top of page
  • dhadakkamgarunion0

Desk Of Shri.Abhijeetrane


@ABHIJEETRANE (AR)*


मंदिरे उघडली अखेर /अन्यथा झाली असती / सरकारची अखेर / भगवंताने नाही केले काही / भक्तांनीच फिरवली द्वाही / आजवर भक्तांना भगवंताने सोडवले / यावेळी भक्तांनी भगवंताला सोडवले !!

www.abhijeetrane.in


 

@ABHIJEETRANE (AR)*


वेदकाळात भारतात मूर्तिपूजा अजिबात नव्हती / फक्त ब्राह्मण आणि क्षत्रियांपुरती मर्यादित यज्ञ संस्था होती / तीन ते पाच हजार वर्षांपूर्वी / विशेषतः पुराणांमुळे / भट भिक्षुक पुजारी आणि व्यापारी केंद्र स्थानी असलेली / मूर्ती पूजा आणि मंदिरे निर्माण होऊ लागली / एकेकाळी जवळपास काही हजार वर्षे / मूर्ती पूजा ही संकल्पनाच नसलेल्या भारतात / आता हिंदू धर्म संस्कृतीत / मंदीर आणि मूर्तीशी देवत्व आणि हिंदुत्व निगडीत झाले आहे हे विशेष !!

www.abhijeetrane.in


 

@ABHIJEETRANE (AR)*मंदिरे उघडली खरी पण मंदिर परिसरातील हार नारळ फुले प्रसाद वस्तू मंदिरात न्यायला बंदी घातली आहे त्यामुळे मंदिराचे अनुषंगाने उपजीविका करणा-या लाखो किरकोळ विक्रेते आणि व्यावसायिक यांची उपासमारीतून सुटका कशी होणार? मंदिराच्याआवारातील उध्वस्त अर्थ व्यवस्था जर ही बंदी कायम राहीली तर मग आंदोलनाचा काय उपयोग झाला? मंदिर उघडा आंदोलनात भक्त भाविकांपेक्षा या मंदिर परिसरातील विक्रेते आणि व्यावसायिक यांचा समावेश अधिक होता. सरकारने दारे भक्त भाविकांसाठी उघडली खरी पण मंदिर परिसरातील दुकानांची दारे बंद रहातील अशी जाचक बंधने कायम ठेवली. मी मांडलाय हा मुद्दा एकाही न्यूज चॅनलवर कव्हर झालेला मला दिसला नाही.


www.abhijeetrane.in


 

@ABHIJEETRANE (AR)*दर्शनासाठी मंदिराची ऑनलाईन परवानगी / बुकींग सक्तीचे म्हणजे फक्त उच्चभ्रू वर्गातील भाविकांना संधी आणि ऑनलाईन बुकींगसाठी साधने आणि सवय नसलेल्या बहुजन समाजातील गोरगरिबांना मंदिर प्रवेश नाही असाच अर्थ होतो. ऑनलाईन ऐवजी जो प्रथम अथवा ज्या क्रमाने येईल त्याला दर्शनाची त्या क्रमाने संधी अशी व्यवस्था सर्व भक्तांसाठी न्याय देणारी ठरली असती. दिवसभरात जेवढ्या भक्तांना प्रवेश देणार तेवढ्याच रांगेतील भक्तांना टोकन द्या आणि इतरांना नंतर येण्यास सांगा. आत्ताच मी महाराष्ट्रातील दोन प्रमुख मंदिरांच्या महाव्यवस्थापकांशी बोललो .. ऑनलाईन बुकींग फुकट होत असल्याने बुकींग केले पण प्रत्यक्षात आले नाहीत असे चाळीस / पन्नास टक्के भक्त आज पहिल्याच दिवशी निघाल्याचे त्यांनी सांगितले. याचा अर्थ 50% ख-या दर्शनोत्सुक भक्तांची संधी नाहक गेली. मंदिरांच्या दारात उत्स्फूर्तपणे आलेले हजारो भक्त भाविक गर्दी करून होते पण ई पास ऑनलाईन बुकींग करून सोबत नाही म्हणून पोलीस त्यांना हाकलून लावत होते आणि ऑनलाईन बुकींग करून न आलेल्या भक्तांमुळे मंदिरात अपेक्षित भक्तगण नव्हते. ऑनलाईन ऐवजी जो प्रथम येईल त्याला दर्शनाची त्या क्रमाने संधी अशी व्यवस्था सरकारने सक्तीची करावी आणि प्रसाद हार नारळ फुले स्वीकारण्यासाठी मंदिराच्या प्रांगणात स्वतंत्र काउंटर प्रत्येक मंदिराला उघडण्याची परवानगी देऊन मंदिर परिसरातील विक्रेते आणि व्यावसायिक यांचे आर्थिक व्यवहार पूर्ववत करावेत अशी माझी सूचना आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धवजींना आजच या आशयाचे पत्र मी पोहचते केले आहे. पटते आहे ना माझे म्हणणे??


www.abhijeetrane.in


 

@ABHIJEETRANE (AR)*


मंदिरे उघडण्याचा निर्णय घ्यायला उद्धवजींनी अपरिमित उशीर केला. भक्त भाविकांना खूप संताप, मनस्ताप आणि हिंदुत्ववादी म्हणविणा-या शिवसेनेचा मुख्यमंत्री निवडून दिलेला असून देव आणि धर्म यांच्याशी द्रोह करणारे सरकार असल्याचा पश्चात्ताप झाला. भाजपा प्रणित हिंदुत्ववादी संघटनांच्या आंदोलनातूनच हा दबाव निर्माण झाला यात शंकाच नाही. बाकी इतरांनी प्रतिकात्मक निदर्शने केली पण श्रेय विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस यांनी मंदिरे उघडण्याच्या प्रश्नावर ठाकरे-पवार सरकारची जी सुनियोजित धार्मिक अध्यात्मिक दृष्ट्या संवेदनशील मुद्द्यांवर हजारो भक्त भाविकांना आणि मंदिरांवर अवलंबून व्यापारी आणि व्यावसायिकांना संघटित करून कोंडी केली त्या सुत्रसंचालनाला द्यावे लागेल. मंदिरांची द्वारे उघडणे ठाकरे-पवार सरकारला भाग पडले आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना भाग पाडले ही वस्तुस्थिती आहे !!


www.abhijeetrane.in


 

@ABHIJEETRANE (AR)*

बिहारमध्ये विधानसभा निवडणुका नंतरच्या शपथविधी सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण बघतो आहे. भाजपाने रेणू देवी या प्रथमदर्शनी अजिबात प्रभावी न वाटणा-या महिला सदस्यांना उपमुख्यमंत्री पद दिले आहे. बिहारमध्ये राबडी देवी मुख्यमंत्री झाल्यावर अशीच सिनिकल प्रतिक्रिया झाली होती पण त्यांनी राज्य चालवून दाखवले .इतकेच नव्हे तर तेजस्वी यादव सारखा नवा युवा नेता घडवला. त्यामुळे रेणू देवी यांची नीवड अमित शहा, जे पी नड्डा आणि देवेंद्र फडणवीस अशा तिघांनी एकमताने केली तर निश्चितच जातीय समीकरणा पलीकडे काही गुण रेणू देवी मध्ये पाहिले असणार. नितीश कुमार यांना घेरणे, कोंडी करणे, राजकीय पत-प्रतिष्ठा संपुष्टात आणणे आणि जेडीयूची अवस्था महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेचा व मुख्यमंत्री उद्धवजींची जशी परभृत, परावलंबी आणि पराभूत मानसिकतेची केली आहे तशी करणे हे भाजपाचे उद्दीष्ट असणार यात शंकाच नाही. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत नितीश कुमार खासदारकीसाठी उभे राहून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकी नंतर येणा-या मोदींच्या केंद्रीय मंत्री मंडळात जातील आणि त्यावेळी भाजपाचा मुख्यमंत्री बिहारमध्ये होईल असे मला वाटते.


www.abhijeetrane.in


 

@ABHIJEETRANE (AR)*

जो पर्यंत करोना पूर्णपणे संपत नाही तोपर्यंत भाजपा महाराष्ट्रात सत्ता परिवर्तनाची कोणतीही खेळी खेळणार नाही असे दिसते. मध्य प्रदेश सरकारच्या उलथापालथीत कोरोना आडवा आला नाही हे खरे पण महाराष्ट्रात कोरोना मुळे ठाकरे-पवार सरकारचा पाय अधिक खोलात जातो आहे आणि जनमानसातील पाया उखडतो आहे असे स्पष्ट दिसत असताना फाटाफूट किंवा फोडाफोडीचे प्रयत्न करण्यापेक्षा महाआघाडी सरकारच्या अंतर्गत बिघाडीतून आपोआप सरकार पडू द्यावे आणि मुदतपूर्व मध्यावर्ती निवडणुका स्वबळावर एकट्याने लढवून सत्ता संपादन करता येते का पहावे असे काही महाराष्ट्रात सूत्रधार असलेल्या देवेंद्रजींच्या मनात असावे असे भाजपा मधील माझे मित्र मला सांगत आहेत आणि मी सहमत आहे. तुम्ही आहात का ?


www.abhijeetrane.in
8 views0 comments

Comments


bottom of page