top of page

अजितदादांनी आयुष्याचे टायमिंग चुकवले; मुख्यमंत्री फडणवीस विधानसभेत भावूक

  • dhadakkamgarunion0
  • 7 days ago
  • 1 min read

🔏 [ ⏺️ पंचनामा ]

▪️==================▪️

अजितदादांनी आयुष्याचे टायमिंग चुकवले; मुख्यमंत्री फडणवीस विधानसभेत भावूक

● राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनावर शोकप्रस्ताव मांडताना अत्यंत हृदयस्पर्शी भावना व्यक्त केल्या. ‘अजित पवार हे महाराष्ट्राचे असे सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री होते, जे या राज्याला कधी मुख्यमंत्री म्हणून लाभलेच नाहीत,’ अशा शब्दांत फडणवीसांनी दादांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी संपूर्ण सभागृह स्तब्ध झाले होते. अजित पवार यांचा वक्तशीरपणा आणि शिस्त अख्ख्या महाराष्ट्राला परिचित होती. नेहमी घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या या नेत्याने यावेळी मात्र नियतीसमोर टायमिंग चुकवले, असे मुख्यमंत्री म्हणाले. जेव्हा ते आपल्या राजकीय कारकिर्दीची सर्वात मोठी इनिंग खेळतील असे सर्वांना वाटत होते, नेमक्या त्याच वेळी काळाने त्यांच्यावर झडप घातली. बारामती येथील विमान अपघातात झालेल्या त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. ‘अजितदादा पवार वॉज द बेस्ट चीफ मिनिस्टर महाराष्ट्र नेव्हर हॅड’ या फडणवीसांच्या एका वाक्याने संपूर्ण राज्याच्या भावनांना वाट करून दिली..

© -अभिजीत राणे

(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page