*@ABHIJEETRANE(AR)*
महाआघाडीच्या सरकारने स्वतःची भूमिका "राज्य" ऐवजी "राष्ट्र" असावे तशी घेतली आहे असे म्हटले तर ते वास्तवाला धरून होईल की अतिशयोक्त ठरेल?
◆
*@ABHIJEETRANE(AR)*
अजितदादांनी उपमुख्यमंत्री ऐवजी महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ही भूमिका घेतली तर त्यात राष्ट्रवादीचे अधिक हित आहे की उपमुख्यमंत्री रहाण्यात? वैयक्तिक अजितदादांच्या लाभ हानीचा विचार बाजूला ठेवून फक्त राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचा विचार करून उत्तर अपेक्षित आहे हे लक्षात घ्या.
◆
*@ABHIJEETRANE(AR)*
फास्ट टॅगची सक्ती करण्याच्या प्रयत्नांना मुंबईतील टोल नाक्यावर टोल वसूल करणा-या एम ई पी कंत्राटदार कंपनीने फारशी पूर्वतयारी केलेली दिसत नाही. फास्ट टॅग साठी येणारी एक जाणारी एक लेन वगळता बाकी सर्व लेनस् कॅशसाठीच खुल्या ठेवलेल्या आहेत. दहिसर टोल नाक्यावर तर कालपर्यत एक देखील एक्स्क्लुझीव्ह फास्ट टॅग लाईन नव्हती आणि एमईपी कर्मचारी गोंधळ वाढवीत कॅशसाठी आग्रह धरीत होते.
◆
*@ABHIJEETRANE(AR)*
महाआघाडी उद्योग धंदे व्यापार व्यवसाय करण्यासाठी अनुकूल वातावरण नाही हे वारंवार वेळोवेळी ज्या प्रकारे मनमानी पद्धतीने निर्बंध लादले जात आहेत त्यावरून सिद्ध होते आहे. याचा परिणाम म्हणून उद्योग धंदे व्यापार व्यवसाय अन्य राज्यांत स्थलांतरीत झाले तर दोष कुणाचा? परीणाम कोण भोगणार? महाआघाडी सरकार आज आहे उद्या नसेल पण उद्योग धंदे व्यापार व्यवसाय कायमचे निघून गेलेले असतील..!
◆
*@ABHIJEETRANE(AR)*
संचारबंदी रात्री 11ला सुरू होत असताना मुंबई ठाण्यात रात्री दहा पासूनच पोलीस लाठ्या काठ्या लाऊड स्पीकर घेऊन बंद करत सुटताना सर्रास दिसतात हे अनाकलनीय अनपेक्षित आणि अनुचित नाही काय?
コメント