top of page

अंजनगाव सुर्जी मधील वादाचे स्वरूप पाहून मन खिन्न होते.

  • dhadakkamgarunion0
  • Apr 2
  • 2 min read

🖋️ अभिजीत राणे लिहितात

अंजनगाव सुर्जी मधील वादाचे स्वरूप पाहून मन खिन्न होते. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ मराठा समाजाचे नव्हे तर संपूर्ण राष्ट्राचे आराध्य आहेत. धनगर आणि मराठा समाजाने इतिहासात एकत्रितपणे धर्मरक्षणाचा लढा दिला आहे. महाराजांनी मंदिरे वाचवली, संभाजी महाराजांनी त्यांचे रक्षण केले, तर अहिल्यादेवींनी जीर्णोद्धार करून काशीविश्वेश्वराला मुक्त केले. अशा धर्मपालकांचा सन्मान करताना जातीद्वेषाला स्थान देणे ही महाराजांच्या विचारधारेचा अपमान आहे. स्थानिकांनी प्रशासनाच्या सहाय्याने शिवाजी महाराजांचा पुतळा आणि शेजारी अहिल्यादेवींचा पुतळा उभारून दोन्हींची एकत्र पूजा केली तर वादावर पडदा पडेल. समाजाची तोंडे वेगवेगळी न होता, धर्मरक्षणाचा लढा एकत्रितपणे पुढे गेला पाहिजे. हेच खरे शिवचरित्राचे पालन ठरेल.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

पुणे-पिंपरी चिंचवडकरांसाठी वाहतुकीच्या कोंडीवर मोठा दिलासा देणारी बातमी म्हणजे ‘नाशिक फाटा ते खेड एलिव्हेटेड कॉरिडॉर’ प्रकल्पाला गती मिळणे. तब्बल ७,८२७ कोटींचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ३० किमी लांबीचा असून, ८ पदरी ‘सिंगल पिलर’ पुलाच्या स्वरूपात उभारला जाणार आहे. यामुळे जमिनीवरील जागा कमी व्यापली जाईल आणि विद्यमान महामार्गाचे रुंदीकरण सुलभ होईल. भोसरी, मोशी, चाकण एमआयडीसी व खेड औद्योगिक पट्ट्यातील लाखो कामगारांचा तासनतास होणारा खोळंबा थांबेल. स्थानिक व लांब पल्ल्याची वाहतूक वेगळी झाल्याने पुणे-नाशिक महामार्गावरील प्रवास अधिक वेगवान व सुरक्षित होईल. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रकल्प आता प्रत्यक्षात उतरण्याची चिन्हे दिसत असून, औद्योगिक विकासाला नवी गती मिळणार आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

कोर्टातील संवाद कधी कधी वास्तवदर्शी विनोद निर्मिती करतो. काँग्रेसने ‘धुरंधर’ चित्रपटात मोदींचे भाषण दाखवले म्हणून कोर्टात जाऊन आक्षेप घेतला, की यामुळे भाजपला फायदा होईल. कोर्टाने सरळ उत्तर दिले – मग तुम्हीही राहुल गांधींना घेऊन चित्रपट काढा. इथेच गंमत झाली! काँग्रेसने हात झटकला – “नको, त्याचा फायदा देखील भाजपलाच होईल.” हा संवाद म्हणजे राजकारणातील विनोदाचा उत्तम नमुना आहे. यातून विरोधकांना स्वतःच्या नेत्यावर विश्वास नसल्याचे चित्र उभे राहते. न्यायालयीन चर्चेतून कधीकधी राजकीय वास्तवाचे हास्यस्पद दर्शन घडते. जनतेला मात्र यातून एकच संदेश मिळतो – राजकारणात कधी कधी तर्कापेक्षा विनोद जास्त प्रभावी ठरतो.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

घाटकोपर येथील महाकाय होर्डिंग दुर्घटनेत १७ निष्पाप नागरिकांचा बळी जाणे ही भ्रष्ट व्यवस्थेची थरारक साक्ष आहे. ८५४ पानी चौकशी अहवालात पोलिस, महानगरपालिका व अधिकारी यांच्यावर ठपका ठेवण्यात आला असून, नियमबाह्य संगनमताने कारभार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. माजी मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या समितीने आयपीएस कैसर खालिद, पालिकेचे निरीक्षक, होर्डिंग कंपनीचे मालक व तत्कालीन पोलीस आयुक्त यांना जबाबदार धरले आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या भ्रष्ट व्यवस्थेविरोधात जागरूकता हीच खरी गरज आहे. जबाबदार अधिकाऱ्यांना कठोर शिक्षा मिळाली तरच भविष्यात अशा दुर्घटना टाळता येतील. अन्यथा भ्रष्टाचाराचा हा राक्षस पुन्हा पुन्हा निष्पापांचा बळी घेईल. समाजाने आता आवाज उठवून पारदर्शक प्रशासनाची मागणी करणे अत्यावश्यक आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

रुपाली चाकणकर प्रकरण हे सत्तेचा गैरवापर कसा होतो याचे ठळक उदाहरण आहे. लॉकडाऊन काळात क्षुल्लक कमेंटवरून पोलीस पाठवून लोकांना कोर्टात हजर करणे, मोबाईल जप्त करणे ही लोकशाहीविरोधी कृती होती. पक्षाची ताकद वापरून विरोधकांवर कारवाई करणे ही संस्कृती अजित पवारांच्या पाठबळामुळे चालली, पण आज चौकशीला सामोरे जाण्याची भीती निर्माण झाली आहे. खरात प्रकरणात सहकार्याची थाप मारणाऱ्या याच व्यक्तीने स्वतःच्या कृत्यांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. सत्ता, पद आणि ताकद कायमची नसते, सावली कधीच एका जागी टिकत नाही. चलतीच्या काळात माज करणारे लोक शेवटी जेलमध्ये सडतात. हे प्रकरण नागरिकांना शिकवण देतं की ताकदीचा वापर जनतेच्या सेवेसाठी व्हावा, दडपशाहीसाठी नव्हे.

🔽



 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page