🖋️ अभिजीत राणे लिहितात
- dhadakkamgarunion0
- Jul 8
- 3 min read
🖋️ अभिजीत राणे लिहितात
खिलाडुवृत्ती म्हणजे काय याचे कधी कधी काही खेळाडू खूप सुंदर उदाहरण आपल्यासमोर मांडतात आणि अश्या वेळी एकमेकांशी गळेकापू स्पर्धा करणार्या या जगात चांगले लोक सुद्धा आहेत याचे समाधान वाटते. महान फलंदाज ब्रायन लाराचा ४०० धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड फक्त ३३ धावांवर होता. हा वर्ल्ड रेकॉर्ड तो फलंदाज सहज मोडू शकत होता. पण त्याचवेळी फलंदाजाने बॅटिंगच सोडली. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार विआन मुल्दर नेतृत्वाच्या पहिल्याच कसोटीत चारशे धावांकडे दमदार वाटचाल करीत होता. झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात दुसऱ्या दिवशी उपाहारास तो ३६७ धावांवर खेळत होता. ब्रायन लाराच्या नाबाद चारशे धावांच्या विक्रमापासून तो ३३ धावाच दूर होता; पण त्याने लाराचा विक्रम मोडण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी डाव घोषित केला. त्यानंतर विआन म्हणाला की, " ब्रायन लारा हा एक महान खेळाडू आहे, त्या दर्जाच्या खेळाडूच्या नावावर तो वर्ल्ड रेकॉर्ड राखणे खरोखरच खास असेल. यानंतरही जर मी तेवढ्या धावा केल्या, तरी मी ब्रायन लाराचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडणार नाही. " या वक्तव्याने विआनने सर्वांची मनं जिंकली आणि क्रिकेट विश्वात त्याचे कौतुक सुरु आहे. विआन सारखे खेळाडू खेळभावना जपण्याचे मूर्तीमंत प्रतीक आहेत. शाळेत प्रत्येक विद्यार्थ्याला खेळ खेळण्यास भाग पाडले जाते त्याचे कारणच पराभव पचवण्याची क्षमता विकसित होणे आणि खेलभावना वृद्धिंगत होणे हे असते.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
जनसुरक्षा विधेयकाच्या माध्यमातून आंदोलनजीवी प्रवृत्तींना ठेचण्याचा निर्धार देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. जनतेच्या सुरक्षिततेसाठी, संविधानाच्या सन्मानासाठी जनसुरक्षा विधेयक! महाराष्ट्र सरकार काही दिवसात विधिमंडळात जनसुरक्षा विधेयक सादर करत आहे. समाजात, राज्यात, अस्थिरता, तेढ निर्माण करणाऱ्या धोकादायक विचारसरणीवर तत्काळ कारवाई करण्यासाठी जनसुरक्षा विधेयक गरजेचं आहे. काही लोक, संघटना किंवा कट्टर गट भारतीय संविधान, सार्वभौमत्व, एकात्मता आणि लोकशाही रचना नाकारत आहेत. त्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी हा कायदा आवश्यक आहे. भारतीय संविधानाला नाकारणारे, त्याचा अपमान करणारे किंवा ते उलथवण्याचा कट करणारे लोक किंवा गट यांच्यावर कठोर कारवाई होणार. या कायद्यात पोलिसांना किंवा प्रशासनाला त्वरित कारवाईची ताकद दिली आहे. हा कायदा केवळ गुन्हा घडल्यानंतर कारवाई करणार नाही, तर अशा विचारांच्या प्रसाराला आधीच थांबवण्याचा प्रयत्न करतो.नागरिकांनी निश्चिंत राहावे, संविधान आणि कायदा सुव्यवस्थेत विश्वास ठेवावा, यासाठी हा कायदा आवश्यक आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
हे अती झालंय. आग लावायची एक हद्द असते. महाराष्ट्रातील नीच वेश्या पत्रकारीतेने उबाठा प्रमाणेच रोज निचतम पातळी गाठायचे ठरवले आहे. न्यूज 18 लोकमत चॅनल डॉक्टर निशिकांत दुबे यांच्या तोंडी त्यांनी न उछरलेले अतिशय संतापजनक वाक्य घालून महाराष्ट्रात दंगली घडवण्याचे कारस्थान रचतो आहे. या न्यूज चॅनलने "मराठ्यांना आपटून आपटून मारू" असे विधान निशिकांत दुबेंच्या तोंडी घातले आहे, ज्यामुळे महाराष्ट्रात दंगली उसळु शकतात. उत्तर भारतीयांवर सगळीकडे प्राणघातक हल्ले होऊ शकतात. हा अतिशय गंभीर गुन्हा आहे आणि यासाठी देवेंद्र फडणवीसजींनी न्यूज 18 लोकमत या न्यूज चॅनल वर ताबडतोब कारवाई करून त्यांच्या मालकाला जेलमध्ये घातला पाहीजे. निशिकांत दुबे नक्की काय म्हटले, “जे उत्तर भारतीयांना मारतात त्यांना पटक पटक के मारू. “ याचा सरळ अर्थ मनसे आणि उबाठा या पक्षाच्या गुंडांना मारू असा होत असतांना, "मराठ्यांना" हा जातीवाचक शब्द वापरून या चॅनेलने राज्यात जातीय दंगली घडवण्याचा घाट घातला आहे. सरकारने या संदर्भात काहीही हालचाल न करणे खरोखर अनाकलनीय आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
मराठवाड्यातील जेष्ठ कोंग्रेसी नेते अशोक पाटील डोणगावकर यांचं निधन झाले. त्या निमित्ताने सामान्यातील नेतेपदाला पोचलेल्या एका कार्यकर्त्याचा अंत झाला, एक युग संपलं. माजी राज्यमंत्री अशोक पाटील डोणगावकर यांचं निधन म्हणजे महाराष्ट्रातील एक प्रामाणिक राजकीय युगाचा शेवट. ग्रामपातळीपासून ते मंत्रालयापर्यंतचा त्यांचा प्रवास म्हणजे कार्यकर्त्यांना विधायक प्रेरणा देणारा आदर्श होता. ते नेते म्हणून कधीच मिरवले नाहीत कायमच सामान्य कार्यकर्त्यांशी त्यांची नाळ जुळलेली होती. कोंग्रेस पक्षातील बदलत्या राजकीय प्रवाहाशी आपल्याला जुळवून घेता येत नाही हे लक्षात आल्यावर ते शांतपणे दूर झाले. त्यांनी धनदांडग्यांच्या गोटात न जाता, तत्त्वांशी निष्ठा राखत जमीनीवरील काम करणे हेच खरे नेतृत्व मानले. अशा नेत्यांचे जाणे म्हणजे सार्वजनिक जीवनाच्या सदसद्विवेकबुद्धीपूर्ण नेतृत्वाचा अंत आहे. कोंग्रेसी कार्यकर्त्यांनी नेत्यांच्या मागेपुढे धावण्यात वेळ वाया न घालवता अशोक रावांची कार्यशैली आत्मसात करून जनासामान्यांशी नाळ जुळवून ठेवणे हीच त्यांना हीच खरी आदरांजली असेल.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
रोडकरी नितिन भाऊ गडकरी यांना महायुतीचे घटक असणार्या अजित दादांनीच दणका दिला आहे. खड्डेयुक्त रास्ते ही महाराष्ट्रची राष्ट्रीय ओळख आहे अश्या शब्दात अजितदादांनी थेट गडकरींना पत्र लिहून मुंबई–नाशिक आणि पुणे–नाशिक महामार्गांवरील खड्ड्यांच्या राजकारणाला शब्दबद्ध केले. लोकांचा जीव गेला तरी ‘आदर्श खड्डे’ टिकून राहतात, आणि आता उपमुख्यमंत्री गडकरींना सांगतात की "तुमच्या राष्ट्रीय महामार्गामुळे राज्याची प्रतिमा खालवते आहे. दादांची ही भूमिका म्हणजे निवडणुकीच्या आधी 'विकासासाठी भांडणारा नेता' ही प्रतिमा टिकवण्याचा प्रयत्न असून हे रस्ते दोन वर्षांपासून खड्ड्यांनी पोखरले गेले होते त्यावेळी अजितदादा का बोलले नाहीत ? गडकरी–अजित पवार संघर्ष नुरा कुस्ती असून लोकांच्या रागाला वाट देण्याचा प्रयास आहे. महायुती विकासाच्या गप्पा मारत असली तरी जमीनीवरील वास्तव बघता लोक नाराज आहेत. या नाराजीला शब्दबद्ध करून आपली मते राखण्याचे उद्योग अजित दादा करत आहेत. इतकेच.
🔽












Comments