थितीत तातडीने रुग्णाला उपचार सुरु करणे जरुरीचे हे प्राधान्य हा ट्रस्ट जाणतो. त्यासाठी राज्यभरातील वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर आणि शल्यविशारद या ट्रस्टसाठी जोडले जाण्याची सोपी सोय या ट्रस्टसाठी उभारलेल्या तांत्रिक यंत्रणेत आहे. देवेंद्रजी खर्या अर्थाने लोकनेते आहेत. त्यांचा आम्हाला अभिमान वाटतो.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
खोटे बोल पण रेटून बोल. खोटे बोल ते सुद्धा निर्लज्ज होऊन बोल असा सध्याच्या मीडियाचा खाक्या झाला आहे. परंतु संजय राऊत यांच्यासारखा संपादक आणि खासदार सुद्धा खोटे बोलतो ही शरमेची बाब आहे. काल एक बातमी फिरत होती की हर्षल पाटील या सांगलीतील युवकाचे देयक जिल्हा परिषदेने दिले नाही म्हणून त्याने आत्महत्या केली. राऊत यांनी थेट मोदींना मेंशन करून यावर ट्विट लिहिले होते. सत्य काय आहे ? सांगली जिल्हा परिषदेने दिलेल्या माहितीनुसार श्री.हर्षल पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील जल जीवन मिशन अंतर्गत कोणतेही काम केलेले नाही. त्यामुळे त्यांचे देयक प्रलंबित असल्याचा प्रश्नच येत नाही. दि. २३ व २४ जुलै २०२५ रोजी वृत्तपत्रांमध्ये व वृत्तवाहिन्यांवर सांगली जिल्ह्यातील हर्षल अशोक पाटील यांनी जल जीवन मिशनमधील प्रलंबित कामांमुळे आत्महत्या केल्याचे वृत्त प्रसारित झाले. या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने श्री.पाटील यांचे कोणतेही देयक प्रलंबित नसल्याचा खुलासा केला आहे. आता मिडिया आणि संजय राऊत देशवासीयांची माफी मागतील का ?
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
गोवंश हत्या बंदी घोषित केली असली तरीही आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणात चोरून गोवंशाची हत्या केली जाते. हैदराबाद मधील सरकारी कत्तलखान्यातून 2 कंटेनर भरून म्हशीचे मांस निर्यात करण्यासाठी सर्व रीतसर कागदपत्रे घेऊन निघाले. जवाहरलाल नेहरू पोर्ट मधुन हा निर्यात होणार होता. गोसेवा आयोगाच्या मंडळींना मिळालेल्या माहितीला अनुसरून त्यांनी ते ट्रक लोणावळा इथे अडवले. कंटेनर मधील कर्मचार्यांनी दोन पॅलेट समोर करून यांची चाचणी करा सांगितले. त्या दोन पॅलेट मध्ये फक्त म्हशीचे मांस होते बाकी सर्व पॅलेट मध्ये गोमांस असल्याचे सिद्ध झाले. हे तब्बल 57 टन गोमांस होते. देवेन्द्रजींनी तातडीने हालचाली करून संबंधित कंपनीवर कारवाई करायला लावली आणि केंद्र सरकारच्या मदतीने हैदराबाद मधील त्या सरकारी कत्तलखान्याला टाळे ठोकले गेले आहे. गोवंश हत्या बंदी कायदा असूनही ही बेकायदेशीर कत्तल थांबत नाही आणि इतक्या मोठ्या प्रमाणात गोवंश सरकारी कत्तलखाण्यात कापले जाणे खरच दुर्दैवी आहे. तेलंगणा मध्ये हिंदू द्वेष्ट्या कोंग्रेसची राजवट असल्याने तिथे दुसरे काही घडुच शकत नाही.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
आपल्या देशातील सगळ्या संस्था अजूनही साम्यवादी विचारांच्या लोकांच्याच हातात आहेत आणि हे वारंवार सिद्ध होते. चायनीज उत्पादनांवर जागतिक बंदी घालण्यास सुरुवात झाली आहे आणि याची सुरुवात इस्त्रायलने केली आहे, हळूहळू अमेरिकाही त्याचे अनुकरण करत आहे. या दोन्ही देशांना हे कळून चुकले आहे की चीनची सर्व उत्पादने हे हेरगिरीचे काम करतात. त्यांची वाहने, त्यांची उपकरणे, अगदी व्हॅक्यूम क्लीनर देखील. आणि भारतात काय होत आहे? भारतात याच्या उलट होत आहे. नीती आयोगाने भारत सरकारला पत्र लिहिले आहे की, " चायनीज कंपन्यांना भारतात गुंतवणूक करण्याची परवानगी द्या आणि यासाठी सुरक्षा मंजूरी घेण्याची देखील गरज नाही. २४% पर्यंत चीनला विचारल्याशिवाय परवानगी द्या." तुम्ही चालवता ती चायनीज गाडी, वायफाय चे उपकरण , तुमच्या लग्नात किंवा कोणत्याही कार्यक्रमात फिरवला जाणारा ड्रोन, किंवा तुमच्या घरात असलेला रोबोट व्हॅक्यूम क्लीनर, "मेड इन चायना" असलेली कोणतीही वस्तू ही चीनसाठी हेरगिरीचे काम करतात. हे जगभरातील देशांच्या लक्षात आले आहे आणि त्यामुळे चीनवर जागतिक बहिष्कार टाकला जातो आहे. आपल्याकडे नीती आयोग यांना पायघड्या घालून बोलवतो आहे.
🔽
Comments