अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई; तातडीने मदतीचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
- dhadakkamgarunion0
- Sep 25
- 1 min read
Updated: Sep 29
[ पंचनामा ]
==================
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई; तातडीने मदतीचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
● महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आपद्ग्रस्त शेतकऱ्यांसाठी २२१५ कोटी रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली असून, नुकसान भरपाईच्या निकषांमध्ये शिथिलता आणून युद्धपातळीवर मदतकार्य सुरू करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. ही मदत लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यात अनेक ठिकाणी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या परिस्थितीत मदतकार्याला गती देण्यासाठी राज्य सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना विशेष अधिकार दिले आहेत. पंचनामे पूर्ण झालेल्या तालुक्यांमध्ये एकत्रित शासन आदेशाची वाट न पाहता, तात्काळ मदतीचे वितरण सुरू केले जाईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)

Comments