अधिवेशनाचे दिवस कमी करण्यावरून मुख्यमंत्री फडणवीसांचा जबरदस्त पलटवार
- dhadakkamgarunion0
- Dec 9, 2025
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
अधिवेशनाचे दिवस कमी करण्यावरून मुख्यमंत्री फडणवीसांचा जबरदस्त पलटवार
● अधिवेशनाचा कालावधी कमी केल्यावरून विरोधी पक्षाने सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली. विरोधी पक्ष दिशाहीन आणि नकारात्मक झाला असून त्यांच्याकडे रचनात्मक मुद्दे राहिलेले नाहीत, असे मुख्यमंत्री म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि लागू असलेली आचारसंहिता यामुळेच अधिवेशनाचे दिवस कमी ठेवण्यात आले आहेत, असे स्पष्टीकरण देत त्यांनी विरोधकांचे आरोप खोडून काढले. राज्याच्या अर्थव्यवस्थेबद्दल आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर विरोधकांनी केलेले सर्व आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावले. शेतकऱ्यांसाठी ९० लाख रुपयांची आर्थिक मदत दिल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, राज्याची आर्थिक स्थिती मजबूत असून विकासकामांसाठी निधीची कमतरता नाही. विरोधकांनी वस्तुस्थिती न समजून घेता केवळ राजकारण करू नये, असे आवाहन त्यांनी केले. अधिवेशनाचा एवढा कमी कालावधी असतानाही सरकार सुटीच्या दिवशीही म्हणजे शनिवार आणि रविवार हे दोन्ही दिवस कामकाज घेण्यास तयार आहे. यावरून विरोधकांसारखी पळपुटी भूमिका सरकारची नाही, हे सिद्ध होते, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)








Comments