अभिजीत राणे लिहितात
- dhadakkamgarunion0
- Jul 22
- 3 min read
Updated: Jul 23
अभिजीत राणे लिहितात
महाराष्ट्राचे लाडके , लोकप्रिय , सुसंस्कृत , कुटुंबवत्सल , अभ्यासू , बुद्धिमान , मैत्र जपणारे , प्रेमळ , सहृदयी, भविष्याचा वेध घेणारी दृष्टी असलेले मुख्यमंत्री, लोकनेते आणि आमचे प्रेरणास्थान ; श्री देवेंद्रजी फडणवीस यांची त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने श्री प्रसादजी लाड, श्री मोहितजी कंबोज, श्री प्रवीणजी दरेकर यांच्या समवेत, वर्षा बंगल्यावर भेट घेऊन अभिष्टचिंतन केले.
अभिजीत राणे लिहितात
गोपीचंद पडळकर यांच्यावर राष्ट्रवादी कोंग्रेस पक्ष शरद पवार गट तुटून पडण्याचे कारण काय ? कारण क्रमांक एक गोपीचंद पडळकर यांनी प्रात्यक्षिकासह दुधात भेसळ काशी केली जाते त्यात रासायनिक पदार्थ वापरुन कृत्रिम दूध कसे निर्माण केले जाते आणि ते नैसर्गिक दुधात मिसळून कसे विकले जाते हे सिद्ध केले. हादरलेल्या सरकारला याच्या चौकशीचा आदेश द्यावा लागला. यात सहभागी मंडळी राष्ट्रवादी कोंग्रेस शरद पवार गटाची आहेत. इसाई मिशनरी मंडळींनी धर्मांतर घडवण्यासाठी अवलंबिलेले बेकायदेशीर मार्ग यावर पडळकर यांनी भाष्य करून पवार गटाच्या दुखत्या नसीवर बोट ठेवले. जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीने ख्रिस्ती तरूणाशी विवाह केला आहे. सुळे कुटुंबीय सुद्धा ख्रिस्ती असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पवार गट अधिकच संतापला. इतकेच नाही तर जरंडेश्वर साखर कारखाना अजित पवारांनी जसा कवडीमोल भाव देऊन घशात घातला त्याच पद्धतीने जयंत पाटील सांगली पट्ट्यातील तीन कारखाने गिळंकृत करत आहेत हे पडळकर यांनी पुराव्यानिशी दाखवून दिले. सत्तेत नसताना सुद्धा यांच्या चालू असलेल्या लबाड्या उघड झाल्याने ते संतापले आहेत.
अभिजीत राणे लिहितात
नितिन गडकरी यांचा उल्लेख रोडकरी असा केला जातो. त्यांनी संपूर्ण देशात महामार्गांचे जाळे विणले आहे. त्यांची फारशी प्रकाशात न आलेली दोन पर्यावरण पूरक कार्ये आज जाणून घेऊया. त्यांनी एक अभिनव कल्पना राबवली आहे 'एक पेड़ माँ के नाम' यांसारख्या ग्रीन उपक्रमांमधून सरकारने राष्ट्रीय महामार्गांच्या बाजूने 4.78 कोटींपेक्षा अधिक झाडे लावली असून सुमारे 70000 झाडांचे पुनर्रोपण करण्यात आले आहे. ही झाडे हायवेज् ना लागून असल्याने हा आकडा किती मोठा आहे हे सहज लक्षात येत नाही, पण ही झाडे एकत्र असती तर 'मिडीयम-डेन्सीटी' जंगल असलेल्या उत्तराखंड मधील 'जिम कॉर्बेट' किंवा नागपूर जवळील 'ताडोबा' जंगलांपेक्षा एक मोठे जंगल यातून निर्माण झाले असते!! 80 लाख टनांहून अधिक प्लास्टिक कचरा आणि औष्णिक (कोळसा जाळून) वीज प्रकल्पांतील फ्लाय ॲश महामार्ग बांधकामामध्ये वापरला गेला आहे, ज्यामुळे कच्च्या मालाची गरज कमी होत आहे आणि पर्यावरण-पूरक विकास होत आहे!!
अभिजीत राणे लिहितात
महाराष्ट्रातील डिजिटल मिडिया हा भाजपाचा द्वेष करतो. एखाद्या शत्रूचा द्वेष करावा असा द्वेष करतो आणि हे करण्याच्या नादात तो वारंवार नागडा होतो तरी त्यांना अक्कल येत नाही आणि भाजपावाले त्यांच्यावर कारवाई करत नाही त्यामुळे त्यांचा खोटारडेपणा संपत नाही. जळगाव जामनेर इथे रहाणारा प्रफुल लोढा याला हनीट्रॅप प्रकरणात अटक झाली की मीडियाने तो भाजपाचा कार्यकर्ता असल्याचा धादांत खोटा प्रचार सुरू केला. सत्य काय आहे ? तो भाजपाचा नेता नाही. तो आधीपासून पोक्सो प्रकरणी अटकेत आहे. तो नाथाभाऊच्या जवळचा कार्यकर्ता आहे. तो मनोविकृत आहे. त्याने नात्यातील मुलींचेच व्हिडीओ बनवलेले आहेत.. आता अश्या नराधमाचा आणि भाजपाचा काहीही संबंध नसताना सुद्धा मीडिया जाणीवपूर्वक वातावरण विषारी करते आहे. यामुळे त्यांची अवस्था एक दिवस लांडगा आला रे आला अशी होणार आहे. त्यांनी एखादे खरे प्रकरण उघडकीला आणले तरी लोक त्यांच्यावर विश्वासच ठेवणार नाहीत.
अभिजीत राणे लिहितात
काल सहारनपूरच्या देवबंदमध्ये "वाहिद" नावाच्या व्यक्तीचा कावड यात्रेच्या ट्रकखाली आल्याने मृत्यू झाला. त्या घटनेनंतर लगेचच दंगल सुरू झाली, पण पोलिसांच्या हाती एक व्हिडिओ लागला. हा व्हिडिओ कावड यात्रा शूट करत असताना एका तरुणाच्या कॅमेऱ्यात कैद झाला. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतं की हा व्यक्ती पळत जाऊन ट्रकच्या चाकांखाली स्वतःहून झोपला, आणि घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. गंभीर प्रश्न असा आहे की तो व्यक्ती "वाहिद" होता, त्याने असं का केलं? त्याला असं करण्यास कोणी सांगितलं होतं का? थोडा विचार करा, जर दुर्दैवाने हा व्हिडिओ मिळाला नसता, तर काय झालं असतं? सरकारने या घटनेच्या मुळाशी जावं आणि ज्यांनी पडद्यामागे बसून अशा प्रकारचे खेळ रचले, त्यांना ओळखून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. ही कावड यात्रेला सतत बदनाम करण्याच्या कटकारस्थानाची एक कडी आहे. "शेवटी, कोण आहेत जे हिंदूंना 'आतंकी' म्हणून घोषित करण्याचा प्रयत्न करत आहेत? जर या प्रश्नाचा गहन विचार केला, तर उत्तर आपोआप मिळेल.
अभिजीत राणे लिहितात
काल संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आणि पहिल्याच दिवशी उपराष्ट्रपती आणि राज्यसभा अध्यक्ष जगदीश धनकड यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजीनामा दिल्याची घोषणा केली. या धक्कादायक घटनाक्रमाने सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. धनकड यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया झाली आहे. जून महिन्यात उत्तराखंड मध्ये एका कार्यक्रमात ते चक्कर येऊन पडले होते हे सत्य आहे. त्यामुळे त्यांनी खरोखर प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजीनामा दिल्याची शक्यता आहेच. परंतु राजकीय वर्तुळात दोन चर्चा रंगल्या आहेत. पहिली चर्चा त्यांनी न्याययंत्रणेला थेट अंगावर घेतले होते आणि जज्ज मंडळींच्या सक्रियतेवर टीका केली होती हे मोदी सरकारला रुचले नाही. त्यांना संवैधानिक संस्थांमध्ये संघर्ष व्हावा असे वाटत नाही. दुसरे कारण भाजपाने नितीश कुमारांना हे पद देण्याचे निश्चित केले असून कदाचित हा खांदेपालट बिहार निवडणुकीच्या मागेपुढे संभवतो, त्या दृष्टीने जागा रिकामी केली गेली आहे. कारणे काहीही असो परंतु धनकड यांनी अधिवेशनाचा पहिला दिवस गाजवला हेच खरे.





Comments